मुंबई, 03 जुलै : आपल्या आरोग्यासाठी नारळ पाणी (Coconut Water Benefits) खूप फायदेशीर असते. त्यामुळे आपले शरीर आतून तर दूर राहतेच. मात्र हे नारळ पाणी आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठीदेखील तितकेच उपयुक्त असते. नारळाच्या या फायद्यांबद्दल तर सर्वानाच माहित आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का? की एक नारळ तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर करू शकते. आपल्या कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना ती नारळ फोडून केली जाते आणि कोणत्याही शुभकार्यात नारळ शुभाचे स्वरूप म्हणून वापरला जातो. हाच शुभ मानला जाणार नारळ तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर करू शकतो. झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, नारळाचा उपयोग काही विशिष्ट पद्धतीने केल्यास तुम्हाला त्याचे चमत्कारिक फायदे (Coconut Benefits) पाहायला मिळतात. ते कसे जाणून घेऊया. यश आणि समृद्धी (Coconut For Success And Prosperity) तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर लाल कपड्यात नारळ बांधून घराच्या मुख्य दरवाजाला लटकवा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल आणि कामात यश मिळू लागेल. शेणामुळे बनली जोडी! लगेच इम्प्रेस झालं तरुणीचं कुटुंब; तरुणाशी लावून दिलं लग्न सुखी वैवाहिक जीवन (Coconut For Happy Married Life) पती-पत्नीमध्ये वारंवार भांडण होत असेल, दुरावा आला असेल. तर तुमच्या देवघरात एक नारळ ठेवा. आणि रोज त्याची पूजा करा. तुम्हाला काही दिवसात फरक दिसेल. पैसा आणि व्यवसायात नफा (Coconut For Economical And Business Profit) करिअर-व्यवसायात प्रगती होत नसेल तर गुरुवारी पिवळ्या कपड्यात एक नारळ, पिवळी फुले, हळकुंड, पिवळ्या रंगाची मिठाई आणि जानवे बांधून विष्णू देवाला अर्पण करा. तुम्हालाही होतोय हेयर फॉलचा प्रॉब्लेम? या 5 गोष्टी टाळाच शनिदोषापासून मुक्ती (Shanidosh Mukti) कुंडलीत शनि दोष असल्यामुळे जीवनात अनेक प्रकारचे संकट येतात. या समस्या आर्थिक, शारीरिक किंवा मानसिक असू शकतात. या सगळ्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी नदीत नारळ तरंगवावा. यादरम्यान भगवान हनुमानाच्या ‘ओम रामदूताय नमः’ या मंत्राचा जप करावा आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळण्यासाठी प्रार्थना करावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.