मुंबई, 16 जुलै : काही जणांना मासे
(Fish) खायला आवडतात, काही जणांना पाहायला. तर बहुतेकांना आपल्या घरात फिश टँकमध्ये
(Fish tank) मासे असलेले खूप आवडतात. फिश टँकमध्ये ठेवल्या जाणाऱ्या माशांमध्ये सर्वात प्रसिद्ध आहेत ते गोल्ड फिश
(Gold fish). ज्यांना लकी
(Lucky fish) मानलं जातं. हे फिश घरातील फिश टँकमध्ये असणं चांगलं असतं, असं सांगितलं जातं. सध्या सोशल मीडियावर असाच आणखी एक लकी मासा चर्चेत आहे. पण हा मासा नाही तर या माशाची किस लकी
(Fish kiss lucky) आहे.
ब्लेक हस
(Blake Hass) नावाच्या व्यक्तीने आपल्या टिकटॉक
(Tiktok) अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात एक विचित्र मासा दिसतो आहे. हा मासा म्हणजे सक्शन कॅप फिश
(Suction cap fish) आहे. ज्याला लम्पफिशही
(Lump fish) म्हटलं जातं.
हे वाचा - 2 Vaginas, 2 Uteruses, तरुणीच्या शरीरात 2 Private Part; लग्नाआधी बसला मोठा धक्का
माहितीनुसार या माशाच्या शरीराच्या खालच्या बाजूला एक सक्शन कप असतो. ज्यामार्फत त्यांना भिंतीवरही चिकटवता येतं. ब्लॅकने व्हिडीओतसुद्धा हा मासा पाण्याबाहेर राहून भिंतीवर कसा चिकटतो हे दाखवलं आहे. या माशाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फिमेल लम्पफिश अंडी दिल्यानंतर तिथून निघून जाते. त्यानंतर मेल लम्पफिश या अंड्यांची देखभाल करतो.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या माशाला पाण्यात सोडण्यापूर्वी किस करण लकी असतं, असं मानलं जातं. माहितीनुसार ब्लॅकनेसुद्धा या माशाला किस केलं पण त्याने असं करताना व्हिडीओ बनवला नाही आहे. ब्लेक एक टिकटॉक स्टार आहे. त्याचे बरेच फॉलोअर्स आहेत. एका युझरने तर ब्लेकला मला वाटतं तू मस्करी करत आहेस. तू खरंच या माशाला किस तर नाही केलंस ना?, असंही विचारलं.
हे वाचा - नोकरी, व्यापारातील प्रगतीसाठी लाभदायक आहे पाचू; मात्र काही राशींचा करतो घात
ब्लेकने हा व्हिडीओ शेअर करताच सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आणि त्यावर बऱ्याच कमेंट आला. अनेकांना हा मासा खूप आवडला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.