IIT वैज्ञानिकांचा गंभीर इशारा, 'या' पाच दिवसांत कोरोनाचा होईल उद्रेक; अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या 35 लाख होणार

IIT वैज्ञानिकांचा गंभीर इशारा, 'या' पाच दिवसांत कोरोनाचा होईल उद्रेक; अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या 35 लाख होणार

IIT scientists on Coronavirus spike: आयआयटीच्या वैज्ञानिकांनी एक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार कोरोनाचा वेगा संदर्भात अंदाज वर्तवला आहे.

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल: भारतात कोरोनाच्या दुसची दुसरी लाट (Coronavirus second wave) आणखी भयावह परिस्थिती निर्माण करु शकते. 11 मे ते 15 मे या कालावधीत कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो (Covid 19 peak) आणि देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या 33 ते 35 लाख होऊ शकते असा अंदाज आयआयटी वैज्ञानिकांनी (IIT Scientists) गणितीय मॉडेलवर आधारित तयार केलेल्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. तसेच मे महिन्याच्या अखेरीस संसर्गाचा वेग कमी होईल असंही या अहवालात म्हटलं आहे.

या फॉर्म्युल्यानुसार अहवाल तयार

शुक्रवारी देशात 3.32 लाख नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली तर 2263 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्यस्थितीत भारतात 24.28 लाख सक्रिय रुग्ण आहेत. आयआयटीच्या वैज्ञानिकांनी तयार केलेल्या अहवालात म्हटलं आहे की, सक्रिय रुग्णांमध्ये आणखी 10 लाख रुग्णांची वाढ होऊ शकते. आयआयटी कानपूर आणि हैदराबादच्या वैज्ञानिकांनी त्यांच्या या मॉडेलसाठी SUTRA (Susceptible, Undetected, Tested (Positive) आणि Removed Approach)फॉर्म्युला वापरला आहे.

या राज्यांत आणखी उद्रेक होणार

वैज्ञानिकांनी सांगितले की, दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांत 25 ते 30 एप्रिल या कालावधीत कोरोनाचा संसर्ग वेगाने होईल. छत्तीसगड, महाराष्ट्रात आधीच कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे.

वाचा: पंतप्रधानांसोबत महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी केल्या या 5 मोठ्या मागण्या

रुग्णवाढीचा वेग कधी मंदावणार?

आयआयटी कानपूरच्या कम्प्युटर सायन्स विभागातील प्रोफेसर मनिंदर अग्रवाल यांनी पीटीआय भाषाला सांगितले की, "11 ते 15 मे या कालवधीत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या 35 लाख होऊ शकते. अतिशय वेगाने होणारी ही वाढ असेल आणि त्याचप्रमाणे ही गती कमी होण्याचीही शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावेल."

आयआयटी वैज्ञानिकांनी तयार केलेला हा अहवाल अद्याप प्रकाशित करण्यात आलेला नाहीये मात्र, त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही तयार केलेल्या सूत्रानुसार या मॉडेलला खूपच महत्व आहे. यापूर्वीचा अहवाल हा रुग्णांना दोन प्रकारांत (संक्रमण झालेले आणि संक्रमण न झालेले) विभागले होते.

15 एप्रिलचा अंदाज खरा ठरला नाही

या महिन्याच्या सुरुवातीस गणितीय मॉडेलनुसार अंदाज वर्तवण्यात आल होता की, 15 एप्रिलपर्यंत देशात संसर्गाचे प्रमाण पीकवर असेल पण तसे झाले नाही. अग्रवाल यांनी सांगितले की, "सध्याच्या परिस्थितीत आमच्या मॉडेलचे निकष सातत्याने बदलत आहेत त्यामुळे अचूक मुल्यांकन करणे अवघड आहे. दैनंदिन प्रकरणात रुग्णांची संख्या बदलल्याने हजारोंची वाढ होऊ शकते."

त्यांनी पुढे म्हटलं, सध्या असलेल्या महामारीचा अंदाज घेण्यासाठी मॉडेल तीन पॅरामीटर्समध्ये तयार करण्यात आले आहे. पहिला बीटा किंवा संपर्क, ज्याची मोजणी गणितावर आधारित केली जाते की एका व्यक्तीने किती जणांना संक्रमित केलं. दुसरा निकष म्हणजे साथीच्या प्रभावाच्या क्षेत्रात किती लोकसंख्या आली आणि तिसरा म्हणजे बाधित झालेले आणि बाधित न झालेल्यांची प्रमाण आहे.

Published by: Sunil Desale
First published: April 23, 2021, 7:56 PM IST

ताज्या बातम्या