पुणे, 10 मे : कोरोनाच्या महामारीच्या (Corona Epidemic) या काळात कोरोनावरील उपचारांमध्ये प्लाझ्मा (Plasma) हेदेखिल वरदानच मानलं जात आहे. त्यामुळंच कोरोनावर मात केलेल्यांना प्लाझ्मा दान करण्यास सांगितलं जातं. कोरोना संसर्ग (Corona Infection) आणि रुग्णांसाठी प्लाझ्माची आवश्यकता याचा विचार करून पुणे (Pune)येथील एका व्यक्तीनं प्लाझ्मा दान (Plasma Donation) करण्याचा जणू विक्रम केला आहे. नऊ महिन्यांमध्ये या व्यक्तीनं 14 वेळा प्लाझ्मा दान केला आहे.
(वाचा-राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता; लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार)
पुण्यातील या चालत्या फिरती प्लाझ्मा बँकचं नाव आहे अजय मुनोत. अजय मुनोत यांचे वय 50 वर्षे आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मदत व्हावी म्हणून प्लाझ्मा दान करण्याची प्रेरणा आईकडून मिळाल्याचं अजय मुनोत सांगतात. मुनोत यांच्या आईचा रक्तगट ‘O’ निगेटिव्ह होता. त्यामुळं युनिव्हर्सल डोनर असल्यानं त्या कोणत्याही ब्लड ग्रुपच्या व्यक्तीसाठी रक्तदान करू शकत होत्या. त्यामुळंच त्यांना पुण्याच्या आर्मी ऑफिसमधून अनेकदा फोन यायचे. आई अनेकदा रक्तदानासाठी जायची. आईची हीच शिकवण मुनोत यांना कोरोनाच्या या संकटात इतरांना मदत करण्याची प्रेरणा बनली.
(वाचा-मोठी बातमी..! मुंबई महापालिका 50 लाख लशी ग्लोबल टेंडर काढून खरेदी करणार)
अजय मुनोत यांना जुलै 2020 मध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी त्यावर मात केली. तेव्हापासून ते सलग शरिरात तयार होणाऱ्या अँटिबॉडीज प्लाझ्माद्वारे दान करत आहे. ज्या प्लाझ्मा बँकेत अजय प्लाझ्मा दान करण्यासाठी जातात तेथील डॉक्टर जोशी म्हणाले की, अजय मनोत पूर्ण बरे झाले तेव्हा ते प्लाझामा डोनेट करण्यासाठी आले होते. प्रत्येकवेळी त्यांची योग्य तपासणी करण्यात आली. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने प्लाझामा दान करणाऱ्याचा टाइटर रेट 1.640 पेक्षा अधिक असावा असं सांगितलं आहे. डॉ. जोशी यांनी सांगितलं की मुनोत यांचा टाइटर रेट सध्या 3 ते 4 दरम्यान आहे.
अजय मुनोत यांच्या शरिरात अँटिबॉडी अधिक वेगाने बनत आहेत. त्यांचा टायटर रेटही अत्यंत चांगला आहे. 14 वेळा प्लाझ्मा दान करणारे अजय मुनोत एकटे नाहीत तर याच प्लाझ्मा बँकेत राम बांगर नावाच्या व्यक्तीनंही 14 वेळा प्लाझ्मा दान केल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळं याद्वारे कोरोना रुग्णांना जीवदान देण्यासाठी असे डोनर मदत करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
पुण्यातली चालती फिरती Plasma बँक, कोरोनावर मात केल्यानंतर 9 महिन्यांत 14 वेळा प्लाझ्मा दान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Pune