मुंबई, 23 ऑक्टोबर : दिवाळी हा आनंदाचा आणि चैतन्याचा सण आहे. मिठाईशिवाय या सणाचा रंग फिका पडतो. दिवाळीत अनेक प्रकारच्या चवीच्या मिठाई बनवल्या जातात, ज्याच्या चवीपासून अनेक मधुमेही रुग्ण वंचित राहतात. मात्र, आता बाजारात अनेक शुगर फ्री आणि डायबिटीस फ्रेंडली मिठाई उपलब्ध आहेत ज्यात गोड पदार्थाचा वापर कमी प्रमाणात केला जातो. पण त्यात रिफाइंड साखर वापरण्यात आली आहे की नाही, याची कोणतीही शाश्वती नाही. मात्र या दिवाळीत तुमची घरगुती मिठाई सणाचा आनंद द्विगुणित करू शकते. घरगुती मिठाई शुद्ध असेल आणि आवश्यकतेनुसार गोडवा वापरता येईल. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मिठाईमध्ये कोणते गोड पदार्थ वापरले जाऊ शकतात ते जाणून घेऊया.
डायबिटीजच्या रुग्णांनी नाश्त्यात अंड्यांसोबत हे 4 पदार्थ खावेत; शुगर राहील नियंत्रणातमिठाई गोड करण्यासाठी या गोष्टींचा वापर करा खजूर : खजूरचा वापर दिवाळीच्या गोड पदार्थांसाठी करता येतो. खजूर गोड म्हणून वापरता येतात. खजूरमध्ये कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात जे साखरेची पातळी वाढू देत नाहीत. याशिवाय, हे लोहाचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. खजूर लाडू आणि हलव्यात वापरता येतात.
मनुका : मनुका एक उत्कृष्ट गोडवा आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही मनुका फायदेशीर आहे. मनुके बारीक करून कोणत्याही माव्याच्या मिठाईत किंवा हलव्यात घालता येतात. मात्र, मिठाई बनवण्यासाठी जास्त मनुके वापरावे लागतील. गूळ : बरेच लोक साखरेऐवजी मिठाई बनवण्यासाठी गुळाचा वापर करतात. गूळ गोडही असतो आणि लाभदायकही असतो. मात्र गुळाचेही सेवन तुम्ही कमी प्रमाणात करायला हवे.
आठ वर्षांत एकदाच येतात ब्लॅक डायमंड अॅपल, जाणून घ्या किंमत आणि फायदेमध : मध हे एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे जो कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्याचे काम करतो. मात्र मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवनही कमी प्रमाणात करावे. गरम पदर्थामध्ये मधाचा वापर करू नये, म्हणून कोणतेही गोड पदार्थ बनवल्यानंतर मधाचा ड्रेसिंग म्हणून वापरता येते.

)







