दिल्ली, 8 जून : आपल्या पायांवर चरबी (Fat on Legs) वाढली असेल तर, ते फारच जाड दिसतात. त्यामुळे आपल्याला आवडणारे कपडे आपल्याला घालता येत नाहीत. जीन्स आणि वनपीस सारखे कपडे ट्राय करायची इच्छा असून सुद्धा जाड पायांमुळे घालता येत नाहीत. काही मुलींना शॉर्ट घालायला आवडतात मात्र त्यासाठी सुडौल पाय (Feet Legas) असावे लागतात. म्हणूनच पायांसाठी काही एक्ससाईज (Exercise) देखील करायला हव्यात. या एक्सरसाईजमुळे पायांचा आकार चांगला होईल. त्याबरोबर मजबूत देखील बनतील एक्सरसाईज केल्यामुळे कंबर आणि पायावर वाढायला लागलेली चरबी हळूहळू कमी व्हायला लागते. सेलिब्रेटी फिटनेस ट्रेनर यास्मीन कराचीवाला (Celebrity Fitness Trainer Yasmin Karachiwala) यांनी देखील सुंदर पायांसाठी एक्ससाईज सांगितल्या आहेत त्याचा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरून (Instagram Account) शेअर केला आहे. जाणून घेऊया त्या एक्ससाईज.
टो लिफ्ट्स
या एक्सरसाईजमुळे आपले तळवे मजबूत होऊन बॅलन्स सुधारतो.
यासाठी पायांमध्ये योग्य अंतर घेऊन उभे रहा. शरीर सरळ ठेवा. पायांची बोटं जमिनीपासून वर उचला 1 ते 2 सेकंद त्याच अवस्थेत रहा. यादरम्यान श्वासोच्छवास सुरू ठेवा. पुन्हा पायाची बोटं खाली घ्या. 6 रिपिटेशनचे 3 सेट करा.
(नवरदेवाच्या चपला चोरण्याऐवजी मेहुण्यांनी...; VIDEO पाहून हसू आवर)
अल्टरनेट हील लिप्ट्स
या व्यायामाने पायाच्या पाठीमागच्या भागातले स्नायू मजबूत होतात आणि तळव्यांना सपोर्ट मिळण्यासाठी हा व्यायाम करा.
दोन पायांमध्ये थोडं अंतर घेऊन सरळ उभे राहा. सरळ अभं राहण्यात अडचण येत असेल तर, भिंतीला टेकून देखील उभं राहू शकता. उजव्या पायाचा गुडघा थोडासा दुमडून टाच वर उचला यावेळी दुसरा पाय सरळ ठेवा. काही सेकंद या स्थितीमध्ये राहा. हळूहळू पाय खाली न्या. याप्रकारे दुसर्या पायाने देखील हिच एक्सरसाइज करा. 6 रिपिटेशनचे 3 सेट करा.
View this post on Instagram
अल्टरनेट फुट लिफ्ट विथ हिल्स
या व्यायामात पायाची बोटं वर उचलायची आहेत. यामुळे पायाचे स्नायू मजबूत होतात.
सरळ ताठ उभे रहा. उजव्या पायाचा अंगठा वर उचला आणि दोन-तीन सेकंद याच पोझिशनमध्ये रहा. या दरम्यान संपूर्ण वजन आपल्यावर टाका. हळूहळू अंगठा खाली घ्या. दुसर्या पायाने हीच क्रिया करा. याचेदेखील 6 रिपिटेशन 3 सेट करायचे आहेत.
(Income tax च्या नव्या वेबसाईटमध्ये समस्या, निर्मला सीतारामन यांची प्रतिक्रिया)
रिलिव
हा व्यायाम पायाच्या मागच्या बाजूचे स्नायू मजबूत करतो.
सरळ उभे राहा. आपले गुडघे सरळ ठेवा. दोन्ही हात वर उचलत असताना आपलं संपूर्ण शरीर शक्य तितक्या प्रमाणात ताणण्याचा प्रयत्न करा. आपल्या टाचा देखील वर घ्या. हळूहळू जमिनीवर पाय ठेवा. या एक्ससाईजचे 6 रिपिटेशन 3 सेट करायचे आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Types of exercise, Workout