मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /फक्त 2 दिवसांसाठी सासूचा बॉयफ्रेंड व्हा 72 हजार रुपये घेऊन जा; सूनबाईने दिली ऑफर

फक्त 2 दिवसांसाठी सासूचा बॉयफ्रेंड व्हा 72 हजार रुपये घेऊन जा; सूनबाईने दिली ऑफर

सासूबाईंसाठी सूनबाईला हवाय असा बॉयफ्रेंड.

सासूबाईंसाठी सूनबाईला हवाय असा बॉयफ्रेंड.

सासूबाईंसाठी सूनबाईला हवाय असा बॉयफ्रेंड.

वॉशिंग्टन, 17 जुलै : आपल्याला आयुष्याचा असा जोडीदार (Life Partner) हवा, तसा जोडीदार हवा हे सोशल मीडियावर सांगणं तसं काही आता नवीन नाही. कितीतरी जोड्या (Couple) सोशल मीडियावरच तयार होतात. लोक आपल्या लग्नासाठी योग्य असा जोडीदार मिळावा यासाठी जाहिरातीही देतात. पण आता चक्क एका सूनबाईने (Daughter in law) आपल्या सासूबाईसाठी (Mother in law) जाहिरात दिली आहे. ही सूनबाई आपल्या सासूबाईसाठी जोडीदार (Daughter in law advertise for mother in law) शोधत आहे. हा जोडीदार आयुष्यभरासाठी नव्हे तर फक्त दोन दिवसांसाठीच हवा आहे, ज्याला ही महिला पैसेसुद्धा देणार आहे (Daughter in law want boyfriend for mother in law) .

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील एका महिलेनं आपल्या 51 वर्षांच्या सासूसाठी बॉयफ्रेंड हवा अशा आशयाची जाहिरात दिली आहे. आपल्या सासूसोबत दोन दिवस राहिले असा बॉयफ्रेंडच्या शोधात आपण आहोत. फक्त दोन दिवस आपल्या सासूसोबत राहणाऱ्याला एक हजार डॉलर्स म्हणजे तब्बल 72 हजार रुपयांचीही ऑफर दिली आहे.

हे वाचा - एका लग्नाची जबरदस्त हटके गोष्ट! नवरा-नवरीच्या Wedding Video मध्ये भलताच ट्विस्ट

या महिलेला एका लग्नाला जायचं आहे. या लग्नात तिला आपल्या सासूलाही सोबत नेण्याची इच्छा आहे. या वेडिंग पार्टीत आपली सासूसुद्धा सुंदर कपड्यात एखाद्या कपलप्रमाणे असावी, असं तिला वाटतं आहे.  जाहिरातीत या महिलेनं सांगितल्यानुसार, ती ऑगस्टमध्ये हडसन वॅलीत एका लग्नासाठी शुक्रवारी संध्याकाळी ते शनिवारी संध्याकाळपर्यंत आपण आपल्या सासूसाठी बॉयफ्रेंडच्या शोधात आहे. त्याला दोन दिवस माझ्या सासूसोबत राहावं लागेल.

हा बॉयफ्रेंड नेमका कसा असावा आणि त्याला दोन दिवस काय करावं लागेल हेसुद्धा या महिलेने या जाहिरातीत सांगितलं आहे.  त्याचं वय  40 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावं. तो चांगला डान्सर असावा, त्याला चांगला संवादही साधता यायला हवा. म्हणजे तो बोलका असावा. आपली सासू पांढऱ्या रंगाचे कपडे घालेल. भाड्याने घेतलेल्या बॉयफ्रेंडला तिच्यासोबत एक कपलप्रमाणे राहण्याचं नाटक करावं लागेल. त्या बॉयफ्रेंडने आपल्या सासूची काळजी घ्यावी, असं तिनं जाहिरातीत सांगितलं.

हे वाचा - Suction Cup Fish : या माशाची KISS आहे खूप लकी; किस करताच चमकेल तुमचं नशीब

आज तकच्या रिपोर्टनुसार रेडिटवर ही जाहिरात शेअर करण्यात आली आहे. त्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही जणांनी तर या महिलेच्या सासूचा बॉयफ्रेंड होण्याची तयारीसुद्धा दर्शवली

First published:
top videos

    Tags: America, Couple, Relationship