मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुम्ही भेसळयुक्त चहा तर पित नाही ना? ‘या’ पद्धताने ओळखा चहाची शुद्धता

तुम्ही भेसळयुक्त चहा तर पित नाही ना? ‘या’ पद्धताने ओळखा चहाची शुद्धता

अतिप्रमाणामध्ये चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे.

अतिप्रमाणामध्ये चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे.

आपली सकाळ चहाचा कप (Cup Of Tea) हातात घेऊनच होते. पण, दररोज आपण पित असलेला चहा खरचं शुद्ध (Pure) आहे का याचीही माहिती असावी.

नवी दिल्ली,26 जुलै : भारतात चहा (Tea) हे अतिशय महत्वाचं पेय आहे. चहाशिवाय लोकांच्या दिवसाची सुरवातच होत नाही. तर संध्याकाळी, थकवा दूर करण्यासाठी, अगदी पाहूण्यांचं स्वागत सुद्धा चहाच्या कपाने (Cup Of Tea) होतं. चहा आरोग्यासाठी चांगला (Health Benefits) आहेच आणि चहा प्यायल्यामुळे आपल्याला खुप फ्रेश (Fresh) वाटतं.

पण ज्या चहाने तुम्ही दिवसाची सुरूवात करता तो चहा खरचं किती शुद्ध (Pure Tea) आहे किंवा त्यात किती प्रमाणात भेसळ केली जाते याची माहिती आहे का? बाजारात मिळणाऱ्या कितीतरी पदार्थांमध्ये भेसळ असते तसंच, चहा पावडरमध्येही भेसळ केलेली असू शकते. त्यामुळे तोंडाची चव खराब होण्याबरोबर आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळेच घरतच्या घरीच जर तुम्हाला हे कळलं की दिवसातून दोन ते तीन कप पिणारा चहा भेसळयुक्त किंवा बनावट आहे? चहाची शुद्धता कशी तपासायची याची माहिती घेण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा.

(केसांबरोबर मेंदूसाठीही ब्राम्ही फायदेशीर; स्ट्रेस हार्मोन होतील कमी)

टिश्यु पेपरने चेक करा

एक टिश्यू पेपर घ्या आणि त्यावर दोन चमचे चहा पावडर टाका. या  चहा पावडरवर पाण्याचे थेंब सोडा आणि उन्हात ठेवा. थोड्या वेळाने चाहा पावडर बाजूला करा. चहा पावडरमध्ये भेसळ असेल तर, टिश्यू पेपरवर डागांच्या खुणा दिसतील. पण शुद्ध चहा पावडर आपला रंग सोडणार नाहीत.

(सोडून द्यायाल शिका! अन्यथा अपराधीपणाची भावना संपवेल तुमचा आत्मविश्वास)

हातावर चोळा

आपल्या हातात चहा पावडर घ्या आणि बोटांनी हातावर 2 मिनटं चोळा. चोळताना आपल्या हाताला रंग लागला तर, समजा की चहा पावडरमध्ये भेसळ आहे.

(या आठवड्यात ठरवलेले प्लान होतील का पूर्ण? जाणून घ्या तुमच्या राशीत काय आहे?)

पाण्यात मिसळा

एका ग्लासामध्ये थंड पाणी घ्या आणि त्यात 2 चमचे चहा पावडर घाला. 2 मिनिटं हे पाणी तसचं राहू द्या. पाण्याचा रंग बदलला तर समजा की चहा पावडरमध्ये भेसळ आहे. भेसळ नसेल तर, रंग बदलला नाही.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Lifestyle, Tea