जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कोरोना लशीचे दोन्ही डोस घ्यायलाच हवेत का? पाहा काय म्हणाले AIIMS चे डॉक्टर

कोरोना लशीचे दोन्ही डोस घ्यायलाच हवेत का? पाहा काय म्हणाले AIIMS चे डॉक्टर

कोरोना लशीचे दोन्ही डोस घ्यायलाच हवेत का? पाहा काय म्हणाले AIIMS चे डॉक्टर

मुंबई, 24 एप्रिल : कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) सध्या देशभर फैलावली असून, दररोज नवनवे भयाह उच्चांक प्रस्थापित करत आहे. त्यातून अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. ही लाट परत उद्भवण्याची नेमकी कारणं काय याबद्दल सर्वांच्याच मनात कुतूहल आहे. तसंच लसीकरणाबद्दलही काही शंका लोकांच्या मनात आहेत. न्यूज 18 ने लोकांचे दिल्लीच्या ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांच्याकडून अशाच काही शंकाचं निरसन करून घेतलं. 1) विषाणू स्वतः जगण्यासाठी म्युटेशन (Mutation) करतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 24 एप्रिल : कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) सध्या देशभर फैलावली असून, दररोज नवनवे भयाह उच्चांक प्रस्थापित करत आहे. त्यातून अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. ही लाट परत उद्भवण्याची नेमकी कारणं काय याबद्दल सर्वांच्याच मनात कुतूहल आहे. तसंच लसीकरणाबद्दलही काही शंका लोकांच्या मनात आहेत. न्यूज 18 ने लोकांचे दिल्लीच्या ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांच्याकडून अशाच काही शंकाचं निरसन करून घेतलं. 1) विषाणू स्वतः जगण्यासाठी म्युटेशन (Mutation) करतो. त्याप्रमाणे कोरोना विषाणूचीही म्युटेशन्स झाली आहेत. त्यामुळे दुसऱ्या लाटेतल्या रुग्णांमध्ये पहिल्या लाटेपेक्षा वेगळी काही लक्षणं दिसत आहेत का? - व्यापक पातळीवर विचार केल्यास ताप, सर्दी, अंगदुखी आणि घसादुखी हीच लक्षणं आहेत. काही रुग्णांमध्ये तापासह किंवा तापाशिवाय पोटदुखी, अतिसार, जुलाब, उलट्या अशी लक्षणंही दिसत आहेत. त्यामुळे श्वसनयंत्रणेतली कोणतीही लक्षणं नसलेले आणि पोटाशी संबंधित विकारांचे रुग्ण माझ्याकडे आले, तर मी त्यांना कोरोना चाचणी करायला सांगतो आहे. 2) भारतीय विषाणू अधिक प्राणघातक (Virulent) आहे का? की हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन आणि औषधांच्या कमतरतेमुळे लोकांचा मृत्यू होत आहे? - भारतीय कोरोना विषाणू अधिक प्राणघातक आहे का, याबद्दल आपल्याकडे पुरेसा डेटा उपलब्ध नाही. त्याअनुषंगाने डेटा गोळा केला जात आहे. नवा व्हेरिएंट सापडला, की त्याबद्दल तीन-चार मुद्द्यांची माहिती गोळा केली जाते. तो अधिक संसर्गजन्य आहे का? तो अधिक प्राणघातक आहे का? तो प्रतिकारयंत्रणेतून सुटतोय का? लशीचा प्रभाव कमी होतोय का? असे ते मुद्दे आहेत. सध्या आपल्याकडे असलेल्या मर्यादित माहितीच्या आधारे असं सांगता येतं, की भारतात विषाणू अधिक संसर्गक्षम झाला आहे. त्यामुळेच थोड्या कालावधीत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. हे वाचा -  R-Surakshaa : आपल्या कर्मचाऱ्यांसाठी Reliance स्वतःच राबवणार कोरोना लसीकरण मोहीम भारतातला मृत्युदर अजूनही तुलनेने कमी आहे; मात्र तो यापेक्षाही कमी असायला हवा. त्यामुळे नव्या व्हेरिएंटमुळे अधिक मृत्यू होत आहेत की नाहीत, हे ठामपणे सांगता येत नाही. मात्र आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असल्यामुळे काही ठिकाणी रुग्ण परिचर्येच्या दर्जामध्ये घट होत असावी. त्यामुळे अप्रत्यक्षपणे मृत्युदर वाढत असू शकतो. 3) दुसऱ्या लाटेत कोविड (Covid19) झालेले अनेक लोक असं सांगतात, की आम्ही घराबाहेर पडलो नाही, आम्ही अतिशय काळजी घेतली, लसही घेतली, तरीही आम्हाला हा आजार का झाला? - हा संसर्ग हवेतून किंवा संसर्गित व्यक्तीच्या नाकातल्या स्रावातून, ड्रॉपलेट्समधून पसरतो, हे लक्षात घ्यायला हवं. म्हाताऱ्या व्यक्ती घराबाहेर पडत नसतील; पण बाहेरून येणाऱ्या व्यक्ती उदा. घरकाम करणारी स्त्री, काही तरी दुरुस्तीसाठी येणारा मेकॅनिक आदी व्यक्तींमध्ये लक्षणं दिसत नसली तरी ते कोरोनाचे वाहक असू शकतात. ते घरात येऊन संसर्ग पसरवू शकतात. त्यामुळे टेस्ट निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तींच्या संपर्कात तुम्ही येणार असाल, तर त्या सर्व व्यक्ती कोरोना पॉझिटिव्हच आहेत, असं समजूनच वागायला हवं. शारीरिक अंतर, मास्क घालणं, हातांची स्वच्छता या उपायांचा कायम अवलंब करायला हवा. 4) कोरोना विषाणू हवेतून (Airborne) पसरतो, असं लॅन्सेट (Lancet) या जगप्रसिद्ध नियतकालिकाने नुकतंच म्हटलं आहे. अशा परिस्थितीत काळजी घेण्याची पद्धत बदलेल का? - माझ्या मते काळजी घेण्याच्या पद्धतीत फार मोठे बदल होणार नाहीत. गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ यावर चर्चा सुरू आहे, की हा रोग ड्रॉपलेटमधून पसरतो की हवेतून? माझ्या मते या दोन्हींच्या मिश्रणातून तो पसरतो. सुरुवातीला ड्रॉपलेट (Droplet) थिअरीवर भर दिला गेला होता. शिंकण्या-खोकण्यातून बाहेर आलेले ड्रॉपलेट्स पृष्ठभागावर पडून तिथून इन्फेक्शन पसरत होतं. त्यामुळे सुरुवातीला पृष्ठभाग डिसइन्फेक्ट केले जात होते. पण गेल्या काही महिन्यांमधल्या अभ्यासातून असं स्पष्ट झालं आहे, की एअरोसोल्स (Aerosols) अर्थात पाच मायक्रॉनपेक्षा लहान आकाराच्या कणांद्वारेही तो पसरू शकतो. हे कण हवेत जास्त काळ राहू शकतात. हे वाचा -  Pets ना सांभाळा! महासाथीच्या काळात माणसांमुळे मांजरीलाही झाला कोरोनाचा संसर्ग एखादी खोकणारी-शिंकणारी व्यक्ती खोलीत तुमच्यापासून दोन मीटर अंतरावर असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळून गेलात, तर तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच मास्क आणि काही वेळा डबल मास्क घालणंही आवश्यक आहे. घरातली हवा खेळती राहणंही गरजेचं आहे. त्यासाठी खिडक्या उघड्या ठेवायला हव्यात. कारण त्यामुळे घरातल्या हवेत चुकून संसर्ग पसरला असेलच, तर तो बाहेर जाऊ शकतो. 5)आता कोणते मास्क (Mask) वापरण्याची शिफारस तुम्ही करता? - खरं तर N-95 मास्कच प्रत्येकाने घालायला हवेत; पण ते प्रत्येकाला उपलब्ध होण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत डबल मास्क हा चांगला पर्याय आहे. आतला मास्क थ्री प्लाय सर्जिकल मास्क आणि त्यावर कापडी मास्क असे दोन मास्क (Double Masking) नाका-तोंडावर बांधावेत. तेही शक्य नसलं, तर दोन कापडी मास्क बांधावेत. N-95 मास्कचं फिल्टरेशन (Filteration) 90 टक्के प्रभावी असतं. सर्जिकल मास्क (Surgical Mask) 85-90 टक्के प्रभावी असतात आणि कापडी मास्क त्यापेक्षा कमी प्रभावी असतात. मास्क परिधान करणं आणि तो नीट परिधान करणं, ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या नाका-तोंडात येणारी हवा गाळून आली पाहिजे, कुठेही फट राहता कामा नये, याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. नाही तर संसर्गाचा धोका आहे. दीर्घ श्वास घेतल्यानंतर मास्क आत खेचला गेला, तर तुम्ही तो नीट घातला आहे असा त्याचा अर्थ. मास्कने तुमचं नाक-तोंड पूर्ण झाकलं गेलं पाहिजे, तो हनुवटीवर आला पाहिजे. हे वाचा -  कोरोनाचा विळखा; अहवालासाठी 4 ते 7 दिवसांचा वेळ, कुटुंबाला संसर्गाचा धोका हात स्वच्छ धुतल्यानंतर मास्क हातात घ्या. मास्कला समोरून स्पर्श करू नका. मास्क कानाला बांधायच्या दोऱ्यांच्या साह्यानेच उचला. घरी आल्यानंतर मास्क काढा. कापडी मास्क असेल, तर एकदा वापरल्यावर स्वच्छ धुऊन वाळवून पुन्हा वापरा. मास्क काढताना डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करू नका. मास्क काढल्यानंतरही हात स्वच्छ धुवा. 6) सध्याची हॉस्पिटल्सची परिस्थिती पाहता लशीचा दुसरा डोस घेण्यासाठी कोणी बाहेर जावं का? त्यात काही धोका आहे का? - लशीचा (Vaccination) दुसरा डोस घेतलाच पाहिजे. कारण पहिला डोस पुरेसं संरक्षण देत नाही. पहिला डोस घेतल्यानंतरही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं सध्या उपलब्ध माहितीवरून दिसतं आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणं चांगलंच. बहुतांश लसीकरण केंद्रं हॉस्पिटलच्या कोविड एरियाच्या जवळपास नाहीत. त्यामुळे तुम्ही बाजारात जाता, तसंच हे आहे. त्यामुळे लस घ्यायला जाण्यात वेगळा काही धोका आहे, असं मला वाटत नाही. अर्थात, घराबाहेर पडताना मास्क, शारीरिक अंतर, हात धुणं वगैरे गोष्टींना पर्याय नाही. 7) एखादी व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आली असेल, तर त्या व्यक्तीने चाचणी केव्हा करावी? - कोविड रुग्णाशी जवळून संपर्क म्हणजे काय, हे समजून घेऊ. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांपासून दोन मीटरहून जवळच्या अंतरात 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ असतील आणि दोघांपैकी एकाने जरी मास्क घातलेला नसेल, तर अशा स्थितीला जवळून संपर्क असं म्हणतात. पण तुम्ही कोविड पॉझिटिव्ह कुटुंबीयाशी जवळून संपर्कात असाल आणि मास्क घातलेला नसेल, तर स्वतःला क्वारंटाइन करा. दुसऱ्याला इन्फेक्शन होऊ नये, यासाठी वेगळ्या खोलीत जा. त्याच दिवशी टेस्ट (Corona Test) करण्यात काहीच अर्थ नाही. कारण संसर्गाला इन्क्युबेशन पीरियड असतो. संसर्ग झाल्यापासून लक्षणं दिसायला काही काळ लागतो. त्यामुळे कोविड रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर पाच ते सात दिवसांनी टेस्ट करावी, असा सल्ला दिला जातो. कारण त्याआधी टेस्ट केल्यास ती संसर्ग झालेला असूनही निगेटिव्ह येण्याचा धोका असतो. पाच-सात दिवसांनी टेस्ट करूनही ती निगेटिव्ह आली आणि तुम्हाला लक्षणंही दिसत नसली, तर तुम्हाला संसर्ग झालेला असल्याची शक्यता अगदी नगण्य असते. 8) एखाद्याला सौम्य कोविड (Mild Covid) असेल, तर 14 दिवसांनंतर लोकांच्या संपर्कात येऊन चालेल का? त्यानंतर पुन्हा टेस्ट हवी का? - सौम्य कोविड असेल दहाव्या दिवसांनंतर लक्षणं नसतील किंवा त्यापूर्वी किमान तीन दिवस ताप नसेल किंवा तसंच 14 दिवसांत काहीही लक्षणं नसतील, तर संसर्ग बरा झाला आहे. काळजी करण्याची गरज नाही, टेस्टचीही गरज नाही. लोकांमध्ये मिसळता येऊ शकतं. 9) दुसऱ्या लाटेत लहान मुलांनाही कोविड होतो आहे. मुंबईत बालकांना कोविड होण्याचं प्रमाण 65 टक्के वाढलं आहे. असं का होतंय? पालक काय करू शकतात? - यामागचं कारण शोधावं लागेल; पण पहिल्या लाटेत आपण खूप काळजी घेत होतो. शाळा बंद होत्या. मुलं बाहेर जाणार नाहीत, याची काळजी घेतली जात होती. आता काही ठिकाणी शाळा उघडल्या, मुलं बाहेर जाऊ लागली, सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठीही जाऊ लागली. त्यामुळे प्रतिकारशक्ती नसलेली, पूर्वी संसर्ग न झालेली ही मुलं संसर्गाच्या कक्षेत आली. त्यामुळेच हा विषाणू तरुणांमध्येही पसरला असावा. हे वाचा -  बापरे! देशात 35 लाख अ‍ॅक्टिव्ह रुग्ण होणार, आयआयटी वैज्ञानिकांचा अंदाज विषाणूत बदलही होत असतात. म्हणूनच तरुणांमध्येही तो गंभीर रूप धारण करतो आहे. मोठ्यांच्या तुलनेत लहानांमध्ये हा रोग किती घातक ठरतो आहे, याचा तुलनात्मक अभ्यास करण्याची गरज आहे. पण प्रचंड काळजी घ्यायला हवी आहे. तरुण आणि लहानांसाठी प्रभावी ट्रीटमेंट धोरण करण्याची गरज आहे. 10) लहान मुलांना संसर्ग झाल्यास संपूर्ण लक्षणं दिसत नाहीत. ते सायलेंट कॅरिअर्स (Silent Carriers) आहेत का? - लहान मुलांमध्ये आजाराची तीव्रता सौम्य आहे किंवा समस्या कमी आहेत; पण ती बाहेर गेली, तर संसर्ग घरात घेऊन येऊ शकतात. त्यांच्या आजी-आजोबांना किंवा को-मॉर्बिडिटी असलेल्यांना त्यांच्यापासून संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे मुलांना संसर्ग होण्यापासून रोखणं हे त्यांच्यासाठी आणि घरातल्यांसाठीही गरजेचं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात