जालना, 10 मे : कोरोना व्हायरसनंतर (coronavirus) समोर येत असलेल्या म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या आजारानं नागरिकांच्या चिंता वाढवल्या आहेत. अत्यंत गंभीर स्वरुपाचा हा आजार असून त्याचे दुष्परिणाम अत्यंत भयावह आहेत. राज्य सरकारनं (Maharashtra Government) या बाबत काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh tope) यांनी सोमवारी जालन्यात सांगितलं. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत (mahatma jyotiba phule jan arogya yojana) यावर उपचार केले जाणार आहेत. तसंच या आजाराचे लवकर निदान आणि उपचार व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती (awareness) करणार असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
(वाचा-कोरोनाव्हायरसवर मात पण Black Fungus नं जीव घेतला; कित्येकांचा बळी घेणारा भयंकर आजार)
कोरोनातून उपचार घेऊन बरे झालेल्या अनेक रुग्णांना म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या बुरशीजन्य आजाराची लागण झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. या आजारामध्ये नाकाजवळ, ओठांच्या आजुबाजुला काठे ठिपके दिसतात. त्यावर वेळीच उपचार झाले नाही तरनाक किंवा श्वसनयंत्रणे मार्फक बुरशी शरिरात प्रवेश करते आणि नंतर ती डोळे, मेंदू यावर प्रामुख्यानं हल्ला करते असं टोपे यांनी सांगितलं आहे. लक्षणं दिसल्या दिसल्या लगेच निदान आणि उपचार करणं यावर सर्वात गरजेचं असल्याचंही टोपे म्हणाले. त्यामुळं लोकांना याची माहिती व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणामावर जनजागृती करणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. तर यावरील उपचार करण्यासाठी औषधी अत्यंत महागडी आहेत. त्यामुळं महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत या आजाराचा समावेश करण्याची महत्त्वाची घोषणा टोपेंनी केली. त्यामुळं राज्यात 1000 रुगणालयात यावर मोफत उपचार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
(हे वाचा - "मी Pfizer ची कोरोना लस घेणार नाही", फायझर कंपनीच्या CEO नीच दिला नकार)
म्युकरमायकोसिस या आजारावर उपचार करण्यासाठी लागणारं अॅम्फोतेरसीन (Amphotericin) हे औषध अत्यंत महागडं आहे. सात दिवस दोन वेळा म्हणजे चौदा इंजेक्शनचा डोस याचा घ्यावा लागतो. त्यामुळं खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्याला ते अनेकदा परवडणार नाही. त्यामुळं या औषधाच्या किमतींवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचंही टोपे यांनी सांगितलं. पूर्वी या इंजेक्शची किंमत दोन ते अडिच हजार होती ती मागणी वाढल्यानं आता सहा हजारांवर गेली असल्याचंही टोपे म्हणाले.
म्युकरमायकोसिस म्हणजे काय?
म्युकरमायकोसिस दुर्मिळ असला, तरी नवा नाही. प्रतिकारशक्ती (Immunity) कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात (ICU) असलेल्या, तसंच अवयव प्रत्यारोपण (Transplantation) केल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस होणं तसंच त्यामुळे त्यांचा मृत्यू होणं अशा गोष्टी पूर्वीपासूनच घडत आहेत. पण कोविड-19 मुळे त्याची लागण होत असल्याची गोष्ट नवी आणि धोकादायक आहे, असं डॉक्टर्सचं म्हणणं आहे. कोविड-19 मधून चांगल्या पद्धतीनं बरं होत असलेल्या पेशंट्सना याची लागण होण्यामध्ये अचानक वेगाने वाढ होणं ही काळजीची बाब आहे, असं सर गंगाराम हॉस्पिटलनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
या आजारामुळे कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रित ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Rajesh tope