जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पार्टनरसह Intimate क्षणावेळी अजिबात वापरू नका 'हे' तीन शब्द, रिलेशनशिपमध्ये होईल पश्चाताप

पार्टनरसह Intimate क्षणावेळी अजिबात वापरू नका 'हे' तीन शब्द, रिलेशनशिपमध्ये होईल पश्चाताप

पार्टनरसह Intimate क्षणावेळी अजिबात वापरू नका 'हे' तीन शब्द, रिलेशनशिपमध्ये होईल पश्चाताप

तज्ज्ञ म्हणतात की, हे तीन शब्द केवळ एक रात्रच नाही तर तुमची संपूर्ण लव्ह लाईफ (Love Life) खराब करू शकतात. हा प्रश्न तुमच्या पार्टनरची मानसिक स्थिती (Mental Condition) बिघडवू शकतो

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 10 फेब्रुवारी: सध्या व्हॅलेंटाईन वीक (Valentine’s Week 2022) सुरू झाला असून सगळीकडं प्रेमाचं वारं वाहू लागलं आहे. 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन्स डेला (Valentine’s Day 2022) वर्षातील सर्वात रोमँटिक दिवस (Romantic Day) मानलं जातं. या दिवशी प्रेमात असलेली जोडपी एकमेकांसाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करतात. परदेशात तर आपल्या व्हॅलेंटाईनला इम्प्रेस  करण्यासाठी वाईनसोबत महागड्या भेटवस्तूदेखील खरेदी केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक लव्ह गुरू आणि मानसोपचारतज्ज्ञांनी आपल्या जोडीदारासोबत खासगी क्षण घालवण्यास उत्सुक असलेल्या प्रेमी जोडप्यांसाठी विशेष अॅडव्हायजरी जारी केली आहे. या अॅडव्हायजरीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. द स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, आशा आणि डेव्हिड या रिलेशनशिप एक्सपर्ट (Relationship Expert)असलेल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, प्रायव्हेट मोमेंटच्यावेळी ‘इज इट मी?’ (Is it me?) असा प्रश्न कधीही विचारू नये. तज्ज्ञ म्हणतात की, हे तीन शब्द केवळ एक रात्रच नाही तर तुमची संपूर्ण लव्ह लाईफ खराब करू शकतात. हा प्रश्न तुमच्या पार्टनरची मानसिक स्थिती (Mental Condition) बिघडवू शकतात. इतकंच नाही तर पार्टनर मनोरुग्णही होऊ शकतो. कदाचित रागाच्या भरात तुमचं संपूर्ण आयुष्य खराब होऊ शकेल असा निर्णयही घेतला जाऊ शकतो. हे वाचा- शारीरिक संबंधानंतर लघवी केल्याने प्रेग्नन्सी टाळता येते? 14 फेब्रुवारीपूर्वी या दोन रिलेशनशिप एक्सपर्ट्सनं Do’s And Dont’sची माहिती दिली आहे. जर एखाद्या महिलेनं ‘इज इट मी? हे तीन शब्द इंटिमेट मोमेंटवेळी (Intimate moment) वापरले तर सगळी गडबड होऊ शकते, असं एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. विशेषत: जर त्या महिलेचा पार्टनर इरेक्टाईल डिसफंक्शनचा (ED) सामना करत असेल तर हे तीन शब्द वापरायलाच नकोत. पार्टनरच्या स्थितीवर दया किंवा नाराजी व्यक्त करण्याऐवजी त्याच्यासोबत अगदी सहजपणे वागलं पाहिजे. जेणेकरून त्याच्या मनातील अवघडलेपणा नाहीसा होईल. डॉक्टर्स आणि हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, सुमारे 52 टक्के पुरुषांना त्यांच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या ईडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे घाबरून जाण्याऐवजी योग्य उपचार घेणं आवश्यक आहे. इरेक्टाईल डिसफंक्शन गंभीर किंवा असाध्य रोग नाही. योग्यवेळी योग्य उपचार (Treatment) घेतल्यास तो कायमचा बरा होऊ शकतो. हे वाचा- हनिमूनला गुलाबाच्या फुलांनी का सजवली जाते बेडरुम? Sexual Health साठी फायदेशीर व्हॅलेंटाईन डे किंवा कुठलाही प्रायव्हेट मोमेंट प्रत्येकासाठी खास असतो. त्यावेळी काही गडबड होऊ नये, याची काळजी घेतली तर लव्ह लाईफ चांगली होऊ शकते, असं एक्सपर्ट्स म्हणतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात