• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • लहान मुलांसाठी आता खास Corona vaccine तयार; सप्टेंबरमध्येच होणार लाँच

लहान मुलांसाठी आता खास Corona vaccine तयार; सप्टेंबरमध्येच होणार लाँच

लहान मुलांच्या कोरोना लसीकरणात (Corona vaccine for children) ही लस महत्त्वाची भूमिका बजावेल.

 • Share this:
  मॉस्को, 12 जून : लहान मुलांनाही लवकरात लवकर कोरोना लस देण्याची (Corona vaccine for children)  धडपड सुरू आहे. आता लस म्हटली की सुरुवातीला सामान्यपणे इंजेक्शन आलं. सध्या ज्या कोरोना लशी दिल्या जात आहेत. त्या इंजेक्शनद्वारेच दिल्या जात आहे. इंजेक्शनची भीती तर मोठ्या माणसांनाही वाटतं, त्यावरून भीतीपोटी लहान मुलं ही लस कशी घेणार अशी चिंता पालकांना आहेच. पण टेन्शन घेऊ नका, आता लहान मुलांसाठी खास कोरोना लस (Children corona vaccination) तयार करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी नेझल स्प्रे (Nasal spray corona vaccine) स्वरूपात कोरोना लस तयार करण्यात आली आहे. रशियामध्ये (Russia) ही लस (Russia corona vaccine) तयार केली असून ती सप्टेंबरमध्येच लाँच केली जाणार आहे, असं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. ही कोणती नवी लस नाही तर सध्या भारतात परवानगी मिळालेली रशियाची स्पुतनिक  V लसच आहे. जी रशियाच्या गॅमेलिया इन्स्टिट्यूने तयार केली आहे. हे वाचा - अरे बापरे! हुबेहुब COVID-19 सारखेच; चीनमध्ये सापडले आणखी नवे 24 CORONAVIRUS TASS न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार  गॅमेलिया इन्स्टिट्यूचे प्रमुख अॅलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी सांगितलं, आम्ही तयार केलेला नेझेल स्प्रे ही स्पुतनिक V लस आहे. ती फक्त इंजेक्शनऐवजी नोझलमार्फत दिली जाईल. 15 सप्टेंबरपासून ही लस उपलब्ध होईल. 8 ते 12 वयोगटातील मुलांसाठी ही लस सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. या वयोगटातील मुलांवर या लशीची चाचणी घेण्यात आली आहे. त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम दिसला नाही. त्यांच्या शरीराचं तापमानही वाढलं नाही, असं गिंट्सबर्ग यांनी सांगितलं. पण किती मुलांवर ही चाचणी घेण्यात आली हे मात्र स्पष्ट केलेलं नाही. भारतातही लहान मुलांना दिली जाणार का ही लस? भारतात सध्या लहान मुलांसाठी भारतातच तयार करण्यात आलेली भारत बायोटेकची कोवॅक्सिन लशीला मंजुरी मिळालेली आहे. याचं लहान मुलांवर ट्रायलची तयारी सुरू आहे. आठ आठवड्यात हे ट्रायल पूर्ण होणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. तर भारतात सध्या आपात्कालीन मंजुरी मिळालेल्या तीन लशींमध्ये रशियाच्या स्पुतनिक V लशीचाही समावेश आहे. त्यामुळे कदाचित या लशीचा वापर लहान मुलांवरही होऊ शकतो. हे वाचा - Explainer: पालकांनो लक्ष द्या! जाणून घ्या लहान-किशोरवयीन मुलांसाठी कोरोना लस सुरक्षित आहे का दरम्यान भारतातील आणखी एका कंपनीने आपल्या कोरोना लशीसाठी आपात्कालीन परवानगी मागण्याच्या तयारीत आहे. गुजरातची  झायडस कंपनी DCGI कडे आपल्या लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी मिळावी, यासाठी अर्ज करणार आहे. जर मंजुरी मिळाली तर झायडूस 5 कोटी डोस देणार आहे. ते लहान मुलांसाठी वापरता येतील, असं झायडसनं सांगितलं आहे. शिवाय अमेरिकेतील फायझर कंपनीची लसही भारतात दिली जाणार आहे. ही जगातील एकमेव अशी कंपनी आहे. ज्यांची लस मुलांनाही दिली जात आहे. आता ही लस भारतातील मुलांनाही दिली जाणार असल्याचे, दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितल.. फायझरची लस लवकरच भारतात उपलब्ध होणार असल्याचं काही दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलं.
  Published by:Priya Lad
  First published: