मुंबई, 20 ऑक्टोबर : दिवाळी हा हिंदू लोकांसाठी खूप महत्त्वाचा आणि मोठा सण आहे. या सणाची लोक वर्षभर वाट पाहतात. सण जवळ येताच लोकांची तयारी सुरु होते. घराची साफसफाई, घराची सजावट, नवीन कपडे, पार्लर, मेकअपचे सामान, घराला लावण्यासाठी लायटिंग, आकशकंदील, पणत्या….. आणि खूप काही. लोक दिवाळीच्या सणाची अगदी जय्यत तयारी करतात. मात्र दिवाळी तील छोटी म्हटल तर चालेल पण तितकीच महत्त्वाची गोष्ट कोणती असेल? ती आहे रांगोळी . दिवाळीत घरासमोर रांगोळी काढल्याने सणाची शोभा वाढते. त्यामुळे दिवाळीपूर्वी रांगोळी हा खूप महत्त्वाचा विषय असतो. दिवाळीच्या प्रत्येक दिवसासाठी एक वेगळी आणि सुंदर रांगोळी प्रत्येकजण शोधत असतो. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच हटके आणि सुंदर रांगोळ्यांच्या डिझाईन घेऊन आलो आहोत. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी यातील एक रांगोळी तुम्ही काढू शकता.
Diwali 2022 : बाजारात पैसे घालवण्याची गरज नाही; टाकाऊ वस्तूंपासूनच घरीच बनवा Rangoli Toolsवसुबारस : वसुबारस हा ग्रामीण भागांत आजही खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. आश्विन वद्य द्वादशीला वसुबारस साजरी केली जाते. यालाच गोवत्स द्वादशी असंही म्हटलं जातं. हिंदू धर्मामध्ये गायीला महत्त्वाचं स्थान आहे. गायीला गोमाता म्हणून संबोधलं जातं. गोमातेच्या प्रति कृतज्ञता, तिचा सन्मान म्हणून वसुबारस साजरी केली जाते. वसुबारसेच्या पूजेबाबत अनेक श्रद्धा आहेत. अनेक जन्मांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि गायीच्या शरीरावर जेवढे केस आहेत तितकी वर्षं आपल्याला स्वर्ग मिळावा अशा इच्छापूर्तीसाठी ही पूजा केली जाते, असं सांगितलं जातं.
ज्यांच्या घरी गुरं असतात त्यांच्याकडे वसुबारसेला पुरणाचा स्वयंपाक केला जातो. संध्याकाळी दारासमोर, अंगणात सडा घालून रांगोळी काढली जाते आणि नंतर गायीची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. यंदा वसुबारसच्या निमित्ताने तुम्ही ही चमच्याच्या साहाय्याने काढलेली रांगोळी ट्राय करू शकता. ही रांगोळी अगदी कमी वेळेत पूर्ण होते आणि खूप सुंदरही दिसते.
धनत्रयोदशी : धनत्रयोदशीला ही कळस असलेली सुंदर आणि अगदी सोपी रांगोळी ट्राय करा. देवघरासमोर ही रांगोळी अगदी शोभून दिसेल.
लक्ष्मी पूजन : लक्ष्मी पूजन हाच दिवाळीतील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी लक्ष्मीची पूजा करून नंतर फटाके उडवले जातात. फराळाच्या पदार्थांचा आनंद घेतला जातो. या दिवशी तुम्ही घराच्या उंबरठ्यावर किंवा देवघरासमोर लक्ष्मीची पावलं काढू शकता.
दिवाळीला लक्ष्मी पूजनासाठी तुम्ही लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढू शकता. लक्ष्मीची पावलं असलेली ही रांगोळी काढायला अगदी सोपी आहे. मात्र ही खूपच सुंदर दिसते.
पाडवा : पाडवा या सणाच्या दिवशी तुम्ही साधी आणि सुंदर गुलाबाच्या फुलांची रांगोळी काढू शकता. पतिपत्नीच्या नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या या सणाला गुलाबापेक्षा उत्तम काय असू शकता. यामध्ये पिवळ्या ऐवजी तुम्ही लाल गुलाबही काढू शकता.
भाऊबीज : दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज . भावा-बहिणीच्या पवित्र नात्यातला गोडवा कायम राखणारा हा सण आहे. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. याच दिवसाला यमद्वितीया असंही म्हणतात. संपूर्ण भारतात भाऊबीज साजरी केली जाते. उत्तर भारतात या दिवसाला भाईदूज असं म्हणतात. या दिवशी बहीण भावाचं औक्षण करून त्याला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करते. दिवाळीत लक्ष्मीची पूजा करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, घरात कायम भरभराट होईल! दिवाळी शरद ऋतूत येते. त्यामुळे थोडीशी थंडी सुरू झालेली असते. दिवस लहान आणि रात्र मोठी व्हायला सुरुवात झालेली असते. भाऊबीजेला आकाशात चंद्रकोर पाहून आधी त्या चंद्रकोरीचं औक्षण करून मग भावाचं औक्षण करण्याची पद्धतही काही ठिकाणी आहे. अशा या भाऊबीजेला तुम्ही छोट्या भाऊ बहिणीचे चित्र असलेली ही रांगोळी तुम्ही काढू शकता. ही रांगोळी खुप सोपी आणि सुंदर आहे.
दिवाळीला या सर्व सुंदर आणि सोप्या रांगोळी डिझाईन नक्की ट्राय करा. तुमचा सण अगदी आनंदी आणि शुभ होवो… दिवाळीच्या शुभेच्छा…!