Home /News /lifestyle /

'या’ घरगुती उपायांनी करा झुरळांचा बंदोबस्त; होईल नायनाट

'या’ घरगुती उपायांनी करा झुरळांचा बंदोबस्त; होईल नायनाट

झुरळ घरात वाढल्यानंतर त्यांचा नायनाट करणं कठीण होऊन बसतं. बऱ्याचदा किचनमध्ये कॉकरोच वावरतांना दिसतात. यामुळे किचनमध्ये जेवण बनवण्याचीही इच्छा होत नाही.

    नवी दिल्ली, 26 जुलै: पावसाळ्यामध्ये (Monsoon) घरातली स्वच्छता  (Cleaning)  अत्यंत महत्त्वाची असते दमट हवेमुळे  (Humid Climate) घरात किडे,मुंग्या आणि झुरळांची  (Cockroach) संख्या खूप जास्त वाढते. घरामध्ये फर्निचर असेल तर, अशा ठिकाणी दमट हवेमुळे कॉकरोच जास्त होतात. झुरळ घरात वाढल्यानंतर त्यांचा नायनाट करणं कठीण होऊन बसतं. बऱ्याचदा किचनमध्ये कॉकरोच वावरतांना दिसतात. यामुळे किचनमध्ये जेवण बनवण्याचीही इच्छा होत नाही. कॉकरोज एकदा झाल्यानंतर त्यांची संख्या झपाट्याने वाढत राहते. त्यामुळे वेळेस बंदोबस्त करायला हवा. झुरळ झाल्यानंतर आपण त्याच्यावरती बाजारातले स्प्रे आणून मारतो. मात्र त्यात मधील विषारी पदार्थ आरोग्याला घातक (Harmful For Health) असतात. ज्याचा आपल्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.घरात झालेले झुरळ पळवण्यासाठी काही घरगुती उपाय करता येऊ शकतात. जेवताना 'हे' पदार्थ कधीच खाऊ नका एकत्र; अनेक आजारांचं होईल निमित्त... रॉकेल रॉकेलचा वास अत्यंत उग्र असतो. त्यामुळेच कॉकरोच पळवून लावण्यासाठी याचा वापर करता येऊ शकतो. घरात साफसफाई करताना पाण्यामध्ये थोडं रॉकेल टाकून लादी पुसावी किंवा रॉकेल एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून कॉक्रोज असलेल्या ठिकाणी मारल्यास झुरळ पळून जातात. बोरिक एसिड, पीठ आणि साखर बोरिक एसिड, पीठ आणि साखर समान प्रमाणामध्ये घेऊन याचा एक गोळा बनवा. या गोळ्याचे छोटे छोटे गोळे तयार करून किचन ट्रॉली, कपाट, फ्रिज यांच्या खाली ठेवून द्या. या गोळ्या खाल्ल्या नंतर झुरळ यातील बोरिक अ‍ॅसिड मुळे मरतील. मात्र घरात लहान मुलं असतील तर विशेष काळजी घ्यावी. भारतात नाही प्रोटीनबद्दल जागृती; किती घ्यावं? हेच माहित नसतं लवंग स्वयंपाकामध्ये वापरला जाणाऱ्या लवंगांचा वापर झुरळांसाठी होऊ शकतो. लवंगांचा तीव्र वास झुरळांना आवडत नाही. त्यामुळेच ज्या ठिकाणी लवंग टाकलेले असते तिथे झुरळ येत नाहीत. फ्रीज, किचन ट्रॉली, कपाट आणि घरातल्या कोपऱ्यांमध्ये 4 ते 5 लावंगा ठेवून द्या. याठिकाणी झुरळ जाणार नाहीत. मद्यपान करताना 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका! तमालपत्र तमालपत्राचा वास देखील तीव्र असतो. झुरळांनी हा वास आवडत नाही. त्यामुळेच तमालपत्राचा वापर झुरळांना पळवून लावण्यासाठी होऊ शकतो. ज्या भागामध्ये झुरळ फिरत राहतात त्या भागांमध्ये तमालपत्राच्या पानांचा चुरा टाका मात्र ही तमालपत्र काही दिवसांनी बदलत राहावी लागतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Home remedies, Lifestyle, Wellness

    पुढील बातम्या