advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / शाळा आहे ही, खरं वाटेल? वाळवंटात मधोमध कुणी आणि कशी बांधलीये Photo पाहून व्हाल थक्क

शाळा आहे ही, खरं वाटेल? वाळवंटात मधोमध कुणी आणि कशी बांधलीये Photo पाहून व्हाल थक्क

भारतातील थर वाळवंटात एका प्रसिद्ध अमेरिकन आर्किटेक्टने (New York Studio Architect Diana Kellogg यांनी) शाळा डिझाईन केली आहे. स्थानिक वाळूचा दगड (local sandstone) वापरून बनवलेल्या या शाळेची एक से एक फीचर्स पाहून थक्क व्हाल..

01
राजस्थानातल्या थर वाळवंटाच्या मध्यभागी ही अंडाकृती आकाराची (Oval Shaped Building) इमारत आहे. न्यूयॉर्कच्या वास्तुविशारद डायना केलॉग (New York Architect Diana Kellogg) यांनी डिझाइन केलेली एक नवीन शाळा आहे यावर विश्वास बसेल?

02
'राजकुमारी रत्नावती गर्ल्स स्कूल' (The Rajkumari Ratnavati Girl’s School) या शाळेच्या इमारतीचा आकार आणि संदर्भ 'स्त्रीत्वाची आणि अनंताची शक्ती.' दर्शवतो (The School Shows Power Of Femininity And Infinity). असे केलॉग यांनी सांगितले. ही शाळा लवकरच शाश्वत आर्किटेक्चरचा एक मोठा भाग म्हणजेच ज्ञान केंद्र होणार आहे.

03
ही शाळा हाताने कोरलेल्या स्थानिक वाळूच्या दगडांपासून बनवली गेली आहे. शाळेत जाणार्‍या अनेक मुलींच्या कुटुंबांनी या बांधकामात मदत केली होती. या बांधकामासाठी केवळ स्थानिक मजुरांचा वापर केला गेला आहे.

04
या शाळेमधील फर्निचर रोझवूडपासून बनवले गेले आहे. यामध्ये पारंपरिक पद्धतीने विणल्या गेलेल्या चारपाई आसनाचा समावेश आहे. जाळीचे रेखाचित्र, अशा जाळी असलेल्या भिंती या प्रदेशात पारंपारिकपणे गोपनीयतेसाठी वापरल्या जातात.

05
शाळेमध्ये असे पृष्ठभाग आहेत ज्यामुळे सावली तयार होते आणि हवादेखील खेळती राहते. त्याचबरोबर येथील स्थानिक प्राचीन पाणी साठवण तंत्रे (Local Ancient Water Harvesting Techniques) पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करतात आणि ग्रे पाण्याचा पुनर्वापर (Recycle Gray Water) करतात.

06
या शाळेमध्ये मेधा ही कला प्रदर्शनाची आणि सादरीकरणाची जागा आहे. यामध्ये लायब्ररी आणि द विमेन्स कोऑपरेटिव्ह यांचादेखील समावेश आहे. येथे स्थानिक कारागीर या प्रदेशातील महिलांना विणकाम आणि भरतकामाचे तंत्र शिकवतील. ते लवकरच शाश्वत शाळेत सामील होतील.

07
भारतीय फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी (Sabyasachi Mukherjee) यांनी आता शाळेच्या नवीन इमारतीला पूरक म्हणून विद्यार्थ्यांचा गणवेश तयार केला आहे. ही शाळा जुलै 2021 मध्ये सुरू होणार असून ही नर्सरीपासून दहा वर्षांपर्यंतच्या सुमारे 400 मुलींना शिक्षण देणार आहे.

08
जगातील काही आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक, भौगोलिकदृष्ट्या दुर्गम किंवा उपेक्षित समुदायांच्या विकासाला समर्थन देणाऱ्या CITTA या ना-नफा संस्थेने हा प्रकल्प सुरू केला होता.

  • FIRST PUBLISHED :
  • राजस्थानातल्या थर वाळवंटाच्या मध्यभागी ही अंडाकृती आकाराची (Oval Shaped Building) इमारत आहे. न्यूयॉर्कच्या वास्तुविशारद डायना केलॉग (New York Architect Diana Kellogg) यांनी डिझाइन केलेली एक नवीन शाळा आहे यावर विश्वास बसेल?

    MORE
    GALLERIES