मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

साप्ताहिक राशीभविष्य: ग्रहस्थितीत होणार महत्त्वाचा बदल; आठवडा कसा असेल?

साप्ताहिक राशीभविष्य: ग्रहस्थितीत होणार महत्त्वाचा बदल; आठवडा कसा असेल?

दैनंदिन राशिभविष्य

दैनंदिन राशिभविष्य

आज दिनांक 18 जुलै 2021 रविवार आषाढ ज्येष्ठ शुद्ध नवमी. आज ग्रहस्थिती मध्ये अतिशय महत्त्वाचा बदल होणार आहे. या सर्व ग्रह स्थिती नुसार पाहूया हा आठवडा कसा जाईल ते.

आज दिनांक 18 जुलै 2021 रविवार  आषाढ ज्येष्ठ शुद्ध नवमी.

आज ग्रहस्थिती मध्ये अतिशय महत्त्वाचा बदल होणार आहे. तो म्हणजे शुक्राचे राशी परिवर्तन. 17 जुलै 2021 रोजी शुक्राचा सिंह राशीत सकाळी 9 वाजून 26 मिनिटानी प्रवेश झाला असुन तिथे तो 18 ऑगस्ट पर्यंत राहील. आणि देवगुरू बृहस्पती शी  सम सप्तक  योग करेल. गुरु कुंभ राशीत वक्री असून शनि मकर राशीत आहे. सूर्य मंगळ  कर्क राशीत स्थित असून बुध मिथुन राशीत  उच्च अवस्थेत आहे . मात्र मंगळ  लौकरच पुढील राशीत जाणार आहे. वृषभ राशीत तर केतू वृश्चिकेत असणार आहेत. सप्ताहाच्या सुरवातीला चंद्र तुला राशीत असेल.या सर्व ग्रह स्थिती नुसार पाहूया हा आठवडा कसा जाईल ते.

मेष

राशीच्या  चतुर्थ स्थानात रवि मंगळ  तर पंचम स्थानात शुक्र आणि लाभात गुरू. एकूण कुटुंब, घर आणि संतती हा या सप्ताहाचा केंद्र बिंदू असणार आहे. रवी च्या राज राशीतील शुक्र गुरूच्या पूर्ण दृष्टीने संतती संबंधात उत्तम फळ देईल. अनेक लाभ होतील. नवी ओळखी फायद्याच्या ठरतील. घर सजावट  ,खरेदी यावर भर राहील. मात्र वडीलधारी व्यक्ती असेल तर काळजी घ्यावी लागेल. तुमचे मनोबल वाढेल. तसेच प्रसिद्धी, समाजात नावलौकिक होईल. प्रकृती ठीक राहील. सप्ताहाचा पूर्वार्ध थोडा त्रासदायक ठरू शकतो. मात्र उत्तरार्धात उत्तम फळे मिळतील.

वृषभ

चतुर्थ स्थानात प्रवेश करणारा शुक्र गुरूच्या अमृत दृष्टी मुळे  वास्तु संबंधी अनेक शुभ घटना घडवून आणेल. रखडलेले काम ताबडतोब मार्गी लागेल. पैतृक घरा संबंधी निर्णय होईल. ऑफिस मध्ये अतिशय छान वातावरणात  काम होईल. घरा साठी उंची वस्तूंची खरेदी कराल.

शनी सूर्य  व मंगळ प्रतियोग असताना प्रवास टाळलेले बरे. अति साहस नको. पूर्वार्धात राशीतील राहू चंद्र समोरासमोर येणार आहेत.

त्या सुमारास मानसिक त्रास होऊ शकतो. तुमच्या बुद्धी चातुर्याने त्यावर मात कराल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. उत्तरार्ध जास्त शुभ  असेल.

मिथुन

राशीतील उच्चीचा बुध तुम्हाला  उत्तम बुद्धिमत्ता प्रदान करेल तसेच धन स्थानातील ग्रह अनेक मार्गानी पैसा मिळण्याची शक्यता निर्माण करतील. खर्च होईल  पण आवक उत्तम राहील.

तृतीय स्थानात आलेला शुक्र आणि भाग्य स्थानातील गुरू भावंड भेट, आणि भाग्य कारक घटना दर्शवतात. अनेक कलांमध्ये  मन रमेल. किंवा त्यापासून  कीर्ती मिळेल. अष्टमात शनि अणि व्ययात राहू अजूनही सावधगिरीचा इशारा देत आहेत. प्रकृती कडे  लक्ष असू द्या. शनी उपासना करा.उत्तरार्ध जरा जपून राहण्याचा आहे.

कर्क

नुकताच राशीत आलेला रवि तुम्हाला तेजस्वी व्यक्तिमत्त्व बहाल करेल. मात्र मंगळ शनिच्या प्रतियोगात असल्यामुळे कठीण प्रसंग येऊ शकतात. एकट्याने प्रवास करणे टाळा. सरकारी नोकरी असणार्‍यांना उत्तम लाभ.

राशीच्या धनस्थानातील शुक्र आर्थिक लाभ  अणि कुटुंब सुख भरपूर मिळवुन देईल. अलंकार, कपडे यांची  खरेदी कराल. सप्ताहात प्रसन्न घटनांची सुरवात होणार आहे.

सिंह

राशी मध्ये आलेला शुक्र गुरूच्या दृष्टीत  असून सिंह लग्न असलेल्या जातकाना विवाह ठरण्यासाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. व्यवसाय धंद्यात छान लाभ मिळतील. फक्त व्यय स्थानातील ग्रहांची उपस्थिती  आर्थिक नुकसान, दंड भरावा लागणे आदी पासून सावधगिरीचा इशारा देत आहे.प्रकृतीची काळजी घ्या. पूर्वार्ध अनुकूल असून फारसे साहस ना करता सप्ताह घालवा.

कन्या

व्यय स्थानातील शुक्र ,आणि लाभ स्थानातील रवि  परदेशगमन किंवा त्या संबंधी कागद पत्रांची पूर्तता करण्यास अनुकूल आहेत. मात्र ज्यांना मधुमेह आदी विकार आहेत त्यांनी खाण्या पिण्याची काळजी घ्यावी. शनि  अणि मंगळाचा प्रतियोग संतती चिंता दर्शवतो. पूर्वार्धात चंद्र भ्रमण अनुकूल असून सप्ताह सुखात जाईल. मिथुन राशीतील बुध व षष्ठ गुरु कार्यक्षेत्रात मोठी प्रगती घडवतील .इच्छा पूर्ती चा काळ.

तुला

दशम स्थानातील  कर्क राशीचा रवि आणि मंगळ तुमच्या  कार्य क्षेत्रात तुमचे मोठे  नाव करणार आहे. आणि त्यापासून मिळणारे आर्थिक लाभ शुक्र महाराज देतील. संतती साठी अतिशय शुभ काळ. नव विवाहित जोडप्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. आई वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल  रक्तदाब असणार्‍यांनी काळजीपूर्वक राहावे. प्रकृतीच्या तक्रारी असतील तर दुर्लक्ष नको. सप्ताह चांगला असून पुढे जाल.

वृश्चिक

ह्या राशीच्या किंवा लग्नाच्या व्यक्तींना हा आठवडा काही अकल्पित संधी मिळवुन देणारा आहे. जुन्या ओळखीच्या व्यक्ती किंवा सरकारी कर्मचारी यांच्या कडून काही योजना मांडल्या जातील ज्या तुम्हाला फायद्याच्या ठरतील. घर सजावट,खरेदी यावर भर राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. उत्तरार्ध अनुकूल राहील. राशीतील केतू धार्मिक कार्यासाठी शुभ आहे. अष्टमात बुध काही नवीन गूढ शास्त्राचा अभ्यास सुरू करायची इच्छा देईल. पुढे जा.

धनु

अष्टम स्थानात आलेला सूर्य आणि मंगळ अतिशय जपुन राहण्याचा संकेत देत आहेत .पोटा विषयी काही तक्रार असेल तर खूप काळजी घ्या. आर्थिक स्थिती सांभाळा. अनावश्यक खर्च टाळा. मिथुन राशीतील बुध जोडीदाराला  व व्यवसायाला शुभ फळ देईल .तुमच्या  भाग्य स्थानात असलेला शुक्र आणि तृतीय स्थानातील गुरू प्रवास दर्शवतात. पण सध्या तरी प्रवास टाळलेले बरे. भावंडाची उत्तम प्रगती होईल. कलाकारांसाठी अतिशय शुभ काळ.

मकर

अष्टमात प्रवेश करणारा शुक्र काही विशिष्ट  प्रकारच्या चिंता दाखवत आहे.स्त्री रोग किंवा  मधुमेह  असणार्‍यांनी काळजी घ्या. काहींना अचानक आर्थिक लाभ मिळवुन देईल. राशीतील शनि च्या प्रतियोगात रवि जोडीदार आणि व्यावसायिक चिंता निर्माण करेल. संतती संबंधी काही चिंता आता कमी होतील. धार्मिक कार्य  निष्ठेने कराल. एकूण सप्ताहात मिश्र फळ मिळतील. शत्रू पासुन सावध रहा.

कुंभ

राशीतील गुरू आणि सप्तम  स्थानात शुक्राचे प्रभावक्षेत्र  विवाहोत्सुक  मंडळी साठी अतिशय अनुकूल आहे. लग्न  जमायचे संकेत आहेत.पण आर्थिक व्यवहार जपून करा. व्ययस्थानातील ग्रह परदेशातील संधी देतील. तसेच आर्थिक, शारीरिक कष्ट होतील. गुरु कृपा आहे. त्यामुळे सर्व प्रतिकूल परिस्थितीतही तुमचे व्यक्तिमत्त्व  प्रभावी राहील.

मीन

षष्ठात आलेला शुक्र व बारावा गुरू  पुन्हा एकदा परदेशी जाण्याची संधी मिळवुन देतील. बुध वास्तु किंवा वाहन यासाठी अनुकूल आहे. आर्थिक व्यवहार जपून करा. शब्द अत्यंत जपून वापरा. शक्यतो मुलांना जपून राहण्याचा सल्ला द्यावा. मधुमेह असणार्‍या व्यक्तीनी तपासणी करून घ्यावी. खाण्या पिण्याचा योग्य विचार करावा. धाडस नको. पूर्वार्ध प्रतिकूल आहे. गुरु उपासना करावी.

शुभम भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya