सध्या सगळीकडेच इंग्रजी बोलता येणं आणि लिहिता येणं महत्त्वाचं झालं आहे. अनेक खासगी नोकऱ्यांमध्ये इंग्रजीला प्राधान्य दिलं जातं. या भाषेमुळे आपसूक तुमच्यात एक आत्मविश्वास निर्माण होतो. सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या दिवसांमध्ये इंग्रजी भाषेला पर्याय नाही. इंग्रजीमुळे फक्त भारतातच नाही तर जगभरातील कोणत्याही ठिकाणी तुम्ही सहज संवाध साधू शकता. असं असतानाही असे अनेक लोक आहेत जे इच्छा असूनही इंग्रजी बोलू शकत नाहीत. आज आम्ही तुम्हाला सहज इंग्रजी बोलण्याच्या काही टीप्स सांगणार आहोत. इंग्रजी बोलण्यासाठीचं वातावरण तयार करा- कोणतीही भाषा शिकण्यासाठी त्या पद्धतीचं वातावरण असणं फार गरजेचं आहे. इंग्रजी बोलणं शिकायचं असेल तर सर्वातआधी त्या पद्धतीचं वातावरण तयार करण्याची गरज आहे. यासाठी तुम्ही इंग्रजी वर्तमानपत्र वाचायला सुरुवात करा. तसेच इंग्रजी गाणी, हॉलिवूडपट पाहा आणि इंग्रजी पुस्तकं वाचा. मार्गदर्शक निवडा- जो अस्खलित इंग्रजी बोलू आणि लिहू शकतो अशा व्यक्तीला मार्गदर्शक करा. तुमचा एखादा नातेवाईक, मित्र- मैत्रिण, शेजारचे किंवा इंग्रजी शिकवणाऱ्या संस्थांपैकी कोणालाही आपलं मार्दगर्शक करा आणि त्यांच्याकडून इंग्रजीचे धडे गिरवून घ्या. एखादा मार्गदर्शक जरी नाही भेटला तरी तुम्ही स्वतः प्रयत्न करून ही भाषा सहज शिकू शकता. पहिल्याच दिवशी अतीआत्मविश्वास बाळगू नका- जर इंग्रजी शिकण्याच्या पहिल्याच दिवशी तुमच्यात अतीआत्मविश्वास आला तर तुम्ही ही भाषा पूर्ण कधीच शिकू शकत नाही. तुम्ही योग्य बोलत आहात की नाही हे तुम्हाला कधी कळणारच नाही. सुरुवातीचे एक ते दोन महिने कोणताही ताण न घेता तुमच्या मनात जसं येतं तसं बोला. तुम्ही योग्य बोलत आहात की नाही याचा फार विचार करू नका. हळू- हळू तुमच्यातील भीती दडपून जाईल. याशिवाय तुम्ही एकटे असताना किंवा ग्रुपमध्ये इंग्रजी वर्तमानपत्रातली एखादी बातमी किंवा लेख मोठ्याने वाचा. जोरजोरात वाचल्याने तुमचे उच्चार योग्य होतील आणि बोलण्याचा आत्मविश्वासही वाढेल. तसेच आरशासमोर इंग्रजी बोलण्याचा सराव करा. सुरुवातीच्या काळात कठीण इंग्रजी लेख वाचायला जाऊ नका. सोप्या लहान मुलांच्या गोष्टींपासून इंग्रजी वाचायला सुरुवात करा. यासोबतच स्पोकन इंग्रजीसाठ इंटरनेटचा भरपूर प्रमाणात वापर करा. यू-ट्यूबवर इंग्रजी बोलण्याचे अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. याचा पूर्ण फायदा घ्या. याशिवाय प्लेस्टोअरमध्येही अनेक अॅप उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही इंग्रजी शिकू शकता. बॉयफ्रेंडने खाऊ घातली पाणीपुरी, नंतर झाले असे काही की…. पाहा हा Viral Video Diabetes Diet: हे नाश्ताचे प्रकार मधुमेहाच्या रुग्णांना आहेत वरदान लठ्ठपणा कमी करायचा असेल तर आजच खाणं सोडा या भाज्या! दिवाळीत फक्त 5 हजार रुपयांमध्ये फिरा या भन्नाट ठिकाणी कमी पैशांत दिवाळीची खरेदी करायची असेल तर या 4 वेबसाइटवर नक्की जा!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







