म्यानमार, 15 जून: अलीकडेच म्यानमारमधील काही संशोधकांनी लाखो वर्ष जुन्या गोगलगायची प्रसूती केली. एका पिल्लाला जन्म देतानाच या मादी गोगलगायीचा मृत्यू झाला होता. पण गोगलगायीचं हे पिल्लू आईच्या नाभीवर तसंच चिकटून राहिलं होतं. दशलक्ष वर्षांनंतर शास्त्रज्ञांनी त्या दोघांना वेगळं करत प्रसूती प्रक्रिया पूर्ण केली आहे. संशोधकांनी असा दावा केला आहे की, या मादीचा पिल्लाला जन्म देताना मृत्यू झाला आहे. इतक्या वर्षांपासून संबंधित गोगलगायचा मृतदेह एका झाडाच्या सालात सुरक्षित राहिला होता. संबंधित मादी गोगलगाय मागील 99 दशलक्ष वर्षांपासून तिच्या बाळासह या झाडाच्या सालात अडकली होती. पिल्लांना जन्म देताना या गोगलगायीचा मृत्यू झाला. त्यामुळे पिल्लांना आईच्या नाभीपासून वेगळं होता आलं नाही. त्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला. तेव्हापासून आईचा आणि पिल्लांचा मृतदेह झाडाच्या सालात अडकून राहिला होता. आता कोट्यावधी वर्षांनंतर म्यानमारमधील शास्त्रज्ञांना हा मृतदेह सापडला आहे. ही जगातील ज्ञात असलेली सर्वात जुनी जन्माची घटना असल्याचं मानलं जातं आहे. विशेषत: गोगलगायच्या बाबतीत. जीवाश्म खूपच सुरक्षित होते संशोधकाने गोंडवाना रिसर्च या जर्नलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, जन्माच्या बाबतीत ही घटना आजपर्यंतची सर्वात अनोखी आणि जुनी घटना आहे. गोगलगायच्या जन्माबाबत अशी घटना यापूर्वी कधीही निदर्शनास आली नव्हती. आई आणि पिल्लांचे मृतदेह अत्यंत सुरक्षित होते. खरंतर झाडाची सुरक्षित सालीमुळे हे जीवाश्म सुरक्षित राहिले आहे. गोगलगायच्या पोटातील नाभीसारखा तंतू त्यांच्या सर्व बाळांना चिकटलेला होता. हे ही वाचा- VIDEO: बापरे! तरुणीनं एका हातानं पकडला विषारी साप, धाडसाचं होतंय कौतुक गोगलगायीला मृत्यूबाबत अगोदरच मिळाला होता संकेत फ्रँकफर्टमधील Senckenberg Research Institute and Natural History Museum चे जीवशास्त्रज्ञ अॅड्रिएन जोच यांनी सांगितलं की, मृत्यूपूर्वी गोगलगायीला मृत्यूचा संकेत मिळाला होता. कारण तिचा मृतदेह रेड अलर्ट स्थितीत सापडला होता. जेव्हा गोगलगायीला मृत्यूचा धोका असतो. तेव्हा गोगलगाय रेड अलर्ट स्थितीत जाते. गोगलगायीच्या अनेक प्रयत्नानंतरही ती आपल्या पिल्ला वाचवू शकली नाही, असंही संशोधकाचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.