जेव्हाही आपल्याला एखादी व्यक्ती आवडते तेव्हा तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपण कळत नकळतपणे अनेक गोष्टी करत असतो.
यात फ्लर्ट करणं ही एक गोष्ट तर येतेच. अनेकदा समोरची व्यक्ती फ्लर्ट करतेय की नाही हे कळणं कठीण असतं. पण त्या गोष्टी जाणून घेण्याच्या काही टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलताना सतत ते सिंगल असल्याचा उल्लेख करत असतील आणि तुमचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा अर्थ असा समजावा की, त्यांना तुम्ही आवडता आणि तुम्हाला ते कळावं म्हणून ती व्यक्ती सतत सिंगल असल्याचं सांगत आहे.
जर ती व्यक्ती तुम्हाला म्हणाली की ती फक्त तुमच्याकडे पाहते आणि दुसऱ्या कोणाकडेच पाहत नाही आणि तुम्हीही त्यांना इतरांपेक्षा तुमच्याकडे पाहताना बघितलं असेल तर समजून जा की त्या व्यक्तिला तुम्ही आवडता.
त्यांचा स्पर्श हा इतर स्पर्शांपेक्षा वेगळा असतो. जर ते तुम्हाला सतत स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतील आणि त्यांच्या प्रत्येक स्पर्शात तुम्हाला भाव जाणवत असेल तर समजून जा की त्यांना तुम्ही पसंत आहात.
सध्या तर सोशल मीडियाचा जमाना आहे. तुमच्याबद्दल त्याला काय वाटते हे तुम्हाला लगेच कळू शकेल. जर ती व्यक्ती तुमचे सर्वच फोटो लाइकर आहेत तसेच मीम्समध्ये टॅग करत आहे तर समजून जा की त्याला तुम्ही आवडता.