मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आठ वर्षांत एकदाच येतात ब्लॅक डायमंड अ‍ॅपल, जाणून घ्या किंमत आणि फायदे

आठ वर्षांत एकदाच येतात ब्लॅक डायमंड अ‍ॅपल, जाणून घ्या किंमत आणि फायदे

या काळ्या सफरचंदाची (Black apple) किंमत लाल सफरचंदापेक्षा कितीतरी जास्त असते. जर तुम्ही कधी काळं सफरचंद पाहिलं नसेल तर त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

या काळ्या सफरचंदाची (Black apple) किंमत लाल सफरचंदापेक्षा कितीतरी जास्त असते. जर तुम्ही कधी काळं सफरचंद पाहिलं नसेल तर त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

या काळ्या सफरचंदाची (Black apple) किंमत लाल सफरचंदापेक्षा कितीतरी जास्त असते. जर तुम्ही कधी काळं सफरचंद पाहिलं नसेल तर त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Lanja, India

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : साधारणपणे सफरचंद जेव्हा गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचं दिसू लागतं, तेव्हा ते कुजलंय किंवा त्यात किडलंय, असं समजलं जातं. पण जगात असं एक सफरचंद आहे, जे नैसर्गिकरित्या काळ्या रंगाचं आहे. मुख्य म्हणजे या काळ्या सफरचंदाची (Black apple) किंमत लाल सफरचंदापेक्षा कितीतरी जास्त असते. जर तुम्ही कधी काळं सफरचंद पाहिलं नसेल किंवा तुम्हाला त्याबद्दल काही माहिती नसेल, तर आज आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित माहिती देणार आहोत.

कृषी जागरण आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या सफरचंदाला ब्लॅक डायमंड अ‍ॅपल म्हणतात. ती तिबेट आणि भूतानमध्ये आढळतात. याशिवाय या सफरचंदाची झाडं अमेरिकेतदेखील आढळतात आणि तिथे त्यांना अर्कान्सास अ‍ॅपल म्हणतात. हे सफरचंद हुआ नियू प्रजातीचं सफरचंद आहे, जे एका खास कारणामुळे काळं होतं आणि जगभरात फार क्वचित ठिकाणी आढळतं.

सफरचंद काळी का असतात?

आता हे सफरचंद काळ्या रंगाचं का असतं, ते जाणून घेऊ. तर या सफरचंदाचं उत्पादन तिबेटच्या न्यिंगची भागात सर्वांत जास्त होतं. तिथे सूर्याची किरणं थेट पडतात. त्यामुळे दिवसा अल्ट्राव्हॉयलट किरणं सफरचंदांवर मोठ्या प्रमाणात पडतात आणि रात्री तापमान वेगाने कमी होत जातं. तापमानातील हा बदल सफरचंदाच्या बाह्य भागावर परिणाम करतो आणि त्यामुळे त्याचा रंग काळा होतो; पण सफरचंदाचा आतला भाग मात्र बाहेरून लाल असलेल्या सफरचंदासारखा पांढरा असतो.

काळं सफरचंद पिकवणं किती कठीण आहे?

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की हे सफरचंद पिकवणं खूप कठीण आहे, त्यामुळे शेतकरी त्याचं पीक घेत नाहीत. या झाडावर फळं 5 ते 8 वर्षांत येतात आणि फक्त 2 महिने टिकतात. त्यामुळेच ही फळं बाजारापर्यंत सहजासहजी पोहोचू शकत नाहीत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ते बाकी सफरचंदांच्या तुलनेत जास्त गोड आणि खुसखुशीत असतात. दुसरीकडे या सफरचंदाच्या फायद्यांबद्दल बोलायचं झाल्यास हे सफरचंद आरोग्यास लाल सफरचंदांइतकं फायदेशीर नाही.

हे वाचा - दूधाची चहा पिताय? थांबा.... ती शरीरासाठी फायद्याची की तोट्याची? आधी वाचा

सफरचंदाची किंमत किती?

खरं तर आम्ही तुम्हाला या काळ्या सफरचंदांबद्दल बरीच माहिती सांगितली आहे, त्यामुळे तुम्हाला त्याच्या किमतीबद्दल उत्सुकता लागली असेल. ही काळी सफरचंद खूप महाग असून, एका सफरचंदाची किंमत 500 रुपयांपासून ते 1600 रुपयांपर्यंत असते. अशा रितीने फार क्वचित मिळणारं हे काळं सफरचंद आरोग्यासाठी साध्या सफरचंदाइतकं फायदेशीर नसलं तरीही रंगामुळे आणि दुर्मिळ असल्याने ते फार प्रसिद्ध आहे.

First published:

Tags: Agriculture, Apple