Home /News /lifestyle /

एका लग्नाची जबरदस्त हटके गोष्ट! नवरा-नवरीच्या Wedding Video मध्ये भलताच ट्विस्ट

एका लग्नाची जबरदस्त हटके गोष्ट! नवरा-नवरीच्या Wedding Video मध्ये भलताच ट्विस्ट

नवरा-नवरीने (Groom and bride) सुरुवातीला सांगितलेली लव्ह स्टोरी (Love story) म्हणजे फक्त ट्रेलर आहे. त्यांच्या लव्ह स्टोरीचं म्हणा किंवा लग्नाचा म्हणा खरा पिक्चर तर या लग्नाच्या व्हिडीओच्या (Wedding video) शेवटी त्यांनी दाखवला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 16 जुलै : सुरुवातीला लग्नाचा (Wedding) सुंदर क्षण फक्त फोटोरूपात जपून ठेवला जात असे. पण आता तो व्हिडीओरूपातही (Wedding Video) जतन केला जातो. असे बरेच वेडिंग व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर (Wedding Video Viral)  पाहिले असतील. प्रत्येक लग्नाच्या व्हिडीओमध्ये काही ना काही खास असतं. बहुतेक व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की नवरा-नवरी (Bride and groom) आपली लव्ह स्टोरी (Love story) सांगतानाही दिसतात. अशाच नवरा-नवरीच्या (Groom and bride) लव्हस्टोरीसह लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media) होतो आहे. ज्यात जबरदस्त ट्विस्ट (Twist in wedding video) पाहायला मिळतो. नवरा-नवरीची क्युट, प्रेमळ जोडी दिसून येते आहे (Wedding Couple). ते आपली लव्ह स्टोरी सांगतात. लव्ह स्टोरी ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल व्वा हे तर एकमेकांसाठी एकदम परफेक्ट कपल आहे. दुल्हनिया इन्स्टाग्राम अकाऊंटवरील हा व्हिडीओ आहे.
  पण म्हणतात ना दिसतं तसं नसतं. तसंच या लग्नाच्या व्हिडीओच्या बाबतीत आहे. नवरा-नवरीने सुरुवातीला सांगितलेली लव्ह स्टोरी म्हणजे फक्त ट्रेलर आहे. त्यांच्या लव्ह स्टोरीचं म्हणा किंवा लग्नाचा म्हणा खरा पिक्चर तर या व्हिडीओच्या शेवटी त्यांनी दाखवला आहे. जो पाहून तुम्ही शॉकच व्हाल. हे वाचा - VIDEO - नवरीला पाहताच सुटला नवरदेवाच्या मनावरचा ताबा; स्टेजवरच ढासळला तोल आणि... नवरी आज आमचा वेडिंग डे आहे असं सांगून या व्हिडीओची सुरुवात करते. मग नवरा पुढे सांगतो, आम्ही एकमेकांसाठी एकदम परफेक्ट कपल होतो. आमची बाँडिंग चांगली होती, आम्ही एकमेकांना छान समजून  घ्यायचो. एकमेकांबाबत आम्हाला आदरही होता आणि आता तुम्ही पाहू शकता आम्ही कुठे पोहोचलो आहेत. नवऱ्याचं बोलणं समजताच कॅमेरा झूम आऊट होतं आणि खरा पिक्चर समोर येतो. संपूर्ण लव्ह स्टोरी सांगितल्यानंतर अखेर या नवरा-नवरीच्या कहाणीत एक जबरदस्त ट्विस्ट दाखवला आहे. ते दोघं एकमेकांसोबत बसले आहेत  पण त्यांच्याशेजारी आणखी दोन नवरा-नवरी दिसत आहेत. आता तुम्ही म्हणाले हे कोण? तर नंतर दिसलेले नवरा-नवरी आधीच्या नवरा-नवरीचे खरे जोडीदार. म्हणजे ज्यांनी लव्ह स्टोरी सांगितली त्या दोघांचं लग्न एकमेकांसोबत झालेलंच नाही. तर दुसऱ्यासोबतच झालं आहे. या व्हिडीओत ते आपल्या शेजारी बसलेल्या जोडीदाराकडे पाहून हसताना आणि एकमेकांचा हात धरतानाही दिसतात. अखेर नवरीसुद्धा यावरील पडदा अखेर हटवते. ती शेवटी सांगते, बाबा ऐकले नाहीत. याचा अर्थ कुटुंबामुळे या दोघांची प्रेम कहाणी अधुरी राहिली. दोघांनीही आपल्या कुटुंबाच्या मर्जीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे वाचा - बायकोच्या सौंदर्याचं रहस्य काय? चक्क हातोड्याने नवऱ्याने केला पंचनामा काय मग बसला ना तुम्हालाही जोर का झटका. लग्नाच्या व्हिडीओत इतक्या मोठ्या ट्विस्टची अपेक्षा तुम्ही केलीच नसेल नाही का? कोणत्याही फिल्म लव्ह स्टोरी आणि लग्नापेक्षा हा व्हिडीओ कमी नाही. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding video

  पुढील बातम्या