कॅनबेरा, 15 जून : काही जुळी भावंडं (Twins) अशी असतात जी दिसायला अगदी सेम टू सेम दिसतात. काढीमात्रही त्यांच्यात फरक नसतो. त्यांनी एकसारखे कपडे घातले की त्यांना ओळखणंच अशक्य. काही भावंडांच्या तर चेहऱ्याप्रमाणेच आवडीनिवडी आणि स्वभावही सारखाच असतो. अशावेळी लोक त्यांना तुम्ही दोघंही एकाच व्यक्तीशी लग्न करू नका, असं मजेत म्हणतात. पण हे प्रत्यक्षात केलं आहे, दोन जुळ्या बहिणींनी. अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सेम-टू-सेम दिसणाऱ्या या बहिणींचं सर्वकाही सारखं आहे. अगदी नवराही (Twins sister one boyfriend).
ऑस्ट्रेलियातील एना आणि लुसी डिसिंक या जुळ्या बहिणी (Australian twins sister) म्हणजे दोन शरीर आणि एक जीव अशाच आहेत. त्या प्रत्येक गोष्ट एकत्र करायला आवडते. त्या फक्त सारखे कपडे घालतात असं नाही. तर त्यांचं खाणं-पिणं, वर्कआऊट, झोपणं अशी दैनंदिन कामंही एकत्रच असतात. अगदी अंघोळ करतानाही त्या एकत्रच करतात आणि वॉशरूममध्येही एकत्रच जातात.
फक्त सवयी आणि वस्तूंच्या बाबतीच असं नाही. तर त्यांनी आयुष्याचा जो जोडीदार निवडला आहे, तोसुद्धा एकच आहे. एकाच व्यक्तीच्या प्रेमात या दोघी बहिणी पडल्या. त्यांनी त्याच्यासोबत एन्गेंजमेंटही केली, आता त्यांना एकत्रच प्रेग्नंट व्हायचं आहे.
हे वाचा - VIDEO - जिम सुरू होताच पुण्याच्या डॉक्टरबाई जोमात, साडीवरच केला 'झिंगाट' वर्कआऊट
एका शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत या बहिणींनी दावा केला की त्या जगातील सर्वात जवळ असलेल्या अशा जुळ्या बहिणी आहेत, ज्या प्रत्येक गोष्ट एकत्र करतात. त्यामुळे त्यांना आता वेगळं करणं, त्यांच्यात दुरावा निर्माण करणंच कठीण झालं आहे.
2011 साली एना आणि लुसीची भेट इलेक्ट्रिशिअन असलेल्या 37 वर्षांच्या बेन बायर्न्स सोबत झाली. बेन या दोघींकडे आकर्षित झाला. त्याने या दोघींनाही एकाच वेळी प्रपोज केलं आणि त्यांनी होकारही दिला.
न्यूझीलंड हर्लडने दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियात अशा लग्नाला कायद्याने मान्यता नाही. ऑस्ट्रेलियातील विवाह कायदा या तिघांसाठीही अडचणीचा ठरू शकतो. ऑस्ट्रेलियातील विवाह कायदा 1961 नुसार एकच व्यक्ती दोन लग्न करू शकत नाही. त्यामुळे हे तिघंही मलेशिया, इंडोनेशिया किंवा अमेरिकेत जाऊन लग्न करू शकतात.
हे वाचा - 10कोटी वर्षांनी आईच्या गर्भापासून वेगळं झालं बाळ, 5 बाळांना जन्म देताना गेला जीव
लग्नानंतर या दोन्ही बहिणींना बेनपासून एकाच वेळी मूल हवं आहे. त्यांना एकत्रच प्रेग्नंट व्हायचं आहे. यासाठी त्या आयव्हीएफचा विचार करत आहेत. अन्ना म्हणाली, जर ती प्रेग्नंट झाली तर लुसीसुद्धा प्रेग्नंट होईल कारण आमचं शरीर सारखंच राहण्याची गरज आहे. संयुक्त गर्भधारणेचा प्रयत्न कठीण ठरू शकतो, हे त्यांनी मान्य केलं आहे. तसंच यामुळे बेनवर दबाव असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Couple, Pregnancy, Viral, Wedding, Wife and husband