• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • Pets ना सांभाळा! महासाथीच्या काळात माणसांमुळे मांजरीलाही झाला कोरोनाचा संसर्ग; संशोधनातून झालं स्पष्ट

Pets ना सांभाळा! महासाथीच्या काळात माणसांमुळे मांजरीलाही झाला कोरोनाचा संसर्ग; संशोधनातून झालं स्पष्ट

या बाधित मांजरीमध्ये रेस्पिरेटरी (Respiratory disease in pets) विकाराची सौम्य ते गंभीर लक्षणं दिसून येत आहेत.

  • Share this:
लंडन, 23 एप्रिल : सध्या जगभरात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग वाढताना दिसत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि त्याची साखळी तोडण्यासाठी (Break the chain covid 19) अनेक देश, राज्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. भारतातील अनेक राज्यांमध्ये देखील सध्या कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे आरोग्य सेवा कोलमडून पडल्याचे (Coronavirus pandemic ) चित्र आहे. या सर्व स्थितीत माणसांमुळे प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का किंवा प्राण्यांमुळे हा संसर्ग वाढू शकतो का असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहेत. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधून आलेलं हे वृत्त महत्वाचं आहे. युकेमध्ये महामारी दरम्यान मानवापासून मांजरीला (pet Cat got coronavirus) कोविड-19 च्या SARS-COV-2 या विषाणूचा संसर्ग झाल्याचे ब्रिटनमधील संशोधकांना दिसून आले आहे. सध्या या बाधित मांजरीमध्ये रेस्पिरेटरी (Respiratory disease in pets) विकाराची सौम्य ते गंभीर लक्षणं दिसून येत आहेत. युकेमध्ये (UK) महासाथी दरम्यान मानवापासून मांजरीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे नवे पुरावे या संशोधनातून मिळाले आहेत. व्हेटर्नरी रेकॉर्डमध्ये (Veterinary Record) हे संशोधन प्रसिद्ध झालं असून, गेल्या वर्षी मांजरीमध्ये विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यामुळे सौम्य किंवा गंभीर स्वरुपाचा श्वसनाचा त्रास तिला झाल्याचं दिसून आलं. कोरोनाचा संसर्ग झाला असावा, असा संशय आल्याने दोन घरांत पाळण्यात आलेल्या मांजरीची संशोधकांनी प्रयोगशाळेतील तंत्रासहाय्याने तपासणी केली. कोरोनामुळे स्मशानातील निखारे धगधगतेच; दापोलीतील घटना वाचून अंगावर काटा उभा राहील याबाबत एमआरसी–युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो सेंटर फॉर व्हायरस रिसर्चच्या आघाडीच्या लेखक मार्गारेट होसी म्हणाल्या की, प्राण्यांना संक्रमित करण्याची कोरोना विषाणूची क्षमता असेल तर मानव-मांजर, मांजर-मांजर, मांजर-मानव अशा प्रकारच्या संक्रमणाच्या अनुषंगाने त्याचे परीक्षण करावं लागेल. पीएलओएस (PLOS) कॉम्प्युटेशनल बायोलॉजी या नियतकालिकात नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, मानवानंतर मुंगुंस आणि काहीअंशी मांजरी, सिव्हेटस म्हणजे उदमांजर, कुत्रा हे प्राणी SARS-COV-2 या विषाणूच्या अनुषंगाने संवेदनशील आहेत. स्पेनमधील सेंटर फॉर जेनोमिक रेग्युलेशन चे संशोधन लेखक लुईस सेरानो म्हणाले, की SARS-COV-2 साठी कोणते प्राणी संवेदनशील आहेत हे समजल्याने आम्हाला पशु संगोपन केंद्राचे बांधकाम रोखण्यास मदत होते. कारण या माध्यमातून भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव उद्भवू शकतो. ...तर घराबाहेर न पडताही तुम्हाला कोरोना संसर्ग होऊ शकतो; डॉक्टरांनी केलं सावध दक्षिण कोरियातील दक्षिण गोयांग्सांग प्रांतातील आग्नेयेकडील जिन्जू या  ठिकाणी यंदाच्या जानेवारीत पाळीव प्राण्यांची तपासणी केली असता, एक मांजर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. कोरोनाबाधित आई-मुलीकडून या मांजरीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आरोग्य अधिकाऱ्यांना आहे. पाळीव प्राण्यांना त्यांच्या मालकांव्दारे विषाणूचा संसर्ग झाल्याचे प्रकार जपान (Japan), हॉंगकॉंग (Hong Kong) आणि ब्राझील (Brazil) यासारख्या ठिकाणी घडले आहेत.
First published: