साधं कृमीनाशक औषध Ivermectin संपवू शकतं कोरोनाची महासाथ; शास्त्रज्ञांचा दावा

साधं कृमीनाशक औषध Ivermectin संपवू शकतं कोरोनाची महासाथ; शास्त्रज्ञांचा दावा

गोव्यात 18 वर्षांवरील सर्व कोरोना रुग्णांना इव्हर्मेक्टिनच्या (ivermectin) औषध दिलं जाणार आहे.

  • Share this:

पणजी, 10 मे : कोरोना रुग्णांवर सध्या वेगवेगळ्या औषधांनी उपचार केले जात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत आहे ते रेमडेसिवीर औषध. पण हे औषध रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांनाच दिलं जातं आहे. यानंतर आता असं औषध समोर आलं आहे, जे सर्व कोरोना रुग्णांना देता येऊ शकतं आणि या औषधाचा जगभर वापर झाला तर कोरोना महासाथ संपू शकते असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. हे औषध म्हणजे  साधं अँटी-पॅरासायटीक इव्हर्मेक्टीन (Ivermectin).

गोवा सरकारने (Goa Government) सोमवारी कोविड-19 (Covid-19) वरील उपचारांसाठी प्रोटोकॉल (Treatment Protocol) मंजूर केला. कोरोनाच्या संसर्गामुळे उद्भवणारी गंभीर लक्षणं आणि विषाणूजन्य तापापासून बचाव करण्यासाठी 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना इव्हर्मेक्टिन (Ivermectin)औषधाच्या 5 गोळ्या घेण्याची शिफारस केली आहे.

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, इव्हर्मेक्टिन (Ivermectin) हे औषध राज्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर उपलब्ध होईल. ज्यांना कोरोनाची लक्षणं असतील किंवा नसतील अशा सर्व नागरिकांनी ते घ्यावं. आम्ही योग्य ती काळजी घेण्यासाठी हा प्रतिबंधात्मक उपचार (Precuationary Treatment) देत आहोत. इव्हर्मेक्टिनच्या गोळ्या 18 वर्षांवरील सर्व रुग्णांना शासकीय आरोग्य केंद्रावर दिल्या जातील. लोकसंख्येच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना हे औषध उपलब्ध करून दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. 5 दिवसांच्या कालावधीत रुग्णांना इव्हर्मेक्टिन देत त्यांच्यावर उपचार केले जातील.

हे वाचा - चालती फिरती Plasma बँक, कोरोनावर मात केल्यानंतर 9 महिन्यांत 14 वेळा प्लाझ्मा दान

ब्रिटन, स्पेन, इटली आणि जपानमधील तज्ज्ञांच्या पॅनेलला इव्हर्मेक्टिन घेतलेल्या कोरोना रुग्णांमध्ये मृत्यूची संख्या, रुग्ण बरा होण्याचा कालावधी आणि आणि व्हायरल लोडमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं दिसून आलं आहे, असं आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर सांगितलं.

नव्या कोविड-19 ट्रिटमेंट प्रोटोकॉलला मान्यता देणारे गोवा हे देशातील पहिलं राज्य असावं, असं राणे यांनी सांगितलं. पण यामुळे कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधित होत नाही. तर आजाराची तीव्रता कमी होण्यास मदत मिळते. अशा वेळी एखाद्याने सुरक्षितता आणि आत्मसंतुष्टीची खोटी भावना न बाळगता सर्व खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी आणि एसओपींचे (SOP) पालन करावं, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हे वाचा - Mucormycosis या बुरशीजन्य आजारावर मोफत होणार उपचार; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

काही दिवसांपूर्वी एका संशोधनाचे सूक्ष्म पुनरावलोकन केलं असता असा दावा करण्यात आला की जागतिक इव्हर्मेक्टिनचा वापर कोरोना महासाथीला संपवू शकतो. कारण हे औषध नियमित वापरल्यास प्राणघातक श्वसन रोगांचा धोका कमी होतो. एक साधं अँटी-पॅरासायटीक इव्हर्मेक्टीन हे कोरोनावर गुणकारी दिसत असल्याने जगभरातील डॉक्टरांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात असून हा उपचार चमत्कारिक मानला जात आहे..

फ्रंटलाईन कोविड क्रिटीकल अलायन्स (FLCCC) चे अध्यक्ष, मुख्य वैद्यकीय अधिकारी पियरे कोरी म्हणाले की, वैद्यकीय अधिकारी जे काम करण्यात अयशस्वी ठरले, ते काम आम्ही केले. आम्ही इव्हर्मेक्टिनबाबत उपलब्ध सर्व आकडेवारीचा आढावा घेतला आहे. इव्हर्मेक्टिन हे कोरोना साथ संपवू शकते, असा निष्कर्ष काढण्यापूर्वी आम्ही पुनरावलोकन केलेल्या डेटाच्या पात्रतेसाठी त्यास सर्वोच्च मानकं लागू केली. हस्तलिखितांचे लक्ष जानेवारी 2021 मध्ये उपलब्ध असलेल्या 27 नियंत्रित चाचण्यांवर होते.

इव्हर्मेक्टीन आरटीसीच्या (RTC) असंख्य मेटा विश्लेषणाशी सुसंगत असून, इटली, ब्रिटन, स्पेन आणि जपानमधील तज्ज्ञ पॅनेल्सनी ते प्रकाशित केल्याने त्यांना मृत्यूची संख्या, रिकव्हरी वेळ, व्हायरस क्लिअरन्स, तसंच इव्हर्मेक्टिन घेतलेल्या मृत्यूंची संख्या ही संख्यात्मक दृष्टीने घटलेली आढळून आली.

हे वाचा - विहिंप स्थानिक प्रमुखावर गुन्हा, 1 लाखांच्या बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन्स विक्री

आमच्या नव्या संशोधनानुसार, पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे की जेव्हा पुराव्यांची संपूर्ण तपासणी केली तेव्हा कोरोनावर सुरक्षित प्रोफेलिक्सिस आणि उपचार म्हणून इव्हर्मेक्टिन अत्यंत प्रभावी आहे यात शंकाच नाही, असे एफएलसीसीसीचे संस्थापकीय सदस्य आणि इस्टर्न व्हर्जिनिया मेडिकल स्कूलमधील फुफ्फुस आणि क्रिटिकल केअर मेडिसीनचे प्रमुख पॉल ई. मारिक यांनी सांगितलं.

जगातील अनेक प्रदेशांमध्ये कोरोनावरील प्रभावी उपचार म्हणून इव्हर्मेक्टिनचा वापर केला जात आहे. दक्षिण आफ्रिका झिम्बाबे, स्लोव्हाकिया, चेक रिपब्लिक, मेक्सिको आणि भारतात वैद्यकीय वापरासाठी या औषधाला मंजुरी देण्यात आली आहे. इव्हर्मेक्टिन वितरण मोहिमेमुळे संसर्ग आणि मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचं ताज्या अभ्यासावरून दिसून येतं. आम्ही जगभरातील प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि वैद्यकिय व्यावसायिकांना असं आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या मानकांमध्ये तातडीने इव्हर्मेक्टिनचा समावेश करावा, जेणेकरून ही महासाथ आपण लवकर संपुष्टात आणू शकू, असं आवाहन मारिक यांनी केलं आहे.

First published: May 10, 2021, 9:18 PM IST

ताज्या बातम्या