नवी दिल्ली, 8 जून: इन्कम टॅक्सची (Income tax) नवी वेबसाईट लाँच झाली आहे. वेबसाईट लाँच झाल्यानंतर काही वेळातच त्यात समस्या येत असल्याचं समोर आलं आहे. याबाबत अनेक युजर्सनी तक्रारही केली आहे. याबाबत आता स्वत: अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनीही ट्विट केलं आहे. अर्थमंत्र्यांनी एका ट्विटर युजरच्या तक्रारीवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘नवीन इन्कम टॅक्स पोर्टल काल लाँच केलं गेलं. हे नवं पोर्टल अॅक्सेस करण्यास अनेकांना समस्या येत आहेत.’ असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसंच त्यांनी टेक्नोलॉजी कंपनी Infosys आणि त्याचे को-फाउंडर Nandan Nilekani यांना टॅग करत, टॅक्सपेअर्सला देण्यात येणाऱ्या सर्विसमध्ये क्विलिटीची कोणतीही कमी नसावी असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. नवं इन्कम टॅक्स पोर्टल Infosys कंपनीने तयार केलं आहे. Infosys GSTN चं IT इन्फ्रास्ट्रक्चर हे मॅनेज करत आहे. नवं पोर्टल सोमवारी 7 जून रोजी लाँच करण्यात आलं. पोर्टल लाँच झाल्यानंतर अनेक लोकांनी साईट ओपन होत नसल्याच्या तक्रारी केल्या. अर्थमंत्र्यांनीही याबाबत अनेक लोकांच्या तक्रारी सोशल मीडियावर येत असल्याचं म्हटलं आहे.
The much awaited e-filing portal 2.0 was launched last night 20:45hrs.
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) June 8, 2021
I see in my TL grievances and glitches.
Hope @Infosys & @NandanNilekani will not let down our taxpayers in the quality of service being provided.
Ease in compliance for the taxpayer should be our priority. https://t.co/iRtyKaURLc
(वाचा - तुमच्या कामाची बातमी;Appअसली आहे की नकली?डाउनलोड करण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा )
नव्या पोर्टलमध्ये सर्व प्रकारचे इंटरअॅक्शन आणि अपलोड किंवा प्रलंबित क्रिया एकाच डॅशबोर्डवर प्रदर्शित केल्या जातील. ज्याद्वारे टॅक्सपेअर्स (tax payers) सर्व गोष्टी ट्रॅक करू शकतील. नव्या पोर्टलद्वारे टॅक्सपेअर्सला इन्कम टॅक्स फॉर्म भरणं, टॅक्स प्रोफेशनल्स जोडणं, फेसलेस स्क्रूटनी किंवा नोटिशीला उत्तर देणं यासारखे अनेक फायदे मिळतील. परंतु सध्या हे पोर्टल अॅक्सेस करण्यास युजर्सला समस्या येत आहेत.