मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /या वयात पालकांनी मुलांसोबत झोपणं थांबवावं! एक्सपर्ट्सनी सांगितली कारणं

या वयात पालकांनी मुलांसोबत झोपणं थांबवावं! एक्सपर्ट्सनी सांगितली कारणं

मुलांनी एक विशिष्ट वय ओलांडलं की पालकांनी आपल्या मुलांजवळ झोपणं (Sleeping) टाळावं, असं तज्ज्ञ सांगतात. अर्थात यामागे काही कारणं आहेत.

मुलांनी एक विशिष्ट वय ओलांडलं की पालकांनी आपल्या मुलांजवळ झोपणं (Sleeping) टाळावं, असं तज्ज्ञ सांगतात. अर्थात यामागे काही कारणं आहेत.

मुलांनी एक विशिष्ट वय ओलांडलं की पालकांनी आपल्या मुलांजवळ झोपणं (Sleeping) टाळावं, असं तज्ज्ञ सांगतात. अर्थात यामागे काही कारणं आहेत.

    मुंबई, 27 जुलै : प्रत्येक पालक (Parents) आपल्या पाल्याच्या संगोपनाकडे विशेष लक्ष देत असतात. पाल्याचा शारीरिक आणि मानसिक विकास योग्य पद्धतीनं व्हावा, असा त्यांचा प्रयत्न असतो. बालपणापासून पाल्याचं आरोग्य, आवडीनिवडी, शिक्षण, विकास आदी गोष्टींची पालक काळजी घेत असतात. आपल्या मुलाला सुरक्षित वाटावं, एकटेपणा जाणवू नये यासाठी आई-वडील रात्रीच्या वेळी त्यांच्याजवळ झोपतात. परंतु, ही गोष्ट मुलं आणि पालक अशा दोघांसाठी नुकसानदायी ठरू शकते. मुलांनी एक विशिष्ट वय ओलांडलं की पालकांनी आपल्या मुलांजवळ झोपणं (Sleeping) टाळावं, असं तज्ज्ञ सांगतात. अर्थात यामागे काही कारणं आहेत.

    अमेरिकी अभिनेत्री अ‍ॅलिसिया सिल्व्हरस्टोन (Alicia Silverstone) तिच्या पालकत्वाच्या खास शैलीमुळे नेहमीच चर्चेत असते. `मी माझ्या बीयर या 11 वर्षांच्या मुलाजवळ झोपते,` असा खुलासा तिनं अलीकडेच केला आहे. `मी केवळ नैसर्गिक गोष्टी फॉलो करत आहे,` असंही ती नमूद करते. यावरून अ‍ॅलिसियाला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल (Troll) केलं जात आहे. `तो स्वतंत्र राहणं कसं शिकणार? तू त्याला मदत नाही, तर त्याचं नुकसान करतेयस,` असं एका युझरने तिच्या पोस्टवर कमेंट करताना म्हटलं आहे.

    सोशल मीडियावर एकीकडे अ‍ॅलिसियाच्या को-स्लीपिंग कन्सेप्टवर (Co- Sleeping Concept) टीका होत आहे, तर दुसरीकडे काही जणांना ही गोष्ट योग्य वाटते. अ‍ॅलिसियाच्या या भूमिकेवर एका युझरने ट्विट केलं आहे. `तो म्हणतो, सध्या समाजात अनेक अनाथ फिरताना दिसतात, कदाचित पालकांकडून थोडं अधिक प्रेम हे यावर उत्तर असू शकतं.` हा सर्व प्रकार बघता पालकांनी मुलांजवळ झोपणं योग्य आहे की नाही, किती वयोमर्यादेपर्यंत पालक आपल्या मुलांजवळ झोपू शकतात, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

    जेव्हा तुमच्या मुलांमध्ये शारीरिक बदल (Physical Changes) दिसून यायला लागतात, तेव्हा पालकांनी मुलांजवळ झोपणं बंद केलं पाहिजे. याला प्री-प्युबर्टी (Pre-puberty) अर्थात वयात येण्यास प्रारंभ असं म्हटलं जातं. जेव्हा तुमच्या मुलाचं शरीर लैंगिकदृष्ट्या परिपक्व होऊ लागतं, तेव्हा त्या कालावधीला तारुण्य किंवा प्री-प्युबर्टी असं म्हणतात. या कालावधीत मुलींच्या स्तनांचा विकास होतो. मुलांना दाढी-मिशी येऊ लागते, प्रायव्हेट पार्टचा आकार वाढू लागतो. तसंच अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात.

    `प्री-प्युबर्टी कालावधी सुरू होताच पालकांनी मुलांच्या जवळ झोपणं बंद करावं,` असं न्यूयॉर्कमधल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. रेबेका फिस्क यांनी सांगितलं.

    बालमनोविकारतज्ज्ञ एलिझाबेथ मॅथिस यांनी फिस्क यांच्या मताला पाठिंबा दर्शवला आहे. `तारुण्य (Puberty) ही अशी वेळ आहे, जेव्हा पालकांनी मुलांपासून दूर स्वतंत्र बेडवर झोपायला सुरुवात केली पाहिजे. तारुण्यावस्थेच्या प्रारंभाचं सरासरी वय मुलींसाठी 11 वर्षं आणि मुलांसाठी 12 वर्षं असतं. तथापि, मुलींमध्ये 8 ते 13 वर्षांच्या दरम्यान तारुण्य सुरू होणं ही सामान्य बाब आहे. त्याचवेळी मुलांमध्ये तारुण्य 9 ते 14 वर्षं वयाच्या दरम्यान सुरू होऊ शकतं. तारुण्य सुरू होण्याच्या कालावधीत मुलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे मुलांना त्यांची स्पेस देणं गरजेचं असतं. त्यामुळे त्यांना सहजता जाणवते. तुम्ही तुमच्या मुलांसोबत एकाच बेडवर झोपलात तर त्यांच्या प्रायव्हसीवर (Privacy) परिणाम होऊ शकतो. मुलगा किंवा मुलगी दुसऱ्या खोलीत किंवा वेगळ्या बेडवर झोपला तर त्याला सुरक्षितता जाणवेल. तुमचा किशोरवयीन मुलगा अगर मुलगी कोणत्याही गोष्टीबद्दल नाराज असेल, तर तुम्ही त्याला किंवा तिला तुमच्यासोबत झोपण्यास सांगू शकता,` असं मॅथिस यांनी सांगितलं.

    याबाबत डॉ. रेबेका फिस्क म्हणाल्या, `मी पालकांना कायम सांगते, तुमच्या मुलांसोबत तुम्ही एकाच बेड झोपणं हा सर्वस्वी तुमचा खासगी निर्णय आहे. हा वैद्यकीय दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय असू शकत नाही.`

    एका वेबसाइटशी बोलताना डॉ. फिस्क यांनी सांगितलं, `पालकांनी 12 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांसोबत कधीही बेड शेअर करू नये. कारण यामुळे एसआयडीएस (SIDS) अर्थात सडन इन्फंट डेथ सिंड्रोम आणि गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू होण्याचा धोका असतो. प्रत्येकाच्या झोपेच्या गरजा या वेगवेगळ्या असतात. एकत्र झोपल्याने काही वेळा तुम्हाला आणि तुमच्या मुलांना झोप लागणं कठीण होऊ शकतं. जर तुम्ही तुमच्या पाल्यासोबत झोपत असाल तर त्याला दिवसभरात चांगला आराम मिळाला आहे की नाही याची खात्री करा. असं नसेल तर तुमच्याकडे एकत्र झोपण्याशिवाय अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जसं की तुम्ही एकाच खोलीत वेगळा बेड टाकू शकता. तुमचं मूल झोपल्यानंतर तुम्ही त्या बेडवर झोपू शकता. जेणेकरून तुमचं मूल बेडवर मोकळेपणानं झोपू शकेल. तसंच झोपेच्या वेळी त्याला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. गरज पडल्यास तुम्ही मूल झोपल्यानंतर तुम्ही दुसऱ्या खोलीतही जाऊन झोपू शकता.`

    `पालकांनी मुलांजवळ झोपणं अनेकदा फायदेशीर ठरू शकतं. जेव्हा आई-वडी0ल वेगवेगळे राहतात, तेव्हा ही गोष्ट योग्य आहे. ज्यांच्यासोबत तुम्हाला सुरक्षित वाटतं, त्यांच्या जवळपास राहिल्यानं तुम्हाला खूप बरं वाटू शकतं,`` असं मॅथिस यांनी सांगितलं.

    First published:
    top videos