• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • आश्चर्य! व्हेलने शिकार केली; पण अवघ्या 40 सेकंदातच तिच्या जबड्यातून जिवंत बाहेर आली व्यक्ती

आश्चर्य! व्हेलने शिकार केली; पण अवघ्या 40 सेकंदातच तिच्या जबड्यातून जिवंत बाहेर आली व्यक्ती

व्हेलशी संबंधित तज्ज्ञांच्या मते, असं प्रकरण कधीच ऐकण्यात आलेलं नाही.

 • Share this:
  वॉशिंंग्टन, 12 जून : शार्क, व्हेल (Whale) अशा मोठ्या माशांची एखादी व्यक्ती शिकार झाली की ती परत येण्याची शक्यताही नाहीच. अनेकदा हॉलिवूड फिल्ममध्ये आपण पाहतो की अशा माशांनी शिकार केल्यानंतर त्यांच्या पोटातून किंवा तोंडातून माणूस बाहेर पडला असावा, प्रत्यक्षात असं होऊ शकत नाही हे आपल्यालाही माहिती आहे. पण असाच अशक्य असलेला फिल्मी सीन प्रत्यक्षात घडला आहे. अमेरिकेतील एक व्यक्ती चक्क व्हेलच्या जबड्यातून बाहेर (Whale swallowed man alive) आली आहे. अमेरिकेतील मॅसाच्युसेट्समधील ही शॉकिंग घटना घडली आहे. एका व्यक्तीला एका भल्यामोठ्या व्हेलने गिळलं. जवळपास 40 सेकंद ही व्यक्ती व्हेलच्या तोंडात होती. अवघ्या 40 सेकंदातच ती व्यक्ती व्हेलच्या जबड्यातून बाहेर पडली. 56 वर्षांचा माइकल पॅकर्ड (Michael Packard) गेल्या 40 वर्षांपासून लॉबस्टर डाइव्हर म्हणून काम करतात. समुद्रातील वेगवेगळ्या जीवांना पकडून ते बाजारात विकतात. शुक्रवारी ते समुद्रात 35 फूट खोलवर गेले. त्यावेळी एका व्हेल माशाने त्यांना आपल्या जबड्यात घेतलं. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, पॅकर्डने सांगितलं, मला सुरुवातीला मोठा धक्का बसला आणि नंतर सर्वकाही काळं दिसू लागलं. माझ्या शरीराची हालचाल मला जाणवत होती. मला पहिलं वाटलं की कोणत्या शार्कने हल्ला केला. नंतर मला समजलं मी व्हेलच्या आत आहे. व्हेल आपल्या तोंडात जोर लावत होती. आता माझा मृत्यू अटळ आहे. इथून मी आता बाहेर पडू शकत नाही हे मला माहिती होतं. मी माझ्या मुलांचाच विचार करत होतो. हे वाचा - OMG! हे डोले-शोले माणसाचे नाही तर प्राण्याचे; कोण आहे हा Bodybuilder animal पाहा पण नंतर त्याच्या लक्षात आलं की त्यांना व्हेलचा ना कोणता दात लागला आहे, ना त्यांना जखम झाली आहे. तेव्हा त्याने व्हेलच्या तोंडातून बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली. व्हेल आपला तोंड हलवू लागली. 40 सेकंदात व्हेलनं पॅकर्डला आपल्या तोंडातून बाहेर फेकलं. व्हेलने उलटी केली आणि पॅकर्ड तिच्या जबड्यातून सुखरूप बाहेर पडले. पॅकर्ड म्हणाले, मला अचानक प्रकाश दिसू लागला. व्हेल आपलं डोकं इकडे-तिकडे हलवत होती. मी समुद्रात होतो, हे माझ्या लक्षात आलं. सुरुवातीला मला विश्वासच होत नव्हतं की मी तिथून बाहेर आलो. त्यानंतर मी मी मला कोणती दुखापत तर झाली नाही ना हे पाहिलं. पॅकर्ड मित्राच्या मदतीने समुद्रातून बाहेर आला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या उपचार सुरू आहे. हे वाचा - पाण्यातच रंगला मगर अन् हत्तीचा सामना, पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO व्हेलशी संबंधित तज्ज्ञ जुक रॉबिन्स यांनी सांगितलं, एकतर ती व्हेल लहान असावी किंवा कदाचित चुकून व्हेलने त्याला तोंडातून बाहेर फेकलं असावं. पण याआधी असं प्रकरण कधीच ऐकण्यात आलेलं नाही.
  Published by:Priya Lad
  First published: