मराठी बातम्या /बातम्या /देश /R-Surakshaa : आपल्या कर्मचाऱ्यांसाठी Reliance स्वतःच राबवणार कोरोना लसीकरण मोहीम

R-Surakshaa : आपल्या कर्मचाऱ्यांसाठी Reliance स्वतःच राबवणार कोरोना लसीकरण मोहीम

रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) R-Surakshaa या आपल्या स्वतंत्र लसीकरण मोहिमेची घोषणा केली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) R-Surakshaa या आपल्या स्वतंत्र लसीकरण मोहिमेची घोषणा केली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) R-Surakshaa या आपल्या स्वतंत्र लसीकरण मोहिमेची घोषणा केली आहे.

मुंबई, 23 एप्रिल : देशात 1 मेपासून कोरोना लसीकरणाचा (Corona vaccination) सर्वात मोठा टप्पा सुरू होणार आहे. 18+ सर्व नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने लस उत्पादक कंपन्यांना राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना थेट लस पुरवण्याची मुभा दिली आहे. यानंतर आता देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स (Reliance) R-Surakshaa ही स्वतःची वेगळी लसीकरण मोहीम (Reliance corona vaccination) राबवणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) R-Surakshaa या आपल्या स्वतंत्र लसीकरण मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत रिलायन्स आपले सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला मोफत कोरोना लस देणार आहे. 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना ही लस दिली जाईल. 1 मेपासून ही लसीकरण मोहीम सुरू होईल. याबाबत परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे.

हे वाचा - ...तर घराबाहेर न पडताही तुम्हाला कोरोना संसर्ग होऊ शकतो; डॉक्टरांनी केलं सावध

RIL चे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगितलं, "कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत रिलायन्सने अनेक कर्मचाऱ्यांचं लसीकरण केलं आहे. रिलायन्स आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलत आहे आणि पुढेही असंच करेल. केंद्र सरकारमार्फत चालवल्या जाणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या नव्या टप्प्यासह रिलायन्स स्वतःची लसीकरण मोहीम R-Surakshaa सुरू करत आहेत. रिलायन्सच्या सर्व लोकेशनवर कोरोना लसीकरण कार्यक्रम सुरू केला जाईल. यामध्ये 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश असेल"

कोरोना लस ही कोरोनाविरोधातील लढ्यात एक मोठं शस्त्र आहे. भारत कोरोनाच्या गंभीर अशा दुसऱ्या लाटेशी लढा देत आहे. यामुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि देशाच्या आरोग्यप्रणालीवर ताण आला आहे. पुढील काही आठवडे कोरोना रुग्ण असेच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण खूप सावध राहायला हवं. आवश्यक ती खबरदारी घ्यायला हवी, असं या परिपत्रकात म्हटलं आहे.

हे वाचा - घरीच कोरोनावर उपचार घेताना शरीरातील Oxygen कमी झाल्यास काय करावं? पाहा हा VIDEO

तसंच कोरोना लशीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांनी उशीर न करता कोरोना लस घ्यावी आणि त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहीत करावं, असं आवाहन अंबानी यांनी केलं आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Reliance