जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / आश्चर्य! 4 पाय आणि 4 हात; विचित्र चिमुकलीला पाहून डॉक्टरही शॉक, उपचारासही दिला नकार

आश्चर्य! 4 पाय आणि 4 हात; विचित्र चिमुकलीला पाहून डॉक्टरही शॉक, उपचारासही दिला नकार

आश्चर्य! 4 पाय आणि 4 हात; विचित्र चिमुकलीला पाहून डॉक्टरही शॉक, उपचारासही दिला नकार

चार हातपाय असलेल्या या अडीच वर्षांच्या या चिमुकलीला तिच्या पालकांनी उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले तेव्हा तिला पाहून डॉक्टर शॉक झाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

पाटणा, 30 मे : सामान्यत: माणसाला दोन हात आणि दोन पाय असतात. मात्र बिहारमध्ये जन्मलेल्या एका मुलीला पाहून सर्वच जण आश्चर्यचकित (Everyone Surprised) झाले आहेत. बिहारच्या नवाडा येथील अडीच वर्षांच्या या चिमुकलीला पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. कारण या मुलीला चक्क चार पाय आणि चार हात (Four Legs and Four Arms Child) आहेत. या मुलीला पाहून सर्वच लोक चकित होत आहेत. चुंबूखी कुमारी असं या चिमुकलीचं नाव आहे. वसंत कुमार आणि उषा देवी यांची ती मुलगी आहे. या जोडप्याला एक 11 वर्षांचा मुलगा देखील आहे. हे कुटूंब बिहारच्या नवादा जिल्ह्यातील वारसालीगंज भागातील हेमदा येथील रहिवाशी आहे. समाजिक कार्यकर्ते राजेश कुमार यांना या भागात असताना ही मुलगी दिसली. तिचा व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर शेअर केला आणि त्यानंतर तो प्रचंड व्हायरल होत आहे. हे वाचा…  Monsoon Diet : पावसाळ्यात खाण्यापिण्याच्या या चुका करू नका, अन्यथा डॉक्टरशिवाय पर्याय नाही या मुलीला तिच्या पालकांनी उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले तेव्हा तिला पाहून डॉक्टरांना देखील आश्चर्यचा धक्का (Doctors Shocked) बसला. ही मुलगी जन्मापासून दिव्यांग असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले आहे. जन्म झाला तेव्हात ती चार हात आणि चार पाय घेऊन जन्माला आली आहे. या मुलीचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल (Viral Photos) होत आहेत. काही लोक याला देवीची लिला म्हणत आहेत तर काही जण याला निसर्गाचा चमत्कार म्हणत आहेत. हेही वाचा…  PHOTO - डिस्काऊंटच्या नादात दातांवर उपचारासाठी परदेशात गेली; तोंड उघडताच हादरली महिला या मुलीच्या पालकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत आहे. तिचे वडील मोलमजुरी करून घर चालवलात. आपल्या मुलीवर मोठा रुग्णालयात उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही. त्यामुळे ते आतापर्यंत तिच्यावर उपचार करू शकलेले नाहीत. पैसे नसल्याने डॉक्टरांनी या मुलीवर उपचार (Child Treatment) करण्यास नकार दिला.  येथील स्थानिक लोकांनी या मुलीच्या पालकांना योग्य उपचार व्हावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा सल्ला दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात