जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / शारीरिक संबंधानंतर लघवी केल्याने Pregnancy टाळता येते?

शारीरिक संबंधानंतर लघवी केल्याने Pregnancy टाळता येते?

शारीरिक संबंधानंतर लघवी केल्याने Pregnancy टाळता येते?

फिजिकल रिलेशन ठेवताना हायजिन (Hygiene during physical relation) अर्थात स्वच्छतेसारख्या काही गोष्टींची कटाक्षानं काळजी घेणं आवश्यक आहे. फिजिकल रिलेशनवेळी योग्य प्रकारे हायजिनची काळजी न घेतल्यास त्यामुळे संसर्ग (Infection) तसंच अन्य काही त्रास होऊ शकतो.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 09 फेब्रुवारी: मानवी आरोग्यासाठी सुरक्षित शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवणं फायद्याचं असतं. एका विशिष्ट वयानंतर शरीर आणि मानसिक आरोग्यासाठी फिजिकल रिलेशन अर्थात शारीरिक संबंध ठेवणं महत्त्वाचं आहे. मात्र, फिजिकल रिलेशन ठेवताना हायजिन (Hygiene during physical relation) अर्थात स्वच्छतेसारख्या काही गोष्टींची कटाक्षानं काळजी घेणं आवश्यक आहे. फिजिकल रिलेशनवेळी योग्य प्रकारे हायजिनची काळजी न घेतल्यास त्यामुळे संसर्ग (Infection) तसंच अन्य काही त्रास होऊ शकतो. शारीरिक संबंधानंतर महिलांनी लघवी (Urine) करणं आवश्यक आहे. यामुळे बॅक्टेरिया (Bacteria) निघून जातात आणि संसर्गाची शक्यता कमी होते, असं तज्ज्ञ सांगतात. याव्यतिरिक्त आणखीही काही कारणं यामागे आहेत. फिजिकल रिलेशननंतर युरिन केल्यास गर्भधारणा (Pregnancy) टळते, हा देखील एक चुकीचा समज असल्याचं तज्ज्ञ स्पष्ट करतात. फिजिकल रिलेशन नंतर महिलांनी युरिन करणं आवश्यक आहे. कारण त्यांचा मूत्रमार्ग (Urethra) लहान असतो आणि याभागात बॅक्टेरिया पसरण्याची दाट शक्यता असते. पुरुषांविषयी बोलायचं झालं तर, शारीरिक संबंधादरम्यान त्यांच्या युरिनमध्ये असलेले बॅक्टेरिया महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्रवेश करतात. अशा स्थितीत, जर महिलांनी संबंध ठेवल्यानंतर लगेच लघवी केली तर त्यातील बॅक्टेरिया दूर होतात आणि संसर्गाचा धोका कमी होतो. हे वाचा- व्हायग्रा घेण्याची गरज नाही! लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी दररोज फक्त एक गोष्ट करा फिजिकल रिलेशननंतर युरिन केल्यास गर्भधारणा टळते? फिजिकल रिलेशननंतर युरिन केल्यास गर्भधारणा टळते, ही चर्चा पूर्णतः खोटी आहे. जर महिलांना गर्भधारणा टाळायची असेल तर सुरक्षित शारीरिक संबंधाचा पर्याय निवडणं गरजेचं आहे. गर्भधारणेच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शुक्राणू योनीतून फॅलोपियन ट्यूबमध्ये पोहोचतात. महिलांमधील मूत्रमार्गाची रचना वेगळी असते. त्याचा गर्भधारणेशी काहीही संबंध नसतो. फिजिकल रिलेशननंतर महिलांना युरिनच्या जागी जळजळ जाणवत असेल तर लगेच त्याला युरिन इन्फेक्शन (Urine Infection) समजण्याची आवश्यकता नसते, कारण ही समस्या दोन ते तीन दिवसांत दूर होते. परंतु, महिलांना दीर्घकाळ अशी जळजळ जाणवत असेल तर स्पेशलिस्ट डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य उपचार घेणं आवश्यक आहे. हे वाचा- लग्नाआधी तुमच्या पार्टनरसह करा या 4 मेडिकल टेस्ट, लग्नानंतर येतील समस्या शारीरिक संबंधांनंतर महिलांना अनेकदा संसर्ग होण्याचा धोका असतो. कारण या काळात मूत्रमार्गात बॅक्टेरिया पसरतात. मात्र, 30 मिनिटांच्या आत युरिन केल्यास संसर्गाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर पुरुषांनी युरिन करणं फारसं गरजेचं नसतं. कारण मूत्रमार्गाची रचना काहीशी वेगळी असल्याने पुरुषांना सेक्स करताना संसर्ग होण्याचा विशेष धोका नसतो. त्यामुळे फिजिकल रिलेशननंतर युरिन करायची किंवा नाही हा पुरुषाचा स्वत:चा निर्णय असतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात