जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / दिवाळीत लक्ष्मीची पूजा करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, घरात कायम भरभराट होईल!

दिवाळीत लक्ष्मीची पूजा करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, घरात कायम भरभराट होईल!

दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची माहिती.

दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची माहिती.

लक्ष्मीची आपल्यावर निरंतर कृपा राहावी असं सर्वांनाट वाटतं. यासाठी श्रद्धेने पूजा-अर्चा, व्रतवैकल्यं केली जातात. लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी धार्मिक रूढींचं पालन करणं आवश्यक आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : दिवाळी आता काही दिवसांवर आली आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. दिवाळी म्हटलं, की सर्वांचा उत्साह द्विगुणित होतो. नव्या वस्तू विकत घेतल्या जातात. भरपूर शॉपिंग केलं जातात. दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. घरातला पैसाअडका, धनधान्य, सुखसमृद्धी अखंडित राहो, हा लक्ष्मीपूजनाचा मुख्य हेतू. लक्ष्मीपूजन करताना काही गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊ या. याबद्दल माहिती देणारं वृत्त ‘जागरण’ने दिलं आहे. धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस. यानंतर नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज हे दिवाळीचे दिवस असतात. भाऊबीजेच्या दिवशी दिवाळीची सांगता होते. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं विशेष महत्त्व आहे. पुराणात या प्रत्येक दिवसाचं महत्त्व सांगणाऱ्या कथा आहेत. दिवाळीचा पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. दिवाळीच्या दिवशी गणपती आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. यंदा 24 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. याच दिवशी नरक चतुर्दशी आहे. 25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण आहे. लक्ष्मीपूजन करताना काही गोष्टी पाळणं आवश्यक आहे. दिवाळीत पणती लावण्याची योग्य पद्धत माहिती आहे का? कुठल्या दिशेला असावी ज्योत? लक्ष्मीपूजन करताना पाळावयाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी · लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चौघडिया मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार दिलेल्या मुहूर्तावर पूजा केल्यास लक्ष्मीदेवीची कृपादृष्टी राहते. · लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीसोबत, गणेश पूजन केलं जातं. कुबेर आणि देवी सरस्वतीचीही पूजा केली जाते. · याच दिवशी देवीसमोर तुपाचं निरांजन किंवा समई लावावी, जेणेकरून लक्ष्मी प्रसन्न राहते. · लक्ष्मीपूजनापूर्वी एक कलश ठेवावा. त्या कलशाच्या गळ्याभोवती लाल-पिवळ्या रंगाचा धागा बांधावा. कलशात पाणी ठेवावं. त्यावर आंब्याची पानं ठेवावीत. · दिवाळीच्या दिवशी दारावर तोरण बांधावं. तसंच लक्ष्मीच्या पावलांचा छाप रांगोळीने काढावा. ही पावलं घरात प्रवेश करतायत अशा दिशेने काढावीत. Diwali 2022 : का साजरी केली जाते दिवाळी? जाणून घ्या महत्त्व आणि शुभ मुहूर्त · महालक्ष्मीची पूजा करताना मखाणा, शिंगाडा, बत्तासा, खीर, डाळिंब, पान, पिवळ्या आणि पांढर्‍या रंगाची मिठाई, ऊस या गोष्टी देवीला अर्पण कराव्यात किंवा पूजेच्या वेळी वाहाव्यात. · महालक्ष्मी आणि गणपतीची पूजा करताना तुमचं तोंड उत्तरेकडे किंवा उत्तर-पूर्व दिशेकडे असावं. · महालक्ष्मीची पूजा करताना कुबेर यंत्रही योग्य दिशेने ठेवावं. त्यामुळे तुम्हाला धनलाभ होईल. लक्ष्मीची आपल्यावर निरंतर कृपा राहावी असं सर्वांनाट वाटतं. यासाठी श्रद्धेने पूजा-अर्चा, व्रतवैकल्यं केली जातात. लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी धार्मिक रूढींचं पालन करणं आवश्यक आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात