भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये माणसाने कोणत्या गोष्टी करायच्या आणि नाहीत याबद्दल सविस्तर लिहून ठेवले आहे. काहीजण याचा वापर करतात तर काहींना याबद्दल कोणतीच कल्पना नसते. पण त्यातली एक गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी वाचून तुम्ही नक्कीच विचारात पडाल. आपण ज्या जागी झोपतो तिथे चुकूनही जेवू नका किंवा खाऊ नका असं शास्त्रात लिहून ठेवलं आहे. पण नेमकी हीच गोष्ट अनेकजण विसरून जातात.
झोपण्याच्या ठिकाणी खाणं खाल्ल्याने देव क्रोधित होऊ शकतात आणि त्यामुळे अनेक संकटं तुमच्यावर कोसळू शकतात. प्राचीन वेदांनुसार, तुम्ही ज्या जागी झोपता तिथे कधीही जेवण घेऊन जाऊ नये. असं केल्याने तुम्ही अन्न देवतेचा अपमान करता. असं केल्याने कुटूंबातील सदस्य आजारी पडू शकतात.
या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, चुकूनही झोपण्याच्या ठिकाणी किंवा बेडवर बसून अन्यथा झोपून जेवण करू नका. नेहमी जेवण जमिनीवर बसून करावं. यामुळे तुम्ही अन्न देवतेचा मान ठेवता आणि ती तुमच्यावर कृपादृष्टी ठेवते असं म्हटलं जातं.
टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
डेंग्यूपासून वाचण्यासाठी या शहरात विकलं जातंय 200 रुपयांनी शेळीचं दूध
10 Tips: नियोजन विशीतलं; मौज,मजा आणि आराम मिळेल तिशीत
या इशाऱ्यांनी समजून जा मुलगा तुमच्याशी फ्लर्ट करतो की नाही!
ऐकावं ते नवलंच! आजार दूर करण्यासाठी शरीराला लावली जाते आग, असा होतो उपचार
VIDEO: मंत्र्यांची भेट न झाल्यानं शिक्षकांनी उचललं टोकाचं पाऊल, मंत्रालयावरून मारली उडी
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा