तुम्ही भेसळयुक्त चहा तर पित नाही ना? ‘या’ पद्धताने ओळखा चहाची शुद्धता
पिंपल्सपासून मुक्ती मुरुमांकरता फेस पॅक करताना 2 चमचे नारळाचे दूध घ्या, त्यात 1 चमचा गुलाब पाणी घाला. कापसाने हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. नंतर 2 मिनिटांसाठी हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर 10 मिनिटं चेहऱ्यावर राहू द्या. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. कोरडी त्वचा मऊ आणि चमकदार करण्यासाठी कोरडी त्वचा मऊ आणि चमकदार होण्यासाठी 2 चमचे नारळचं दूध, 1 चमचा दही मिसळून दाट पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट आपल्या चेहर्यावर आणि गळ्यावर चांगली लावा आणि २ ते 3 मिनिटं चेहऱ्यावर मसाज करा. नंतर 15 मिनीटांनी चेहरा पाण्याने धुवा. महामार्गावर तरुणांची फिल्मी स्टाईल भाईगिरी पाहिलात का? बघा LIVE VIDEO स्किन एक्सफोलिएट करण्यसाठी दोन-तीन चमचे ओट्स बारीक वाटून घ्या. एका भांड्यात एक मोठा चमचा ओट्स घ्या आणि 3 ते 4 चमचे नारळाचं दूध मिसळून जाड पेस्ट तयार करा. यानंतर ही पेस्ट आपल्या चेहर्यावर आणि गळ्यावर लावा आणि त्यावर 5 ते 7 मिनिटं मॉलिश करा आणि 20 मिनिटांनी साध्या पाण्याने धुवा. यामुळे त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी फायदा होईल.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Face Mask, Home remedies, Lifestyle