मुंबई, 08 जून : लग्नाच्या विधींसह अनेक परंपरा, अनेक खेळही असतात. त्यापैकीच एक म्हणजे वधूच्या बहिणींनी वराच्या चपला चोरणं (shoe stole ceremony) आणि त्या बदल्यात नवरदेवाकडून पैसे घेणं. काही भावोजी आपल्या लाडक्या मेहुण्यांची मागणी पूर्ण करतात. तर काही जण मोजक्याच पैशांवर भागवतात. पण काही मेहुण्याही इतक्या हट्टी असतात की आपल्याला जितके पैसे हवे तितके बरोबर भावोजींकडून काढून घेतात. पण याचवेळी नवरदेवाचे भाऊ किंवा मित्रही या मेहुण्यांपासून नवरदेवाला वाचवण्यासाठी तयार असतात. त्यामुळे अनेकदा मेहुण्या चपल चोरण्यात फेल होतात आणि त्यावेळी काय होतं, तेच सांगणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. खरंतर हसून हसून तुमचं पोटच दुखेल. व्हिडीओत पाहू शकता ही मेहुण्या नवरदेवाची चप्पल चोरत नाही आहेत, तर चक्क त्याच्या पायातूनच चप्पल बाहेर काढत आहे. नवरा छान उभा आहे आणि त्याला त्याच्या छोट्या छोट्या मेहुण्यांनी घेरलं आहे. त्या सर्व त्याच्या पायाजवळ आहेत आणि त्याच्या पायातून चप्पल काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
नवरदेव आपल्या पायातील बूट वाचवण्याचा खूप प्रयत्न करतो पण काही फायदा होत नाही. मेहुण्या त्याच्या बुटांवर अशा तुटून पडल्या आहेत, की त्या त्याच्या पायातील बुटं बाहेर काढतातच आणि त्यानंतर मात्र त्यांच्यामध्येच या बुटांसाठी लढाई सुरू होते. त्याचवेळी नवरदेवाचे मित्र आणि भाऊसुद्धा बुटं परत मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. हे वाचा - साडीतल्या या सुंदर नारीला नाजूक समजू नका; तिचा VIDEO पाहून सर्वांना फुटला घाम शिवी तलिकोटीने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.