Home /News /lifestyle /

Astro Tips - कशामुळे होतो देवी लक्ष्मीचा कोप, घरात अचानक का येते दारिद्र्य?

Astro Tips - कशामुळे होतो देवी लक्ष्मीचा कोप, घरात अचानक का येते दारिद्र्य?

आपल्या अनेक चुकीच्या सवयींमुळे देवी लक्ष्मीचा आपल्यावर कोप होतो. आज आपण माणसांच्या अशाच काही चुकीच्या सवयींबद्दल बोलणार आहोत. पाहूया ज्योतिषशास्त्रानुसार (According To Astrology What Is Reason Of Poverty) अशा चुका केल्यास काय परिणाम होतात.

पुढे वाचा ...
    मुंबई, 31 मे : आपल्याला आयुष्यात सर्वकाही हवं असतं. यश पैसा, समृद्धी, आनंद, समाधान. हे सर्व मिळवण्यासाठी आपण धावपळ करत राहतो. यातूनही काही वाईट गोष्टी घडल्या तर आपण लगेच इतर लोक किंवा परिस्थिती त्यासाठी कशी कारणीभूत आहे. हे जगाला आणि स्वतःलाही पटवून देण्याचा प्रयत्न करतो. परंतु बऱ्याचदा चूक आपलीच असते. आपण चुकलो हे मान्य करणं बऱ्याच लोकांना जमत नाही. त्यामुळे त्यांची प्रगती खुंटते. आपल्यासोबत काहीतरी चुकीचे घडले म्हणजे त्यात आपल्या नशिबाचाच दोष असावा, असा विचार साधारणपणे सर्वांच्या मनात येतो. पण अशावेळी शांत राहून विचार करावा की, आपल्यासोबत चुकीचे घडण्यामागे आपली तर एखादी चुकीची सवय (Bad Habit) नसेल ना ? हो, असे होऊ शकते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे काही चुकीच्या सवयी आपल्या दारिद्याचे (Reason Behind Poverty) कारण बनतात. आपल्या अनेक चुकीच्या सवयींमुळे देवी लक्ष्मीचा आपल्यावर कोप होतो. या चुकीच्या सवयी आपल्या दुर्दैवी नशीबाचं कारण बनतात. आज आपण माणसांच्या अशाच काही चुकीच्या सवयी आणि ज्योतिषशास्त्रानुसार (According To Astrology What Is Reason Of Poverty) अशा चुका केल्यास काय परिणाम होतात ते पाहुयात. हेही वाचा... आश्चर्य! 4 पाय आणि 4 हात; विचित्र चिमुकलीला पाहून डॉक्टरही शॉक, उपचारासही दिला नकार सर्वात पहिली चुकीची आणि वाईट सवय म्हणजे नखे चावणे (Nail Biting). काही लोकांना कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी आपली नखे ​​चावण्याची खूप वाईट सवय असते. नखे चावल्याने आपल्या कुंडलीतील सूर्य कमकुवत होतो. त्यामुळे आपल्याला अपयश मिळते आणि समाजात आपली निंदा होऊ शकते. घर किंवा घराबाहेर स्वच्छता राखणं (Cleanliness In House And Outside), ही खूप महत्वाची गोष्ट आहे. स्वच्छतेमुळे केवळ आजारांचा धोका कमी होतो असे नाही. तर देवी लक्ष्मीच्या घरात आगमनासाठी स्वच्छता खूप गरजेची असते. घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला घाण पसरल्याने कुंडलीत शुभ योग बिघडतात. या घाणीमुळे आयुष्यातील शुभता नष्ट होते. त्यामुळे जीवनात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतात. घराच्या स्वच्छतेमध्ये स्वयंपाक घराची स्वच्छता (Clean Kitchen) आलीच. काही लोक आपले स्वयंपाक घर वेळेवर स्वच्छ करत नाहीत. बराच वेळ घाण आणि शिळे अन्न स्वयंपाक घरात पडून असते. स्वयंपाकघर विखुरलेले असते. मात्र हे चुकीचे आहे. स्वयंपाक घर वेळीच स्वच्छ केले नाही तर तिथे जीव आणि कीटक होतात. त्यामुळे आजार वाढतात. तसेच भांडी किंवा मसाल्याच्या पेट्या स्वयंपाकघरात विखुरलेल्या ठेवू नयेत. असे केल्याने लोकांचे अनावश्यक नुकसान होते. घरात खर्च वाढतो आणि पैसा हातात टिकून राहत नाही. हेही वाचा... शाळा आहे ही, खरं वाटेल? वाळवंटात मधोमध कुणी आणि कशी बांधलीये Photo पाहून व्हाल थक्क काही लोकांना उगीच पाय फरपटत चालण्याची सवय असते. ज्योतिषशास्त्रानुसार, असे केल्याने आपल्या वैवाहिक जीवनावर विपरीत परिणाम होतो. आणि दाम्पत्यामध्ये अहंकार वाढून भांडणं व्हायला सुरुवात होते. म्हणूनच नेहमी व्यवस्थित पाय उचलून चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर बूट आणि चप्पल घरात विखुरलेले ठेऊ नये. याचाही आपल्या नशिबावर वाईट परिणाम होतो. असे केल्याने आयुष्यात विनाकारण धावपळ वाढते. ज्या कामासाठी एवढी धावपळ केली जाते त्यातही यश मिळणे माणसाला अवघड होऊन बसते. त्यामुळे अशा चुकीच्या सवयी आणि चुकीचे वागणे यांपासून माणसाने दूर राहावे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ज्योतिषी शैलेंद्र पांडे (Astrologer Shailendra Pandey) यांनी या चुकीच्या सवयींविषयीची माहिती दिली आहे.
    Published by:Pooja Jagtap
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Wealth

    पुढील बातम्या