मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Cycling Benefits : सायकल चालवण्याने रक्तातील साखर राहते नियंत्रित, या आजारांचा धोकाही होतो कमी

Cycling Benefits : सायकल चालवण्याने रक्तातील साखर राहते नियंत्रित, या आजारांचा धोकाही होतो कमी

सायकल चालवण्याचे फायदे

सायकल चालवण्याचे फायदे

आजकाल फार कमी लोक सायकल चालवताना दिसतात. तुम्हाला माहिती आहे का की सायकल चालवणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे आपला फिटनेस तर सुधारतोच पण अनेक गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 16 नोव्हेंबर : आजच्या युगात बहुसंख्य लोकांची जीवनशैली खूपच बिघडली आहे आणि त्यामुळे आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचाली खूप महत्त्वाच्या आहेत. यामुळे रोगांचा धोका कमी होतो आणि फिटनेस सुधारतो. आजकाल फार कमी लोक सायकल चालवताना दिसतात. तुम्हाला माहिती आहे का की सायकल चालवणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे आपला फिटनेस तर सुधारतोच पण अनेक गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो.

सायकल चालवणे हा एक उत्तम एरोबिक व्यायाम आहे, जो कोणत्याही वयोगटातील लोक सहजपणे करू शकतात. सायकल चालवणे तुमच्या स्नायू, हाडे आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त वेगाने सायकल चालवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया सायकल चालवणे आपल्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे.

व्यायामासाठी जिममध्ये जावं कि पार्क ठरेल फायदेशीर? या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

वजन कमी करण्यास फायदेशीर

ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी दररोज सायकल चालवणे वरदान ठरू शकते. सायकलिंगमुळे चयापचय गती वाढते, स्नायू मजबूत होतात आणि शरीरातील चरबी जळते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सायकल चालवणे खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला सकस आहारही घ्यावा लागेल. विशेष म्हणजे तुम्ही तुमची छोटी-छोटी कामेही सायकलच्या मदतीने करू शकता. तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी सायकलिंग करू शकता.

हृदय आणि फुफ्फुसांनाही होतो फायदा

अमर उजालामध्ये दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण शरीरात रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी, रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सायकल चालवणे उत्तम व्यायाम आहे. सायकल चालवल्याने फुफ्फुस चांगले स्ट्रेचिंग होतात, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. सायकलिंग हृदय, फुफ्फुस आणि स्नायूंसाठी फायदेशीर ठरू शकते. जे लोक नियमितपणे सायकलिंग करतात त्यांना हृदयविकाराचा धोका इतर लोकांपेक्षा कमी असतो, असे एका संशोधनात आढळले आहे.

मधुमेहासाठी फायदेशीर

मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइजमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, जे लोक दररोज 30-45 मिनिटे मध्यम गतीने सायकल चालवतात, त्यांना रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका कमी असतो. सायकल चालविल्याने मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो. मात्र मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सायकल चालवावी. याच्या सरावाने विशेष फायदा होऊ शकतो.

Too Much Exercise Side Effects : तुमची एक चूक आणि तुम्हाला फिट ठेवणारा व्यायामही घेऊ शकतो तुमचा जीव

मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर

नियमित सायकल चालवल्याने शारीरिक आरोग्य तर चांगले राहतेच. त्याचबरोबर मानसिक आरोग्यदेखील सुधारते. सायकल चालवणे मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी आणि मेंदू निरोगी ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. सायकल चालवणे तुम्हाला फील-गुड हार्मोन्सचा स्राव वाढवण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करू शकते. यामुळे तणाव, नैराश्य आणि चिंता कमी होण्यादेखील मदत होते.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Tips for diabetes, Types of exercise, Weight loss tips