हिंदू संस्कृतीमध्ये रांगोळीला (Rangoli) अनन्यसाधारण महत्त्व आहे. रांगोळी अत्यंत शुभ मानली जाते. पांढऱ्या रंगाच्या रांगोळीनं घरांच्या उंबऱ्यांमध्ये रांगोळीच्या किमान दोन रेषा तरी रोज काढल्या जातात. पूर्वी घरांना मोठमोठी अंगणं असायची. या अंगणांमध्ये सडासारवण करून घरातल्या स्त्रिया दररोज रांगोळी काढायच्या. आज अंगणं राहिली नसली तरीही रांगोळीचं महत्त्व कायम आहे. जमीन शेणाने सारवल्यानंतर ती तशीच ठेवणं अशुभ मानलं जायचं. त्यामुळे त्यावर रांगोळीच्या चार रेषा तरी काढल्या जातात.
स्वस्तिक, गोपद्मं म्हणजे गायीची पावलं, लक्ष्मीची पावलं, सूर्य, चंद्र, शंख, चक्र, गदा, कमळाचं फूल, बिल्वदल, अष्टदल, का