• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • रत्नागिरीला कोरोनाचा विळखा; अहवालासाठी 4 ते 7 दिवसांचा वेळ, कुटुंबातील सदस्यांना संसर्गाचा धोका

रत्नागिरीला कोरोनाचा विळखा; अहवालासाठी 4 ते 7 दिवसांचा वेळ, कुटुंबातील सदस्यांना संसर्गाचा धोका

हे केलं तर होणार नाही Corona

हे केलं तर होणार नाही Corona

चिंता वाढवणारी बाब म्हणजे आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल येण्यासाठी इथं 4 ते 7 दिवसांचा कालावधी लागत आहे.

  • Share this:
दापोली, 23 एप्रिल : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र यात अधिक चिंता वाढवणारी बाब म्हणजे आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल येण्यासाठी इथं 4 ते 7 दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळं कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमुळं कुटुंबातील इतरांना लागण होत आहे. त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्यासाठी RTPCR चाचणीचे नमुने तपासण्यासाठी आणखी एक प्रयोगशाळा सुरू करण्याची मागणी होत आहे. (वाचा-व्हेंटिलेटरवर आहे म्हणून काय झालं? पुण्यातील Covid ICU मध्ये बासरीचे सुमधूर सूर!) रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं कोविडची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचणीसाठी स्वॅबचे नमुने तपासणीसाठी रत्नागिरीला पाठवले जातात. पण या प्रयोगशाळेची क्षमता रोज सुमारे 1200 नमुने तपासण्याची आहे. पण इथं जवळपास 5 हजारांपेक्षा जास्त नमुने येतात. त्यामुळं अनेक नमुने चार ते सहा दिवस तपासणीअभावी पडून राहत आहेत. त्यामुळं सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांचे अहवाल यायला अनेक दिवस जातात. या दरम्यान रुग्ण अनेकांच्या संपर्कात येतो. त्यामुळं तो जर पॉझिटिव्ह आला तर पुन्हा त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा धोका वाढतो. त्यामुळं जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी RTPCR चाचणीचे नमुने तपासण्यासाठी एखादी शासकीय किंवा खाजगी लॅब उघडण्यासाठी तातडीनं परवागनी देण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडं पत्राद्वारे ही मागणी केली. (वाचा-समाजसेवेचा वसा : बेवारस कोरोनाग्रस्त मृतांना 'मुक्ती' देणारा खाकीतला ज्ञान'देव') अशाप्रकारे कोरोनाची लागण झाली असेल आणि अहवाल यायला उशीर झाला तर उपचारालाही उशीर होतो आणि परिणामी धोका वाढतो. त्यामुळं हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे. कारण अनेकठिकाणी यामुळं कुटुंबातील अनेक जण बाधित झाल्याची उदाहरणं समोर आली आहेत. तसंच रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावातील वाडी वस्त्यांमध्ये यंत्रणा पोहोचत नसल्याचीही तक्रार समोर येत आहे. सिंधुदुर्ग सारख्या लहान जिल्ह्यात दोन शासकीय तर एक खासगी अशा तीन प्रयोगशाळा आहेत. तर 9 तालुके असणार्‍या रत्नागिरी जिल्ह्यात केवळ एकच शासकीय प्रयोगशाळा आहे. डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात 100 बेडचं कोरोना रुग्णालय सुरू झालं आहे. त्याच ठिकाणी प्रयोगशाळा सुरु केल्यास रत्नागिरी येथील शासकीय प्रयोगशाळेवरील ताण कमी होण्यात मदत होईल.
Published by:Meenal Gangurde
First published: