जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दुधाच्या चहासोबतच हे 7 प्रकारचे हर्बल चहा आहेत हेल्दी आणि टेस्टी

दुधाच्या चहासोबतच हे 7 प्रकारचे हर्बल चहा आहेत हेल्दी आणि टेस्टी

चहाचे विविध प्रकार

चहाचे विविध प्रकार

दुधाचा चहा सतत पिल्यानं अनेक समस्या उद्भवू शकतात. या चहाचा पर्याय आहे ना! दुधाचा चहा सर्वात लोकप्रिय आहे. मात्र तो चहाचा एकमेव प्रकार नाही. चहा विविध हर्ब्ज अर्थात वनस्पती पाने टाकूनही बनवला जातो. तोसुद्धा तितकाच स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 डिसेंबर : आपला देश पक्का चहाप्रेमी आहे. अनेक लोक कुठल्याही वेळी चहा पिण्यास एका पायावर तयार असतात. दुधाचा चहा सर्वात लोकप्रिय आहे. मात्र तो चहाचा एकमेव प्रकार नाही. चहा विविध हर्ब्ज अर्थात वनस्पती पाने टाकूनही बनवला जातो. तोसुद्धा तितकाच स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असतो. यात विविध औषधी गुण भरपूर असतात. या प्रकारचा चहा पिऊन आपल्याला दिवसभर उत्साह वाटत राहील. शिवाय शरीराला कुठलं नुकसानही होणार नाही. चहाचे विविध 7 प्रकार जाणून घेऊया आणि नक्की ट्राय करा. पेपरमिंट अर्थात पुदिना चहा अनेक लोक हर्बल चहा आरोग्यासाठी पितात. मात्र बरेच लोक असेही आहेत जे चव आणि फ्लेवरचे शौकीन असतात. त्यांना चहासोबत प्रयोग करायला आवडतात. अशा लोकांना पेपरमिंट चहा नक्की आवडेल. याला तुम्ही घरी कुंडीतही उगवू शकता आणि फ्रेश चहाचा आनंद घेऊ शकता. हा चहा रिफ्रेशिंग आहे सोबतच शरीरातील पचनयंत्रणाही यातून ठीक राहते. यातील मेंथॉल शरीरातील स्नायूंना मोकळं करतं. सोबतच घशातील खवखव बरी होते. यातील अँटिऑक्सिडंट्स शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. याची ताजी पानं गरम पाण्यात 4 ते 5 मिनिट उकळा. याला गरमगरम चहासारखं प्या. रात्री झोपण्याआधी हा चहा पिल्यास झोप चांगली लागेल. बडीशेप/ सोपचा चहा सोपचा चहा तुमच्या पचनतंत्रासाठी चांगला असतो. यातून शरीरातलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. सोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढते. अँटिऑक्सिडंट गुणांमुळे हा चहा शरीराला अनेक आजारांपासून वाचवतो. अँटी अँग्झायटी स्वरूपाच्या गुणांसाठीही हा चहा ओळखला जातो. महिलांमधील पिरियड किंवा अन्य कारणांमुळं होणारी पोटदुखीची यातून दूर होते. आल्याचा चहा पचनतंत्र सुधारण्यासाठी आल्याचा चहा खूप उपयोगी आहे. हा नॅच्युरल ब्लड थिनर आहे. अँटिऑक्सिडंट गुणांमुळे हा चहा रोगप्रतिकारशक्तीला मजबूत बनवतो. ज्यांना भूक कमी लागते ते या चहाच्या सेवनाने भूक वाढवू शकतात.  (how to make herbal tea) रोझमेरी चहा लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्व ब 6 चा हा चांगला स्रोत आहे. शरीर हेल्दी राहण्यासह रक्तसंचारही सुरळीत होतो. शिवाय स्मरणशक्ती वाढवण्यातही हा चहा उपयोगी असतो. हे  वाचा -  स्वप्नात जुने घर दिसणे शुभ आहे की अशुभ, जाणून यामागचे गूढ संकेत तुळस चहा हा चहा खोकला, सर्दी बरा करतोच. सोबत शरीराची रोगप्रतिकार क्षमताही सुधारतो. एका संशोधनानुसार, नियमित हा चहा घेतल्यास साखरेची पातळीही नियंत्रित राहते. गुलाब चहा गुलाबाच्या पानांनी बनलेला हा चहा पिल्याने चेहऱ्यावर उजळपणा येतो. पोटाच्या समस्या संपतात. अ जीवनसत्व, क जीवनसत्व, इ जीवनसत्व, बी 3 जीवनसत्व आणि ड जीवनसत्वाचा हा चांगला स्रोत आहे. हे  वाचा -  Makhana : मखाना एवढा महाग का असतो? त्यात नेमकं असं काय असतं? ग्रीन टी ग्रीन टी नियमित पिल्याने तुम्ही वजन कमी करू शकता. हे नियमित पिल्याने म्हातारपण लवकर येत नाही. सोबतच ग्रीन टी मधुमेह, कँसर आणि हृदयाशी जोडलेल्या आजारांचा धोकाही कमी करतो.

News18लोकमत
News18लोकमत

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात