Home /News /lifestyle /

‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथिंबीर; दोन आठवडे No Tension

‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथिंबीर; दोन आठवडे No Tension

पावसाळ्यामध्ये ओलाव्यामुळे कोथिंबीरीची पानं खराब व्हायला लागतात.

पावसाळ्यामध्ये ओलाव्यामुळे कोथिंबीरीची पानं खराब व्हायला लागतात.

पावसाळ्यात कोथंबीर खराब होत असेल तर, घरी आणल्यावर फ्रिजमध्ये (Refrigerator) अशा प्रकारे ठेवली तर, 15 दिवस टिकेल.

  दिल्ली,26 जुलै :  पावसाळ्यामध्ये हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात मिळतात आणि स्वस्तही असतात. त्यामुळे या काळामध्ये हिरव्या पालेभाज्या घरी आणल्या जातात. कोथिंबीर (Coriander Leaves) तर, रोजच्या जेवणात लागतेच. कोथिंबीर देखील अत्यंत आरोग्यवर्धक (Healthful) आहे. आपल्या सगळ्याच प्रकारच्या जेवणामध्ये कोथिंबीरीचा वापर सर्रास होत असतो. मात्र, कोथिंबीर घरी आणल्यानंतर लवकर सुकते किंवा ओलाव्यामुळे सडते अशी गृहिणींची तक्रार असते. उन्हाळ्यामध्ये (Summer) कोथिंबीर घरी आणल्यानंतर लवकरात लवकर योग्य पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवली नाही तर ती सुकून जाते तर पावसाळ्यामध्ये (Monsoon) ओलाव्यामुळे कोथिंबीरीची पानं खराब व्हायला लागतात. त्यामुळे घरी आणलेली कोथिंबीर कशाप्रकारे ठेवावी हा प्रश्न महिलांसमोर असतो. शिवाय आणलेली सगळी कोथिंबीर जेवणामध्ये वापरली जात नाही. मग उललेली कोथिंबीर टिकवण्यासाठी काय उपाय करायचे हे कळत नाही. कोथिंबीर घरी आणल्यानंतर तिची पानं 15 ते 20 दिवस कशाप्रकारे टिकवता येतील याची माहिती आता आपण घेऊयात. (तुम्ही भेसळयुक्त चहा तर पित नाही ना? ‘या’ पद्धताने ओळखा चहाची शुद्धता) पहिली पद्धत कोथिंबीरची पानं देठांसह तोडा. त्यानंतर पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन त्यावर चिखल, माती लागली असेल तर, दूर करा आणि पुसून घ्या. याकरता टिशू पेपर किंवा सुती कापडाचाही वापर करू शकता. यामुळे कोथिंबीरच्या पाना लागलेलं पाणी पूर्णपणे निघून जाईल आणि कोथिंबीर पूर्ण कोरडी होईल. (पावसाळ्यात तांदळांना किड लागत असेल तर‘ हे’ उपाय करुन पाहा) 1 ग्लास पाण्यामध्ये थोडसं पाणी भरा यामध्ये देठांसह कोथिंबीर उभी करून ठेवा. लक्षात ठेवा कोथिंबीरची डेठ पाण्यामध्ये पूर्ण बुडायला हवीत आणि पानं बाहेर रहायाला हवीत. एका झीप लॉक बॅगमध्ये ग्लाससकट कोथिंबीर ठेवा. बॅग बंद करून फ्रीजमध्ये ठेवून द्या. आवश्‍यकतेनुसार कोथिंबीर काढून वापरा. अशाप्रकारे ही कोथिंबीर 2 आठवडे टिकू शकते. ('या’ घरगुती उपायांनी करा झुरळांचा बंदोबस्त; होईल नायनाट) दुसरी पद्धत कोथिंबीरची पानं पाण्याने स्वच्छ धुवा आणि पुसून घ्या. कोथिंबीर देठासकट कोथिंबीर तोडून घ्या. कोथिंबीर टिशू पेपरने पुसून घ्या. त्यानंतर टिशू पेपरमध्ये बांधून एका झिपलॉक बॅगमध्ये ठेवा अशाप्रकारे ठेवलेली कोथिंबीर 15 ते 20 दिवस टिकते. (चेहऱ्यासाठी वापरा coconut milk face pack; त्वचा होईल Glowing) तिसरी पद्धत बाजारामधून आणलेली कोथिंबीर देठासकट व्यवस्थित तोडून पाण्यामध्ये कोथिंबीर धुऊन घ्या. एका सुती कापडावर कोथिंबीर पसरून ठेवा. पंख्याच्या हवेवर थोडावेळ राहूद्या. यानंतर पुन्हा एकदा सुती कापडाने पुसून त्यातलं उरलेलं पाणी काढून टाका. ही कोथिंबीर डब्यांमध्ये भरून ठेवा. डब्यातली कोथिंबीर वापरल्यानंतर डब्याचं झाकण पुन्हा पुसून लावून ठेवा. अशाप्रकारे कोथिंबीर 1 ते 2 आठवडे ते करू शकता.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Easy hack, Lifestyle

  पुढील बातम्या