Home /News /lifestyle /

हातावरच्या रेषा सांगतात तुम्ही जाणार परदेशात; तुमच्या हातावर आहे का ‘ती’ रेष?

हातावरच्या रेषा सांगतात तुम्ही जाणार परदेशात; तुमच्या हातावर आहे का ‘ती’ रेष?

हस्तरेखाशास्त्रानुसार तुमच्या आयुष्यातले काही योग हस्तरेषेवरून ओळखता येतात.

हस्तरेखाशास्त्रानुसार तुमच्या आयुष्यातले काही योग हस्तरेषेवरून ओळखता येतात.

हस्तरेखाशास्त्रानुसार तुमच्या आयुष्यातले काही योग हस्तरेषेवरून ओळखता येतात. परदेशात जाण्याची संधी असणाऱ्याच्या हातावर एक खास रेष अगदी ठळक असते.

    नवी दिल्ली, 21 जुलै : ज्योतिष शास्त्राप्रमाणे (Astrology) हस्तरेखाशास्त्रालाही महत्त्व आहे. हस्तरेषेवरूनही एखाद्याचं भाग्य ओळखता येतं. एखाद्या व्यक्तीला परदेश यात्रेची संधी आहे का? हे त्याच्या हस्तरेषेवरून कळतं. हस्तरेषाशास्त्रानुसार(According to palmistry) माणसाच्या हातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात. ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना आपल्याला माहिती होतात. जीवन रेषा आयुष्य किती असेल हे सांगते. भाग्यरेखा भाग्याबद्दल माहिती देते तर, एखाद्या व्यक्तीच्या हृदय रेखा एखाद्या व्यक्तीच्या अटीट्युड बद्दल ही माहिती देऊ शकते. तसच परदेश यात्रेची (Foreign Travel) संधी आहे का? हे सांगणारीही रेषा आपल्या हातावरती असते. आपली जीवन रेषा आणि हृदय रेषा यामधून निघणाऱ्या रेषेला परदेश यात्रा रेखा म्हणून पाहिलं जातं. ही रेषा आपल्या हातावरच्या चंद्र पर्वतापर्यंत जात असेल तर विदेश प्रवासाची संधी मानली जाते. चंद्र पर्वतावर एखादी सरळ रेषा असेल तर, त्या व्यक्तीला परदेशात जाण्याची संधी असते. (साप्ताहिक राशीभविष्य: ग्रहस्थितीत होणार महत्त्वाचा बदल; आठवडा कसा असेल?) एखाद्या व्यक्तीच्या हातावरील चंद्र पर्वतावर असलेली रेषा स्पष्ट आणि मोठी असेल तर या व्यक्तीला अनेक वेळा परदेशात जाण्याची संधी मिळते. ज्या व्यक्तीच्या हातावरचा गुरू पर्वत उंच असेल आणि जीवन रेषे सारखी एखादी रेषा गुरु पर्वतापर्यंत जात असेल तर असे लोक उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात.हस्तरेषाशास्त्रानुसार जीवन रेषा, भाग्यरेषेवरून जाणारी एखादी रेष असेल तर त्या व्यक्तीला परदेशात जाण्याचे योग असतात. (शीतल मोत्याचे फायदे तितकेच तोटे; 5 राशींनी मुळीच वापरू नये) चंद्र पर्वतावरच्या आसपासच्या भागामध्ये जरी वेड्यावाकड्या रेषा असतील तरी त्यावरून विदेशी यात्रेचे योग ओळखता येऊ शकतात. या रेषा जितक्या स्पष्ट आणि ठळक असतात तितकी त्या लोकांना परदेशात स्थायिक होण्याची संधी असते. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या