मखाना हे अतिशय लोकप्रिय सुपरफूड आहे. परंतु ते खूपच महाग आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना ते परवडत नाही. परंतु हा मखाना एवढा माहाग का आहे आणि त्यात कोणकोणते पौष्टिक घटक आहे जाणून घेऊया.
E Times च्या रिपोर्टनुसार पौष्टिक मूल्यांमुळे मखाना किमतीच्या बाबतीत थोडा महाग आहे. मखनातील अॅक्टिव्ह गुणधर्मांमुळे ते लघवीचे प्रमाण वाढवणारे औषध, जळजळ आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्यास मदत करते.
तसेच पचनक्रिया सुधारण्यास निद्रानाशची समस्या, जुनाट अतिसार, धडधडणे इत्यादी आजारांवर उपचार करण्यासाठी मखाना अतिशय प्रभावी फूड मानले जाते. यात असलेल्या औषधी घटकांमुळे ते एक प्रभावी आरोग्य बूस्टर सिद्ध होते.
मखाना अनेक पौष्टिक घटकांनी परिपूर्ण आहे. शरीराला आवश्यक पौष्टीक घटक मिळावे यासाठी तुम्ही नियमित आहारात याचा समावेश करू शकता.
मखानामध्ये प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात आढळतात. याशिवाय तो पोटॅशियम आणि सोडियम सारख्या खनिजांनी समृद्ध असतो. त्यात असलेल्या या घटकांमुळे तो आहारात समाविष्ट करण्यासाठी उत्कृष्ट पर्याय आहे.
याशिवाय मखानात भरपूर प्रमाणात फायटोकेमिकल्स आणि मुबलक अँटिऑक्सिडेंट आणि इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. या सर्व पौष्टिक घटकांमुळे त्याची किंमत जास्त आहे.
शरीरासाठी अतिशय पौष्टिक असलेला मखाना तुम्ही कच्चा किंवा भाजून खाऊ शकता. याशिवा तुम्ही त्याला पेस्ट किंवा सिरपमध्ये कुटून उकळून त्याचे सेवन करू शकता.
मखाना बाबात हे फॅक्ट खूप कमी लोकांना माहिती असेल की जगातील 90 टक्के मखाना बिहारमधून येतो. बिहारच्या मिथिलांचल प्रदेशात त्याचे प्रचंड उत्पादन पाहता अलीकडेच त्याला प्रतिष्ठित ग्राफिकल इंडेक्स (GI) टॅग मिळाला आहे.