Home /News /lifestyle /

Valentine’s Week 2022: 7 फेब्रुवारापासून सुरू होतोय प्रेमाचा 'खास' आठवडा; अशाप्रकारे करा साजरा

Valentine’s Week 2022: 7 फेब्रुवारापासून सुरू होतोय प्रेमाचा 'खास' आठवडा; अशाप्रकारे करा साजरा

Valentine’s Week 2022 full List: 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा प्रत्येक दिवस वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो आणि साजरा केला जातो. आता व्हॅलेंटाईन वीक यायला फक्त काही दिवस बाकी आहेत.

मुंबई, 04 फेब्रुवारी: 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day 2022) असून सात फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक (Valentine’s week 2022) सुरू होत आहे. कपल्स या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. कपल्स या सात दिवसांत आपल्या पार्टनरला गुलाब (rose), चॉकलेट (chocolate), गिफ्ट्स (gifts) आणि इतर अनेक भेटी देऊन प्रेम व्यक्त करतात. तर, अनेक जण आपल्या क्रशला किंवा आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी देखील व्हॅलेंटाईन डे निवडतात. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा प्रत्येक दिवस वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो आणि साजरा केला जातो. आता व्हॅलेंटाईन वीक यायला फक्त काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे व्हॅलेंटाईन विकची पूर्ण लिस्ट (Valentine’s Week 2022 full List) आम्ही तुमच्यासाठी आणली आहे. जेणेकरून कोणत्या तारखेला कोणता डे आहे, याची तुम्हाला माहिती मिळेल. 7 फेब्रुवारी- रोझ डे व्हॅलेंटाईन विकची सुरुवात रोझ डे (rose day 2022) पासून होते. या दिवशी लोक आपल्या पार्टनरला गुलाबाचं फूल देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात. लाल रंगाचं गुलाबाचं फूल हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे यादिवशी त्याचं विशेष महत्व असतं. हे वाचा-तुमचं प्रेम म्हणजे वासना नव्हे ना? प्रेम आणि वासनेत कित्येकांची होते गफलत 8 फेब्रुवारी- प्रपोज डे जर तुम्हाला कोणीतरी आवडत असेल आणि त्याबद्दल तुम्हाला समोरच्या व्यक्तीला सांगायचं असेल, तर त्यासाठी असतो हा प्रपोज डे (propose day 2022). जर, तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर, केक, पुष्पगुच्छ आणि छोटसं गिफ्ट सोबत नेऊ शकता. 9 फेब्रुवारी- चॉकलेट डे 9 फेब्रुवारी हा चॉकलेट डे (chocolate day 2022) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला वेगवेगळी आणि त्यांच्या पसंतीची चॉकलेट्स गिफ्ट करून हा दिवस साजरा करू शकतात. आजकाल मार्केटमध्ये चॉकलेट डे स्पेशल बॉक्स देखील मिळतात. 10 फेब्रुवारी- टेडी डे व्हॅलेंटाईन विकमध्ये 10 फेब्रुवारी रोजी टेडी डे (Teddy Day 2022) साजरा केला जातो. आजच्या दिवशी टेडीबेअर गिफ्ट केला जातो. असं म्हणतात की हा बालपणीच्या आठवणी ताज्या करण्याचा दिवस असतो. शिवाय मुलींना टेडी फार आवडतात, अशी सर्वमान्य संकल्पना असल्याने टेडी गिफ्ट केला जातो. हे वाचा-तुमची GF, बायको दिवस-रात्र गुगलवर काय शोधते माहिती आहे? इथं पाहा तिची सर्च लिस्ट 11 फेब्रुवारी- प्रॉमिस डे 11 फेब्रुवारी हा दिवस प्रॉमिस डे (promise day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या पार्टनरला नेहमी त्याच्यासोबत राहण्याचं वचन देतात आणि त्याच्याकडून वचन घेतात. 12 फेब्रुवारी- हग डे (Hug Day 2022) हा दिवस जोडीदाराला मिठी मारण्यासाठी साजरा केला जातो. पार्टनरला हग केल्याने त्याच्याजवळ आणि सोबत असल्याचा दिलासा मिळतो. 13 फेब्रुवारी- किस डे 13 फेब्रुवारी हा दिवस किस डे (Kiss day 2022) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पार्टनरसोबत नातं आणखी घट्ट करण्याचा दिवस आहे. 14 फेब्रुवारी- व्हॅलेंटाईन डे सात फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या व्हॅलेंटाईन विकचा शेवटचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारीला असणारा व्हॅलेंटाईन डे. या आठवड्याचा हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत छान वेळ घालवू शकता. तसंच तुमच्या पार्टनरला सरप्राईजदेखील देऊ शकता. तर, अशाप्रकारे ही आहे व्हॅलेंटाईन विकची संपूर्ण यादी. वर दिलेल्या तारखा आणि त्या दिवशी असणारे डे लक्षात ठेवून तुम्ही छानपैकी व्हॅलेंटाईन वीक साजरा करू शकता.
First published:

Tags: Valentine day, Valentine day plans, Valentine week, Valentine's day, Valentine's week

पुढील बातम्या