Home /News /lifestyle /

हनिमूनला गुलाबाच्या फुलांनी का सजवली जाते बेडरुम? Sexual Health साठी फायदेशीर

हनिमूनला गुलाबाच्या फुलांनी का सजवली जाते बेडरुम? Sexual Health साठी फायदेशीर

आयुर्वेदानुसार गुलाब हे नैसर्गिक कामोत्तेजक आहे. त्याची पानं शरीरातले दोष दूर करतात. यामुळे व्यक्तीला Sexually Active वाटतं. सेक्स लाइफ सुधारण्यासाठी आयुर्वेदामध्ये गुलाबाची पानं धुऊन खाण्याचा सल्ला दिला जातो.

मुंबई, 09 फेब्रुवारी: सध्या व्हॅलेंटाइन्स वीक (Valentine's Week 2022) सुरू आहे. सात फेब्रुवारीच्या रोझ डेपासून (Rose Day 2022) या वीकची सुरुवात होते. प्रेमाचं प्रतीक (symbol of love) म्हणजे गुलाबाचं फूल. यासोबतच गुलाबाच्या फुलांना कोमलता आणि सुंदरतेचं प्रतीकही (symbol of tenderness and beauty) मानलं जातं; पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की हनिमूनच्या (honeymoon) दिवशी नवदाम्पत्याची बेडरूम गुलाबाच्या फुलांनी का सजवली जाते? अनेकदा तुम्ही पाहिलं असेल, की लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात गुलाबाच्या फुलांचा वापर करून सजावट केलेली असते. इतकंच नाही, तर हनिमूनच्या दिवशीही नवरा-नवरीची बेडरूम गुलाबाच्या फुलांनी सजवली जाते. यामागे अनेक कारणं आहेत. सुगंधाचा व्यक्तीच्या मूडशी खूप संबंध आहे. गुलाब हे जगभर प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. याशिवायही अनेक कारणं आहेत, की ज्यामुळे गुलाबाची सजावट केली जाते. हे वाचा-Headaches reasons | शरीरातील 'त्या' 6 कमतरता ज्यामुळे होते डोकेदुखी! गुलाब जल हे अँटी-डिप्रेसंट मानलं जातं. 2011च्या एका अभ्यासात असं दिसून आलं, की गुलाबाच्या पानांमुळे उंदरांची सेंट्रल नर्व्हस सिस्टीम रिलॅक्स होते. यामुळे तणावही कमी होतो. म्हणजेच तुमचा मूड चांगला नसेल, तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल, तर अशा वेळी तुम्ही गुलाबाच्या फुलाचा वास घेऊ शकता. यामुळे तुमचा मूड चांगला होण्यास मदत होईल. याशिवाय गुलाबाचा वापर विविध प्रकारे केला जातो. ब्युटी प्रॉडक्ट म्हणून गुलाब जल फार पूर्वीपासून वापरलं जात आहे. गुलाब जलाचा वापर त्वचेवरचे सनबर्न बरे करण्यासही करता येतो. आयुर्वेदानुसार गुलाब हे नैसर्गिक कामोत्तेजक आहे. त्याची पानं शरीरातले दोष दूर करतात. यामुळे व्यक्तीला Sexually Active वाटतं. सेक्स लाइफ सुधारण्यासाठी आयुर्वेदामध्ये गुलाबाची पानं धुऊन खाण्याचा सल्ला दिला जातो. गुलाबाच्या फुलांच्या वासाचा परिणामसुद्धा मेंदूवर होतो आणि मूड सुधारतो. या सगळ्या कारणांमुळे हनिमूनच्या दिवशी गुलाबाच्या फुलांनी बेडरूम सजवली जाते. हे वाचा-तुमचा नवरा, बॉयफ्रेंड तुमचाच राहणार; हे औषध घेतल्यानंतर तो चीटिंग करणारच नाही गुलाबाचं फूल हे प्रेमाचं प्रतीक आहे. मनातली प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाचं फूल देणं हा सर्वांत सोपा पर्याय समजला जातो. या फुलाचे इतरही फायदे आपण पाहिले. त्यामुळेच लग्नाची सजावट असेल किंवा हनिमूनसाठी बेडरूम सजवायची असेल, ही सजावट गुलाबाच्या फुलांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. गुलाब हा जणू प्रेमाला समानार्थी शब्द आहे, असं म्हटलं तरी हरकत नाही.
First published:

Tags: Rose

पुढील बातम्या