जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कोकोनट मिल्क टीचे फायदे माहितीये? वजनासोबत वयही करते कमी, पाहा बनवण्याची पद्धत

कोकोनट मिल्क टीचे फायदे माहितीये? वजनासोबत वयही करते कमी, पाहा बनवण्याची पद्धत

कोकोनट मिल्क टीचे फायदे माहितीये? वजनासोबत वयही करते कमी, पाहा बनवण्याची पद्धत

तुम्ही कधी नारळाच्या दुधाचा चहा घेतला आहे का? जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो या चहाचे काय काय फायदे आहेत आणि तो कसा बनवावा.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 डिसेंबर : चहाचे अनेक प्रकार असतात. दुधाचा चहा, लिंबू घातलेला चहा, हिरवा चहा, काळा चहा हे प्रकार सर्वांना माहित आहेत. पण तुम्ही कधी नारळाच्या दुधाचा चहा घेतला आहे का? जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो या चहाचे काय काय फायदे आहेत आणि तो कसा बनवावा. हा चहा आरोग्यदायी तर असतीच सोबतच खूप स्वादिष्टदेखील असतो. नारळाचे दूध सर्वसाधारणपणे खूप आरोग्यदायी असते. त्यामुळे हे दूध घालून चहा केल्यास आरोग्याला कोणतीही हानी होत नाही. नारळ पाणी पिणे अनेकांना आवडते. मात्र काही लोकांना ते आवडत नाही किंवा त्याने त्रास होतो. अशावेळी तुम्ही नारळ पाण्याऐवजी दुधाचा आहारात समावेश करू शकता. चला तर मग पाहुयात नारळाच्या दुधाने बनवलेल्या चहाचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत.

दुधाच्या चहासोबतच हे 7 प्रकारचे हर्बल चहा आहेत हेल्दी आणि टेस्टी

नारळाच्या दुधाचा चहा पिण्याचे फायदे Presswire 18.com वर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, नारळ चहा हे एक कॅफिनयुक्त पेय आहे. नारळाच्या दुधात हिरव्या किंवा काळ्या चहाचे मिश्रण करून बनवले जाते. उष्णकटिबंधीय भागात राहणारे लोक जेथे नारळ भरपूर पिकतात. तिथे हे पेय जास्त बनवले जाते. नारळाच्या दुधात सॅच्युरेटेड फॅट भरपूर असते. यामध्ये लॉरिक अॅसिड, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर इत्यादींचे प्रमाण जास्त असते.

News18लोकमत
News18लोकमत

- नारळाचा चहा पिणे आरोग्यासाठी चांगले असते. हे एक सुपर फूड आहे जे वजन कमी करते आणि प्रतिकारशक्ती वाढवते. जेव्हा तुम्ही नारळाच्या दुधाच्या चहामध्ये ग्रीन टी बॅग टाकता तेव्हा त्यात पॉलिफेनॉलिक संयुगे आणि इतर सक्रिय घटक असतात. ते आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. - आयुर्वेदानुसार, नारळाच्या दुधात अनेक पौष्टिक मूल्य असतात. त्यात हायपरलिपिडेमिक संतुलित करणारे घटक असतात. नारळातील हेल्दी फॅट्स, अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे ते त्वचेसाठी चांगले असते. हे त्वचा मऊ बनवते. नारळाचा चहा प्यायल्याने तारुण्य वाढते. हे सौंदर्य दीर्घकाळ टिकवून ठेवते. - वजन कमी करायचे असेल तर नारळाच्या दुधाचा चहा प्या. नारळाच्या पाण्याप्रमाणे हा चहा देखील वजन कमी करण्यास मदत करतो. नारळात भरपूर फॅट-बस्टिंग गुणधर्म असतात. तसेच त्यात कॅलरीज खूप कमी असतात. पाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. - एका संशोधनानुसार, नारळात असलेले एचडीएल कोलेस्टेरॉल आणि लॉरिक अॅसिड्स तुम्हाला उच्च रक्तदाब आणि कोरोनरी हृदयरोगापासून वाचवतात. म्हणूनच नारळाच्या दुधाचा चहा प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. - नारळाच्या दुधाचा चहाप्रतिकारशक्तीवाढण्यासही मदत होते कोरोनाच्या काळात अनेक तज्ञांनी कोरोना विषाणूपासून संरक्षण मिळवण्यासाठी नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला होता. नारळाच्या दुधापासून बनवलेला चहा पिऊनही तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकता. Makhana : मखाना एवढा महाग का असतो? त्यात नेमकं असं काय असतं? नारळाच्या दुधाचा चहा कसा बनवायचा नारळाच्या दुधाचा चहा बनवण्यासाठी तुम्हाला 3 ग्रीन टी बॅग्स, 1 कप नारळाचे दूध, 4 कप पाणी, 2 चमचे मलई, पांढरी किंवा तपकिरी साखर लागेल. प्रथम एका चहाच्या भांड्यात 4 कप पाणी उकळा. त्यात ग्रीन टी बॅग ठेवा. आता एक कप नारळाचे दूध घालून चांगले उकळवा. यानंतर ग्रीन टी बॅग काहीवेळाने काढून टाका. त्यानंतर चवीनुसार साखर घाला. हा चविष्ट आणि आरोग्यदायी नारळाच्या दुधाचा चहा नियमित प्यायल्याने तुमचे आरोग्य सुधारेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात