पैसा असता तर फिरायला मिळालं असतं, जग फिरून आलो असतो एवढंच काय तर स्वतःवर खर्च केला असता असे अनेक विचार विशीत मनात येत असतात.
खिशात आवश्यक तेवढा पैसा नसल्याने सगळीच स्वप्न जशीच्या तशी राहतात. जर तुम्ही विशीत योग्य नियोजन केलं तर तिशीत तुमची सगळी स्वप्न पूर्ण होऊ शकतात.
विशीत जर तुम्हाला पैसे कमावण्याची संधी मिळाली तर ती संधी दवडू नका. योग्य त्या मार्गाने परिश्रम करून पैसे कमवा. तसेच जी नोकरी करण्यात तुम्हाला अजिबात आनंद मिळत नसेल तर ती नोकरी करण्यात वेळ घालवू नका. तात्काळ ती नोकरी सोडून पुढे जा.
आनंदासाठी आणि यशासाठी फक्त तुम्हीच जबाबदार आहात. त्यामुळेच कोणतीही गोष्ट करताना तक्रार करू नका. उलट मिळेल ते काम आनंदाने करण्याचा प्रयत्न करा.
लोक तुमच्या कामाबद्दल अनेक गोष्टी बोलत असतील. ती प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्याची गरज नाही. तसेच त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी केल्याच पाहिजेत असं काही नाही. नोकरी बाबत तुम्हाला जे योग्य वाटतं ते करण्यााला प्राधान्य द्या.
अशा गोष्टींची यादी तयार करा ज्याबद्दल तुम्ही जराही तडजोड करू शकत नाही. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात आनंदी कसं राहता येईल याचं नियोजन करा.
तुम्हाला एखादी गोष्ट करण्यात भीती वाटत असेल तर त्या सर्व गोष्टी याच वयात करा. जर तुम्हाला उंचीची भीती वाटत असेल तर स्कायडाइव करून तुम्ही तुमची ही भीती काढून टाका.
अनेकदा आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात त्या कधी मिळत नाही आणि आपण ज्या गोष्टींचं नियोजन करतो त्या गोष्टीही सुरळीत होत नाहीत. अशावेळी आयुष्याला फार गांभीर्याने घेऊ नका. जे जसं चाललंय तसं चालू दे.
टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.