Home /News /lifestyle /

पावसाळ्यात तांदळांना किड लागत असेल तर ‘हे’ उपाय करुन पाहा

पावसाळ्यात तांदळांना किड लागत असेल तर ‘हे’ उपाय करुन पाहा

तांदूळातील किडे जाण्यासाठी तांदूळाच्या डब्याच्या जवळ माचिसचा बॉक्स ठेवा.

तांदूळातील किडे जाण्यासाठी तांदूळाच्या डब्याच्या जवळ माचिसचा बॉक्स ठेवा.

पावसाळ्यात दमट वातावरणामुळे तांदळांना किड लागते. तुमच्याही घरात तांदुळ खराब व्हायला लागले असतील तर, हे उपाय करुन पहा.

    दिल्ली,26 जुलै: पावसाळ्यात हवा दमट (Humid Atmosphere) झालेली असते त्यामुळे तांदळाला किड (Insect) लागू शकते. त्यामुळे तांदूळ खराब होतात. अस किड पडलेले तांदूळ खाण्याची इच्छा वाटत नाही. एवढंच नाही तर,  तांदूळ साफ करायालाही फार झंझट होतं. वेळही वाया जातो. त्यातही साफ करून तांदूळ शिजत ठेवले तरी त्यात किड शिल्लक नाहीना अशी भीती वाटत राहते. याच समस्येवर उपाय (Remedy) करण्यासाठी या सोप्या पद्धती वापरून पहा. माचिसचा बॉक्स ठेवा तांदूळातील किडे जाण्यासाठी तांदूळाच्या डब्याच्या जवळ माचिसचा बॉक्स ठेवा. यामध्ये सल्फर असतं. ज्यामुळे तांदळाचं किटकांपासून संरक्षण करण्यास मदत होते. इतकंच नही तर, इतर कोणत्याही धान्यांला किडीपासून वाचवण्यासाठी आपण वापरू शकता. लवंगा टाका तांदळातल्या किडींपासून वाचण्यासाठी लवंगांची मदत घेऊ शकतो. यासाठी तांदळाच्या डब्यात 10 ते 15 लवंगा ठेवून द्या. तांदळाला किड लागली असेल तर, त्या मरून जातील आणि किडी पुन्हा होणार नाहीत. (सोडून द्यायाल शिका! अन्यथा अपराधीपणाची भावना संपवेल तुमचा आत्मविश्वास) फ्रीजमध्ये ठेवा थोडासाच तांदूळ शिल्लक असेल तर, तो फ्रीजमध्ये ठेवू शकता. यासाठी तांदूळ एअर टाइट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे तांदूळाला किड लागणार नाही. (केसांबरोबर मेंदूसाठीही ब्राम्ही फायदेशीर; स्ट्रेस हार्मोन होतील कमी) तमालपत्र किंवा कडुलिंबाची पान ठेवा तांदळात 10 ते 15 तमालपत्र घालून ठेवा. याशिवाय कडुलिंबाच्या पानांचाही वापरता येते. हे दोन्ही उपाय तांदळांना किडींपासून वाचवतात. (कच्चं दूध आरोग्यासाठी घातक; दुष्परिणामांमुळे होतील पोटाचे विकार) लसणाच्या पाकळ्या ठेवा तांदूळातल किड रोखण्यासाठी तांदळाच्या डब्यात 8 ते 10 न सोलेल्य लसणाच्या पाकळ्या घालून ठेवा. एक आठवड्यानंतर या पाकळ्या सुकायला सुरवात झाल्यावर पाकळ्या काढून दुसऱ्या पाकळ्या तांदळामध्ये ठेवा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Wellness

    पुढील बातम्या