मुंबई, 05 फेब्रुवारी: तरूणाईमध्ये फेब्रुवारी महिन्यात एक नवा उत्साह संचारतो. सगळ्यांना वेध लागतात 14 फेब्रुवारी रोजी असलेल्या व्हॅलेंटाईन डेचे (Valetine’s Day 2022) . प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. सगळीकडे प्रेमाचे गुलाबी रंग पसरलेले असतात. या मुख्य दिवसाआधी जवळपास आठवडाभर वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. संपूर्ण आठवडाच प्रेमाचा, प्रणयाचा असतो. त्याला व्हॅलेंटाईन वीक (Valentine’s Week) म्हणतात. आपल्या आवडत्या व्यक्तीपर्यंत आपलं प्रेम पोहोचवण्याची संधी यामुळे मिळते. व्हॅलेंटाईन डेला अनेक प्रेमी आपल्या प्रेमाची कबुली आपल्या जोडीदारासमोर देतात. जोडीदाराला प्रपोज (Prapose) करतात. असा हा प्रेमाचा, आनंदाचा, उत्साहाचा व्हॅलेंटाईन वीक सगळ्यांना माहित आहे, पण यानंतरचा एक आठवडा असतो तो म्हणजे अँटी-व्हॅलेंटाईन वीक (Anti Valentine’s Week). ही एक नवीच प्रथा सगळीकडे अगदी झपाट्यानं लोकप्रिय होत आहे. नावावरून हा प्रेम विरोधी आठवडा आहे असं वाटेल, पण अगदीच तसे नाही. अँटी-व्हॅलेंटाईन वीक वाटतो तितका उदास नाही. अनेक जोडपी या आठवड्यातील प्रत्येक दिवस वेगळ्या प्रकारे घालवतात. हे वाचा- किडे अन् झुरळांना द्या EXचं नाव,त्यांना मोठ्या प्राण्याना खाताना बघत मिळवा समाधान या अँटी-व्हॅलेंटाईन आठवड्याची सुरुवात 15 फेब्रुवारीला स्लॅप डेने (Slap Day) होते आणि 21 फेब्रुवारीला ब्रेक-अप डेने (Break Up Day) याची समाप्ती होते. या आठवड्यातील प्रत्येक दिवसही वैशिष्ट्यपूर्ण असतो. या आठवड्याची सुरुवात 15 फेब्रुवारीला स्लॅप डेने झाल्यानंतर, 16 फेब्रुवारीला असतो किक डे, 17 फेब्रुवारीला परफ्युम डे, 18 तारखेला फ्लर्ट डे, 19 फेब्रुवारी रोजी असतो कन्फेशन डे, 20 तारखेला मिसिंग डे आणि 21 फेब्रुवारी रोजी ब्रेकअप डेने याची समाप्ती होते. ब्रेक-अप डे करणाऱ्या जोडप्यासाठी मात्र तो फारसा चांगला दिवस नसावा. या आठवड्यातील दिवस साजरे करण्याची पद्धत आणि त्यामागचे कारण स्लॅप डे (Slap Day) : एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात ज्या चुकीच्या भावना असतील त्यांना स्लॅप करण्यासाठीचा म्हणजे थोबाडीत मारण्याचा हा दिवस. थोबाडीत मारणं म्हणजे ते वाईट विचार काढून टाकणं. तुम्ही तुमच्या स्वभावातील नकारात्मक गोष्टीही काढून टाकायला या दिवशी सुरुवात करू शकता. जसं आपण दसरा वाईट प्रवृत्तींवर चांगल्या प्रवृत्तीच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा करतो त्या प्रकारेच दुसऱ्याबद्दलचे विशेषत: प्रेयसी-प्रियकराबद्दलचे वाईट विचार आणि आपल्या वागण्यातल्या त्रुटी दूर करण्याचा हा दिवस आहे. किक डे (Kick Day) : या दिवशी, तुम्ही तुमच्या सर्व चिंता आणि ताणतणाव दूर ठेवण्याचा संकल्प करू शकता. परफ्युम डे (Perfume Day) : या दिवशी एखादा छानसा सुगंध असणारा परफ्युम वापरा आणि सगळी नकारात्मकता दूर करा. फ्लर्ट डे (Flirt Day) : यादिवशी आवडणाऱ्या किंवा एखाद्या नवीन माणसांना भेटून flirt केले जाते. यादिवशी तुम्ही आयुष्य नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करू शकता. हे वाचा- Valentine’s Week 2022: 7 फेब्रुवारापासून सुरू होतोय प्रेमाचा ‘खास’ आठवडा; अशाप्रकारे करा साजरा कन्फेशन डे (Confession Day) : या दिवशी तुम्ही तुमच्या चुकांची कबुली देऊन नव्यानं नातं जोडण्याचा प्रयत्न करू शकता. मिसिंग डे (Missing Day): या दिवशी, तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्याच्यासोबत घालवलेल्या आनंददायी क्षणांची आठवण करून देणारी एखादी छानशी भेटवस्तू देऊ शकता. ब्रेकअप डे (Breakup Day): व्हँलेटाइन्स वीकमध्ये जसा 14 फेब्रुवारीचा दिवस महत्त्वाचा तसं या अँटी-व्हॅलेंटाइन्स वीकमध्ये हा दिवस (21 फेब्रुवारी) महत्त्वाचा असतो. या दिवशी या आठवड्याचा शेवट केला जातो. तरुणाईकडून काही नाती या दिवशी संपुष्टात आणली जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.