दिल्ली, 14 जून : मुली मोठ्या होऊ लागल्या की, पालक
(Parenting) विशेषतः आई मुलीपासून काही गोष्टी लपवायला लागते. त्यामुळे याच वयात शरीरात
(Changes in Body of teenage girl) होणारे बदल त्यातून मनात येणाऱ्या प्रश्नांमुळे मुलींची अवस्था गोंधळल्या
(teenager Confusion) सारखी होते. मुलगा किंवा मुली 16 वर्षांचे झाले की, त्यांना सांगायला हव्यात अशाच गोष्टी पालक लपवायला लागतात. त्यामुळे या नकळत्या वयात होऊ नयेत अशा चुका होतात.
मुलामुलींचं शरीर वेगवेगळ्या बदलातून जात असताना. माझ्याच शरीरात हे बदल होतात की सगळ्यांच्या? पाळी का येते आहे? मुलांबद्दल आकर्षण का वाटतं आहे? असे असंख्य प्रश्न मुलींच्या मनात पिंगा घालत असतात. त्याची उत्तर छुप्या पद्धतीने शोधण्याचा प्रयत्नही होतो. त्यावेळी ओरडा मिळाल्याने मुली गप्प बसतात. पण, उत्तरं शोधत राहतात.
या वयात मुलीच्या आईने मुलीची मैत्रीण
(Friend) बनून समजूत घालायला हवी. त्यांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं द्यायला हवीत. त्यांच्यापासून काय लपवावं ? आणि काय सांगावं? हे ठरवायला हवं.
(
रोज सकाळी करा हा सोपा उपाय; पुरुषांच्या लैंगिक समस्या होतील दूर)
मुलींसाठी घरातले नियम
तू मुलगी आहेस, लोकांच्या घरी जायचं आहे, असं बोलू नको, वागू नको असे हजार सल्ले दिले जातात. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला तू मुलगी आहेस हेच उत्तर दिलं जातं. असं बोलण्यापेक्षा उलट त्यांच्या मनातला न्युनगंड कमी करण्याचा प्रयत्न करा. काही घरात मुली ठराविक वयात आल्या की त्यांना खेळण्यासही मनाई केली जातं. त्यामुळे आपोआपच त्यांचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. याचा परिणाम त्याच्या संपूर्ण आयुष्यावर होतो.
(
रोज केला ‘हा’ उपाय तर चेहरा होईल सुंदर; फॉलो करा शहनाज हुसैन यांच्या टिप्स)
बॉडीशेमिंग
15 ते 16 वर्षे वयात मुलींच्या शरीरात बदल होतात. त्याचवेळी मासिक पाळी येऊ लागलेली असते. काही मुलींचं वजन वाढतं, तर काही मुली बारीक व्हायला लागता. त्यावरून मुलींना बोल लावण्यापेक्षा त्यांचा आत्मविश्वास वाढवा. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरून त्यांना बडबड करू नका.
भेदभाव
बहिणभावंडांमध्ये मुलगा मुलगी हा भेदभाव करू नका. त्यांना समानतेची वागणूक द्या. तो मुलगा आहे म्हणून असं आणि तु मुलगी आहेस म्हणून तुझ्यासाठी हा नियम असं वागण्याचा काळ केव्हाच गेला. आता समानतेचा काळ आहे. मुलींला जसं घरातली कामं करायला शिकवतो. तसं मुलाला शिकवतो का? याचा विचार करा. मुलांनीही मुलींच्या बरोबर प्रत्येक गोष्ट करायला सांगा. त्यामुळे समानतेची भावना वाढेल.
(
लहान मुलांसाठी आता खास Corona vaccine तयार; सप्टेंबरमध्येच होणार लाँच)
मासिक पाळी
गेल्या काही वर्षात मुलींना कमी वयात मासिक पाळी येऊ लागली आहे. त्यामुळे अगदी नकळत्या वयात येणाऱ्या पाळीबद्दल काहीच माहित नसल्याने काळजी कशी घ्यायची, स्वच्छता कशी राखायची हेही त्यांना माहिती नसतं. त्यातच आजही काही घरात मुलींना या दिवसात वेगळं ठेवायची पद्धत आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात घृणा निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी त्यांच्याशी संवाद शाधा. त्यांना हा बदल त्यांच्या शरीरात का होत आहे याची माहिती द्या.
(
आश्चर्य! व्हेलने शिकार केली; 40 सेकंदातच तिच्या जबड्यातून जिवंत आली व्यक्ती)
तुलना करू नका
मुलागा आणि मुलगी अशी तुलना नकळतपणे आजही घरांमध्ये केली जाते. ठराविक गोष्टी मुलांनीच करायच्या असतात. असा एक अलिखीत नियम आपल्या समाजाने बनवलेला आहे. मुलालाच हे जमेल तुला नाही असं बोलण्यापेक्षा त्यांचा उत्साह वाढवा.
लक्षात ठेवा या वयात झालेली जडणघडण मुलीच व्यक्तिमत्व बदलू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.