मुंबई, 5 ऑक्टोबर : व्यायाम आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो. व्यायामासोबत सकस आहाराने वाढते वजन नियंत्रित ठेवता येते. आणि शरीरही तंदुरुस्त राहते. असे बरेच लोक आहेत जे अधिक तंदुरुस्त राहण्यासाठी जास्त व्यायाम करतात. मात्र असे केल्याने तुम्ही तंदुरुस्त होण्याऐवजी आजारी पडू शकता. जास्त व्यायाम केल्याने शरीराचे खूप नुकसान होते. तज्ज्ञांच्या मते, जास्त वर्कआउट केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. गेल्या काही काळात अनेक सेलिब्रिटींना हार्ट अटॅकने बळी बनवले. त्यातही काही सेलिब्रिटी खूप फिट आणि तंदुरुस्त होते. त्यामुळे हे लक्षात घ्यायला हवे की, जेव्हा एखादी व्यक्ती व्यायाम करते तेव्हा रक्तदाब वाढतो, ज्यामुळे व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो.
या 7 कारणांमुळे तरुणांनाही येतोय हार्ट अटॅक! तुम्ही या चुका तर करत नाही ना?हृदय कमकुवत होऊ शकते MDLinks.com च्या मते, जास्त प्रमाणात व्यायाम केल्यामुळे हृदयावर सर्वात आधी परिणाम होतो. खरे तर अतिव्यायाम केल्याने हृदयाच्या आजूबाजूचे स्नायू खूप कमकुवत होतात. वेगवान हृदयाच्या ठोक्यासोबतच हृदयाशी संबंधित आजारालाही सामोरे जावे लागते.
स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात जर तुम्ही सामान्य वेळेत व्यायाम करत असाल तर तुम्हाला सामान्य स्नायू दुखण्यापासून बरे होण्यासाठी एक ते दोन दिवस लागतात. पण अति प्रमाणात व्यायाम केल्याने बराच काळ स्नायू दुखू शकतात, ज्यामुळे तुम्ही आजारी पडता. ओव्हर ट्रेनिंग सिंड्रोम होऊ शकतो जास्त व्यायाम केल्याने ओव्हरट्रेनिंग सिंड्रोम होऊ शकतो. त्यामुळे अंतर्गत दुखापत होण्याचा धोका वाढतो. अतिव्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त होत नाही, उलट बिघडते. अधिक थकवा येऊ शकतो TOI नुसार, जर तुम्ही जास्त व्यायाम केला तर तुम्हाला जास्त थकवा जाणवू शकतो. दिवसभर तुमची एनर्जी लेव्हल कमी राहील. जास्त व्यायाम केल्याने तुम्ही तुमच्या कॅलरीज बर्न कराल, पण त्यानंतर तुम्ही कोणतेही काम करण्यास सक्षम राहणार नाही.
चालता-बोलता Heart Attack येत असल्यानं वाढली चिंता; कोणाच्याही जीवाला धोका, अशी घ्या काळजीप्रतिकारशक्तीवर परिणाम होऊ शकतो जास्त व्यायाम केल्याने रोगप्रतिकारक शक्तीवर सर्वात जास्त परिणाम होतो. जर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.